या फुलाने अनेक टकल्या लोकांच्या डोक्यावर उगवले आहेत केस.! याचा फक्त असा वापर करायचा अनेकांना माहिती नाहीये.! नक्की वाचा.!

आरोग्य

आपल्या शरीरावर असणारे प्रत्येक अवयव महत्वाचे आहेत. परंतू डोक्यावर येणारे केस देखील आता लोकांना आकर्षक करतात. आधीच्या काळात टक्कल पडले असले अथवा डोक्यावर पातळ केस असले तरी चालत असे. तेव्हा आपल्या दिसण्या पेक्षा आपल्या कामाला जास्त महत्व दिले जात होते. मात्र आता तुम्ही कसे दिसता यावर लोकांचे लक्ष्य जास्त असते.

आणि आपल्याला देखील काळासोबत चालायला हवे नाहीतर तुम्ही या धावत्या जगात सगळ्यात मागे रहाल. डोक्यावर घनदाट व काळेभोर केस असावेत असे आपल्या पैकी अनेक लोकांना वाटत असते. काही लोकांना आकर्षक केसांची देणगी ही निसर्गा कडूनच मिळालेली असते. मात्र काही लोकांच्या डोक्यावर केस नसतात तर काहींच्या डोक्यावर बारीक केस असतात ना त्यांना योग्य वाढ असते ना चमक.

आनुवंशिकतेच्या प्रभावाने देखील डोक्यावर केस नसतात. परंत्य आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे व चुकीच्या खाणं-पानामुळे आपल्या शरीराला योग्य ते पोषण मिळत नाही व आपले केस निस्तेज व पातळ होत जातात. अनेक लोकांचे स्वप्न असते की डोक्यावर आकर्षक केस असावेत व विविध प्रकारची बाजारातील उत्पादने वापरुन देखील त्यांना यश काही मिळत नाही.

मित्रांनो आज कालची तरुण पिढी या समस्येने त्रस्त आहे व या त्रासाचा एक कायमचा उपाय शोधत आहेत. मात्र आता चिंता सोडा व सुटकेचा निश्वास घ्या. कारण आज आम्ही आमच्या या लेखात तुमच्यासाठी केसांचे सर्व प्रकारे समाधान करणारा एक रामबाण उपाय घेवून आलो आहोत. होय हा उपाय एक घरगुती उपाय आहे जो तुम्ही तुमच्या घरीच तयार करु शकता.

हे वाचा:   मुठभर भुईमुगाच्या शेंगा शुगर असलेल्या लोकांचे आयुष्य बदलून टाकू शकतात.! शुगर असणाऱ्या लोकांना म्हणून भुईमूग आहे वरदान.!

या सोबतच हा एक नैसर्गिक उपाय आहे यात कोणतेही केमिकल रसायन नाही त्यामुळे हा 100% निर्धोक उपाय आहे. आयुर्वेदात देखील या उपाया बाबत ठळक अक्षरात नमूद केलेले आहे. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. तुम्ही तुमच्या परिसरात जास्वंदीचे झाड पाहिलेच असेल. जास्वंदीच्या झाड जास्त मोठे नसते व याला येणारी फुले सामान्य फुलांपेक्षा मोठ्या आकाराची असतात.

या जास्वंदीच्या झाडाचा प्रत्येक भाग हा औषधी असतो. अनेक विकारांवर जास्वंदी एक रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात देखील या झाडाला एक महत्वाचे स्थान प्रदान केले गेलेले आहे. जास्वंदीच्या पानांचा रस हा अनेक आजारांना बरा करणारा रामबाण उपाय आहे. विविध ठिकाणी जगभरात या जास्वंदीच्या फुला पासून अनेक खाद्य पदार्थ देखील तयार केले जातात. उच्च र’क्तदाब नियंत्रणात करण्यासाठी देखील जास्वंद फायदेशीर आहे.

हे वाचा:   वजन कमी करायचे असेल तर दिवसभरात किती चपात्याचे सेवन करावे, वजन कमी करणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त...!

शरीरवर उठणारी खरुज-खाज दूर करण्यासाठी देखील जास्वंद फायदेशीर आहे. केसांना मुलायम,तेजस्वी व गळणारे केस थांबवण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम दोन जास्वंदीची फुले घ्यायची आहेत. आता यांना एका खलबत्यात घालून यांचा बारीक रस काढून घ्यायचा आहे. हा रस तुमच्या केसांसाठी नव संजीवनी पेक्षा कमी नाही. हा रस रात्री झोपण्याच्या आधी मूळांपासून केसांमध्ये लावा व तसेच झोपी जा.

सकाळी उठल्यावर तुमच्याकडे असणार्या आयुर्वेदीक शैम्पूने कोमट पाण्याने केस धुवून टाका. हा उपाय तुम्हाला आठवड्यातून फक्त तीन वेळा करायचा आहे. तुमचे पातळ केस पुन्हा घनदाट होवू लागतील. केस गळती थांबेल व नवीन केस उगण्यास मदत होईल. केसात असणारा कोंडा व मळ देखील काही वापरातच कमी होवू लागेल. मित्रांनो बाजारतील केमिकल व रसायनिक उत्पादने केसांना खरबरीत व निस्तेज करतात. त्यांचा वापर लवकरात लवकर टाळा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.