मित्रांनो आपले शरीर एक अवघड यंत्र आहे. आपले वय जस-जसे वाढत जाते तस-तसे आपले शरीर आतून ठिसूळ व कमजोर होत जाते. सोबतच परिसरातील आज कालच्या वाढत्या प्रदूषणामुळे शरीराची रोगांशी लढणारी रोग प्रतिकारक शक्ती देखील झपाट्याने कमी होत चालली आहे. त्यामूळे आपल्याला बारीक सारीक आजार देखील पटकन होतात.
आता आपण घरचा संतुलीत व ताजा आहार सोडून बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ नित्य नियमाने खात असतो. माणसाची जीवनशैली आता खूपच व्यस्त झाली आहे त्यामूळे फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढत आहे. असे पदार्थ रोज खाल्याने आपल्या शरीराला उर्जा मिळत नाही. शरीराला हवे असणारे घटक व जीवनसत्व देखील मिळत नाहीत आणि यामुळेच शरीर कमजोर होते.
आज काल छाती मध्ये कफ होणे व याच्या बाजूची हाडे वाजत राहणे अश्या समस्या अनेकांना होताना आपण पाहत आहोत. आधी ही समस्या फक्त वय वर्ष साठ उलटून गेलेल्या लोकांना होत असे परंतू आता आपल्या तरुण पिढीला देखील या तक्रारीचा सामना करावा लागतो.बाजारात आता या समस्येच्या समाधाना वर अनेक प्रकारच्या गोळ्या व औषधे आहेत.
परंतू या अनैसर्गिक गोळ्या औषधं रोज खाणे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. सोबतच या महगायीच्या दिवसात महिन्याला पैसे देखील मोठ्या प्रमाणात या गोळ्या व औषधांवर संपतात. तुम्ही देखील या समस्येवर तोडगा शोधत आहत का..? जर होय तर हा लेख अगदी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही आमच्या या लेखात तुम्हाला या समस्येवर एक आयुर्वेदीक व नैसर्गिक घरगुती उपाय सांगणार आहोत.
अगदी घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हा सहज तयार करु शकता. सामान्य लोकांच्या खिशाला देखील परवडेल असा हा साधा सोपा पण रामबाण उपाय आहे. नैसर्गिक असल्याने याचा तुमच्या शरीरावर कोणता ही वाईट परिणाम होत नाही. चला आता वेळ न दवडता पाहूया हा उपाय. मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यक आहे ते म्हणजे आले. आपल्या शरीरासाठी आले खूपच उपयुक्त आहे हे तुम्हाला माहितच असेल.
सर्दी खोकला असो किंवा कफ व घशाचे दुखणे आले यावर एक रामबाण उपाय आहे. याच आल्याला सोलून बारीक करुन घ्या. पुढे यात आपला दुसरा घटक म्हणजे लसूणच्या चार ते पाच पाकळ्या सोलून खलबत्यात वाटून मग टाका. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लसूण खाणे खूप फायदेशीर ठरते.आता हे दोन्ही घटक एकत्र करुन मिक्सर मध्ये वाटा.
पुढे या घटकांची पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. काळी मीरी तुम्ही सर्व ओळखतच असाल. याच काळी मीरीच्या दाण्यांना खलबत्याच्या मदतीने बारीक वाटून घ्या व या मिश्रणात टाका. शरीरातील आम्ल पित्त दूर करण्यासाठी काळी मिरी उपयुक्त आहे. दहा ते पंधरा ग्राम काळी मिरीचे दाणे या उपयासाठी वापरा. आता हे मिश्रण चमच्याने छान ढवळून एकत्र करुन घ्या. पुढे यात वीस ते तीस ग्राम मध घाला.
मध हा एक नैसर्गिक घटक आहे अध्याप माणूस हा घटक कृत्रिम रुपाने तयार करु शकलेला नाही. यात अनेक घटक व जीवनसत्वे आहेत जी आपल्या शरीराला उपयुक्त आहेत. या सर्व मिश्रणाला एकत्र करा व रोज रात्री झोपण्याच्या आधी याचे सेवन करा. तुम्हाला होणार्या समस्या छातीच्या हाडांचे दुखणे तसेच वारं वार कफ तयार होणे या समस्या या उपायाच्या वापराने समूळ नष्ट होतील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.