नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. लहानपणापासूनच वड, पिंपळ आणि उंबर या झाडांना धार्मिक महत्त्व आहे असे आपण ऐकून आहोत. आपल्यापैकी सर्वांनीच पिंपळाचे झाड हे नक्कीच बघितले असेल परंतु याचा आपल्या आरोग्यासाठी देखील फायदा आहे हे बऱ्याच जणांना माहितीही नसेल. हे असे एकमेव झाड आहे जे तुम्हाला दिवसभर चोवीस तास ऑक्सिजन देते.
या वनस्पतीच्या पानांचा, मुळांचा, खोडाचा देखील आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदा आहे याची माहिती आज आम्ही तुम्हाला शेअर करत आहोत. अनेक रोगांमध्ये याची पानं अत्यंत लाभदायी आहेत. जाणून घेऊयात सर्वच फायदे विस्तृतपणे. या झाडाची सावली अतिशय थंडावा देणारी असते. हे झाड खूप दूरवर पसरते. पिपळाच्या पानात मध्ये असे काही गुणधर्म असतात की त्यामुळे तुमचा चेहर्यावरील रंग उजळ होतो.
अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये सिक्रेट घटक म्हणजे पिंपळाची पाने वापरली जातात हे आपल्याला ठाऊकच नसते. यामुळे पोट साफ होऊन तुमचे रक्त सुधारते. यामुळे शरीरात आलेली कमजोरी जाऊन ताकत देखील वाढू लागते. अनेक जणांना श्वासा संबंधित तक्रारी असतात. यामध्ये पिंपळाची सुकी फळे वाटून घेऊन ती दोन ग्रॅम घेउन त्यामध्ये एक चमचा मध घालून एक ग्लास पाण्यासोबत याचे सेवन केल्याने श्वसनाचे आजार बरे होतात.
पिंपळाचे सालं पाण्यामध्ये उकळून त्या पाण्याने गुळण्या करा किंवा चूळ भरा यामुळे दाता संबंधित सर्व आजार बरे होतात. यासोबतच तोंडाला दुर्गंधी येणे ही समस्या देखील निघून जाईल. तुम्हाला ताप आला असल्यास तुम्ही दहा ते पंधरा पिंपळाचे पान घ्या. हे पाण्यामध्ये उकळवा आणि काढा बनवा. हा काढा पिल्याने तुमचा ताप उतरण्यास मदत होईल. पिंपळाचे सालाची पावडर आणि अश्वगंधा पावडर समप्रमाणात अर्धा अर्धा चमचा असं मिसळून यामध्ये एक चमचा मध घालून चाटण केल्यास अंगातील ताकद वाढते.
पिंपळाच्या एका पानाचा रस, एक चमचा धने पावडर आणि खडीसाखर एकत्र करुन सेवन केल्याने तुम्हाला होत असलेल्या जुलाबा मध्ये चांगला परिणाम दिसून येईल. क्षय रोगासारख्या गंभीर आजारांमध्ये देखील पिंपळाचे पानअत्यंत फायदेशीर ठरतात. पोट दुखीचा त्रास आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी तरी होतोच. या समस्येमध्ये पिंपळाचे पान घेऊन त्याचा काढा बनवा. यामुळे तुमचे पोट व्यवस्थित साफ होऊन बद्धकोष्ठतेची समस्या होईल नष्ट.
पोट दुखी असल्यास त्वरित थांबेल. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु रुदय रोगामध्ये देखील पिंपळाच्या पानांचा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. कावीळ मधुमेह असे अनेक रोग आहेत ज्यामध्ये पिंपळाच्या पानांचा काढा तुम्ही अवश्य पिलाच पाहिजे. याशिवाय तुम्हाला कुठे ही दुखापत होऊन जखम झाली असल्यास पिंपळाच्या पानांची पेस्ट बनवून जखमेवर लावल्याने फायदा होईल.
त्वचेवर असणारी पुरळ, मुरम, फुटकुळ्या देखील होतील गायब. चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडणार नाहीत.. यासाठी केवळ पिंपळाचे पान वाटून चेहऱ्याला नियमित लावा. यासोबतच डोळ्यांच्या दृष्टीसाठी देखील पिंपळाच्या पानाचा काढा अत्यंत फायदेशीर आहे. अनेक लोकांना टाचांना भेगा पडण्याची समस्या असते. अनेकदा त्यातून रक्त देखील येते. अशा प्रकारच्या त्रासामध्ये पिंपळाच्या पानांचा चीक अथवा रस करून टाचेला लावावा.
तुम्हाला भेगा पासून मुक्ती मिळेल. वरील सर्व उपायांमध्ये औषधाचे प्रमाण हे- पिंपळाचा काढा हा नियमित 50 ते 100 ml प्यावा. तर पिंपळाचे चूर्ण तीन ते पाच ग्रॅम सेवन करावे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर ही होती मित्रांनो पिंपळाच्या झाडा बद्दल,पाना बद्दल विशेष माहिती..! अशाप्रकारे पिंपळाचे झाड आपल्या शरीराला अनेक आजारांवर उपयोगी ठरते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.