ज्या लोकांना सतत पित्त होते त्यांच्या साठी खूप महत्वाची माहिती.! ही एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा.! पित्त, जळजळ, तोंड कडवट पडणे होईल कायमचे बंद.!

आरोग्य

जठरात कोणतेही अन्न गेले असता ते गोड तिखट खारट तरी त्या अन्नाचे रूपांतर मधुर रसात न होता आहाररस आंबटच तयार व्हायला लागतो…काही मर्यादेपर्यंत हा अम्ल रस उपयोगी असतो पण ती मर्यादा सोडून जास्त अम्लता आहाररसाला येवु लागते अशी अवस्था म्हणजे अम्लपित्त होय. ज्यावेळी तुम्हाला मळमळते,अस्वस्थ वाटतं,डोके दुखते,मान दुखते,पाठीत दुखते, प्रकाश-ऊन सहन होत नाही.

पिवळी उलटी होते, दात आंबतात, चक्कर आल्यासारखं वाटते…आणि हे सगळं समजेपर्यंत ते जीर्ण झालेले असते! अम्लपित्ताची कारणे: सगळ्यात जवळची कारणं आहारात आहेत. आहार शास्त्राचा जेवढा सखोल विचार आयुर्वेद शास्त्रात केलाय तेवढा इतर कोणत्याही शास्त्राने केलेला नाही. आहारात पालेभाज्या ह्या आयुर्वेदात अनारोग्य कारक ,डोळ्यांसाठी अहितकारक सांगितल्या आहेत.

यावर अनेकांना आश्चर्य वाटेल.परंतु एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्यांचे फायबर, व्हिटामिन,आयरन इ.घटक उपकारक ठरतात,फायबर मुळे कोठा साफ होतो परंतु अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटात कुजुन त्याचे रूपांतर गैसेस मधे होते,(त्यातले सेल्युलोज मानवी शरीर पचवु शकत नाही…वस्तुत: ते रवंथ करणारे प्राणी पचवु शकतात)अम्लता वाढते, घाण वासाचे गैसेस तयार होतात, अन्नपचन विकृत होवुन मलावष्टंभ होते, डोकं दुखुन पित्त वाढायला लागते.

पुढे अम्लपित्त आणि नंतर हेच अम्लपित्तजन्य अनेक व्याधींना जन्म देते. व्यवहारात पण पालेभाज्या जास्त काळ टिकत नाहीत लवकर सडतात. मात्र सर्वच पालेभाज्या वाईट नाहीत हं! अपवाद नक्कीच आहेत. दुसरं व्यवहारातले कारण दह्याचे सेवन! दही स्पर्शाला थंड परंतु गुणाने उष्ण आहे.पोटातगेल्यावरआंबटपणा वाढवते,उष्णता वाढते. मसालेदार चमचमीत तेलकट तसेच आंबवलेले पदार्थ खुप खाणे पण अम्लपित्त वाढविते.

हे वाचा:   दुखणाऱ्या दाताखाली ठेवली ही एक गोळी, दात दुखी कायमची थांबली, दातदुखीवर करा हा जबरदस्त उपाय.!

रात्री जागरण आणि दुपारी झोपणे. आधीचा आहार पचलेला नसता़ना परत खाणे यामुळे पचनावर अतिरिक्त ताण येवुन त्याने अम्लपित्त होते. सततची चिंता,मनावरीर ताण, घाईघाईने कामे करणे या कारणांमुळे पण अम्लपित्त वाढते. प्रकार: कफाचे अम्लपित्त असेल तर त्यात मळमळणे, पोटजडवाटणे, तंद्रा, आळस, उलटीतुन चिकट पा़ढरा घट्ट कफ पडणे अशी लक्षणे दिसतात.

पित्ताचे अम्लपित्तात घाम जास्त आणि दुर्गंधी युक्त येणे,तोंडाला दुर्गंधी इ.लक्षणे दिसतात.पुढे पित्त वाढुन खुप जळजळणे,राग अनावर होणे, चिडचिड,मा’सि’क पा’ळी’त जास्त रक्तस्राव होणे, कालांतराने केस गळणे आणि पिकणे ही लक्षणे पण दिसुन येतात. अम्लपित्त हा आजार ,स्वतंत्र व्याधी आहे..तर कधी कधी आम्लपित्त हे लक्षण काही व्याधीत दिसुन येते.

अनेकदा रुग्ण अम्लपित्त लक्षणासह चक्कर येणे,पित्ताने जळजळणे,तहान खुप लागणे अशी लक्षणे सांगतात . याठिकाणी आम्लपित्त हा आजार नसतो तर ते इतर वाताच्या विकारातले लक्षण असते. अशावेळी कितीही पित्तशामक औषधे खाल्ली तरी उपयोग होत नाही.

हे वाचा:   हातापायांना येत असतील मुंग्या तर अशावेळी करावे लागते हे एक साधे सोपे काम.! त्यामागे असते हे मुख्य आणि प्रमुख कारण.!

अम्लपित्ताचे दूरगामी परिणाम: अनेकदा जंक फुड,अति खारट तिखट,आंबवलेले पदार्थ इ.सतत खावुन जठरात अम्लता खुप वाढते.ती रक्तात शोषली जाते. जंक फुड इ मुळे निर्माण झालेली विषारे सुरवातीला मल,मूत्र ,घाम याद्वारे बाहेर टाकली जातात. परंतु ती एवढी वाढलेली असतात की बाहेर पडायला हे मार्ग पण कमी पडतात. अशावेळी ती त्वचेकडे येतात.त्यालाच अंगावर पित्त उठणे असे आपण म्हणतो. हे त्वचेतुन खाज येवुन बाहेर पडायला बघते.

ते दाबले तर फुफ्फुसाकडे येते आणि अस्थम्यात परिवर्तित होते…तेथेही दाबले तर किडनीवर परिणाम होवन किडनीचे आजार जन्म घेतात. रक्तात पित्त वाढल्याने केसांचा रंग भुरकट पांढरा होणे,केस गळणे,कोंडा होणे,चिडचिड वाढणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे इ.परिणाम होतात. हेच पित्त जठरातुन खाली गेले तर जुलाब,पेप्टिक अल्सर होतो.

यकृताचे आजार लिव्हर सिर्हौसिस इत्यादी संभवते. थोडक्यात अम्लपित्ताला वेळीच आवरा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *