मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय असते. काहीजण यामध्ये मध लिंबू कसे घालून पितात. अनेक जण पाणी चहा प्रमाणे उकळवून घोट घोट करून पितात. आपल्या शरीराचे तापमान 36 डिग्री सेल्सिअस असते. त्यापेक्षा चार डिग्री कमी अथवा जास्त म्हणजे 32 डिग्री ते 40 डिग्री सेल्सिअस गरम पाणी पिल्यास हे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. परंतु…
जर तुम्ही चहा प्रमाणे पाणी उकळवून पितात असाल तर तुमचे शरीरातील लहान आतडे आमाशय म्हणजेच जठर हे हळूहळू सडू लागते. आपल्या पोटात काहीही खाल्ल्यानंतर पचवण्यासाठी एंझाइम्स लागतात. परंतु दीर्घ काळासाठी गरम पाणी पिल्याने हे एंझाइम्स सडून मरतात. म्हणून अति प्रमाणात पाणी गरम करून पिऊ नये. आपल्या शरीराच्या तापमानाच्या 4 डिग्री सेल्सिअस कमी अथवा जास्त असे तापमान असलेलेच पाणी प्यावे.
जाणून घेऊयात असे पाणी पिण्याचे फायदे. आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेल आहे. त्यापैकी पाणी हे एक होय. शुद्ध असलेले पाणी शरीरात गेल्यावर आपल्या शरीरातील 103 प्रकारचा रोगांचा नायनाट होतो. यामध्ये मधुमेह, हृदयविकार संबंधित रोग, स्ट्रोक, कोलेस्ट्रॉल, पॅरालिसीस अशा प्रकारचे रोग कितीही वय वाढले तरीही होणार नाहीत जर तुम्ही पिण्याच्या पाण्याचे ध्यान ठेवाल.
त्या करता तुम्ही रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यामध्ये आठ ते दहा तास पाणी झाकण बंद करून सोडून द्यायचे आहे. तांब्याचे कोटिंग असलेले प्रत्येक भांडे तांब्याचे नसते. शुद्ध तांब्याचे भांडे व्यवस्थित बघून खरेदी करावे. सकाळी उठल्यानंतर त्या तांब्याच्या भांड्यातील हे पाणी कोणत्याही भांड्यामध्ये ओतून अर्धा मिनिटांसाठी हलके कोमट करायचे आहे. यानंतर तुम्ही त्याचे सेवन करायचे आहे. असं केल्याने पाण्याचे शुद्धीकरण होते.
असे शुद्धीकरण केलेल्या पाण्याचे जर तुम्ही सकाळी उठून रिकाम्यापोटी पिल्याने त्या पाण्यामध्ये कॉपर चे गुणधर्म उतरतात. हे गुणधर्म अल्कलाइन नेचर चे असतात. सकाळी उठल्यानंतर आपले जठर अमाषय ऍसिडिक असते. त्याला न्यूट्रीलाईज करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचे पाणी पिले पाहिजे. यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील ऍसिड ची मात्रा कमी होते.
ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्तामध्ये ऍसिडचे प्रमाण जास्त असते त्याला भयंकर अशा एकशे तीन प्रकारच्या रोगांची संभावना असते. आणि अशा प्रकारचे अल्कलाइन नेचर चे पाणी पिल्यामुळे ॲसिड तत्व न्यूट्रीलाईज होतात. आणि तुम्ही अशा रोगांपासून दूर राहता. यामुळे उच्च रक्तदाब थायरॉईड असे रोग देखील होत नाही. इतकेच काय तांब्याच्या भांड्या मधील पाणी पिल्याने अकाली केस पिकण्याची समस्या देखील कमी होते तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक उजळा येतो.
त्वचा होते मुलायम आणि केस होतात निरोगी. केसांसंबंधीच्या सर्व तक्रारी हळूहळू दूर होऊ लागतात. डोळ्यांना देखील होतो खूप फायदा. हाड दुखी, सांधेदुखी, मनका दुखी, कंबर दुखी अशा प्रकारचे रोग देखील दूर होतात. आपल्या रक्तात असे ऍसिडिक गुणधर्म जास्त असल्यास खुप रोग होतात. आणि अशा रोगांना दूर ठेवण्यासाठी आपल्याला शरीरातील ऍसिड साठवू द्यायचं नाही.
त्याकरता असे तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी उठून कोमट करून प्यायचे आहे यामुळे अन्न देखील व्यवस्थित पचते. यामुळे पोटासंबंधी चे सर्व रोग देखील आपोआपच दूर होतात. पोट व्यवस्थित प्रकारे साफ होते. अन्न बाकी गोष्टी पचवण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.