भूक नसताना जेवण खाणारे एकदा हे वाचाच.! आयुष्यात पोट दुखी कधी होणार नाही.! फक्त या गोष्टीचे करावे लागते पालन.!

आरोग्य

आपली नियमित कामे योग्य रित्या करण्यासाठी शरीराला गरज असते ऊर्जेची. ही ऊर्जा आपल्याला आपण रोज जो आहार ग्रहण करतो त्यातून प्राप्त होते. प्रथिने, कर्बोदके, कॅल्शियम, लोह व विविध प्रकारची जीवनसत्वांची आपल्या शरीराला रोज मोठ्या प्रमाणात गरज असते व ही गरज भागवतो आपला रोजचा संतुलीत आहार. मित्रांनो जास्त अन्न खाल्ले तर आपल्या शरीराला जास्त फायदा होतो असा अनेकांचा गैरसमज होतो.

यामुळेच ते पुढचा मागच विचार न करता जास्त प्रमाणात जेवण करतात. मात्र विज्ञान आपल्याला असे सांगते की जेव्हा जेवताना तुम्हाला पहिला ढेकर येतो तेव्हा तुमचे पोट पूर्ण भरले आहे हा एक प्रकारचा संकेत शरीर आपल्याला देते व आपण जेवण थांबवले पाहिजे. मात्र आपण जेवत राहतो व हे जे जास्त अन्न आपण खातो ते पचन न होता सडत राहते. शरीरात अन्न सडण्याचे अजून एक कारण आहे ते म्हणजे अन्न चावून न खाणे.

दात हे आपल्या पचन संस्थेचा पहिला अवयव आहे व हे आपण खाल्लेले अन्न बारीक करुन पचनास मदत करते. आपल्या आयुर्वेदानुसार आपण खात असलेले अन्न बत्तीस वेळा चर्वण करावे. याने तुमचे अन्न नीट बारीक होईल व पचन क्रिया नीट होईल. या नंतर अन्न पुढे पंचवीस सेंटी मीटर एवढ्या लांबीच्या अन्ननलिकेतून पुढे जाते. इथे पुढे लीवर मध्ये म्हणजेच यकृतात अन्न जमा होते.

हे वाचा:   जर चिंगम गिळले गेले तर त्या व्यक्तीचा मृ'त्यू होतो का? चिंगम खाण्या आधी नक्की वाचा, शरीरावर होणारे हे परिणाम नक्की जाणून घ्या.!

यकृतामध्ये पाचक रस नामक एक लिक्वीड शरीराद्वारे सोडले जाते. हा पाचक रस आपल्या अन्नाला पचण्यास मदत करतो. जर पाण्याची बाटली पूर्ण भरली गेली तर त्या पाण्याला नीट खेळवता येणार नाही तसेच जर ही अन्न पिशवी संपूर्ण भरली तर पाचक रस आपले काम योग्य रित्या करत नाही व अन्न पोटातच सडू लागते. म्हणूनच अन्न ग्रहण करताना जेव्हा पहिला ढेकर येईल तेव्हा अन्न खाणे थांबवा हा तृप्ती ढेकर म्हणजे आपले पोट पूर्ण भरण्याचा एक संकेत मानला जातो.

आता हे सडलेले अन्न आपल्या यकृतावर जमून राहते व पौष्टिक आहार खावून देखील तुमच्या शरीराला त्याचा काही लाभ होत नाही. ही जमा झालेली घाण पोटातून साफ होणे फार आवश्यक आहे. चला आता पोटात असणारी नको असलेली घाण काढून टाकण्याचे काही नैसर्गिक व उपयुक्त उपाय पाहूया. सकाळी उठल्यावर सर्वात आधी पाणी प्यावे. होय आपल्या तोंडात जमा असणारी सकाळची लाळ आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त मानली जाते.

पाण्यासोबत ही लाळ आपल्या पोटात गेली तर पोट तर साफ होईलच परंतू रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढेल. दुसरा उपाय म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी लिंबाच्या रसाचे सेवन करणे. लिंबाच्या रसात जीवनसत्व क मोठ्या प्रमाणात असते. पोटात जमा असणारी घाण काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात टाकून प्यायल्यास याचा चांगला फायदा होतो. लिंबाचा रस शरीरातील टॉक्सीक घटक काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

हे वाचा:   जे जे लोक हे पदार्थ खातात त्यांचे गुडघे कंबर जास्त दुखत असते.! अनेकांनी हे खाणे बंद केले त्यांनी गुडघे दुखी किंवा कंबर दुखी चे नाव नाही घेतले.!

सोबतच लिंबाच्या सेवनाने वजन देखील नियंत्रणात राहिल. मित्रांनो जेवत असताना कधीच पाणी पिवू नये. हो अनेक लोकांना घासाला पाणी पिण्याची सवय असते. परंतू ही सवय खूप अयोग्य आहे. तुम्ही घासासोबत जर पाणी प्यायलात तर पोटात तयार होणारा पाचक रस हा विरळ होतो व अन्न पचन होण्यास समस्या निर्माण होतात. म्हणूनच जेवण्याच्या आधी पाणी प्या अथवा जेवून झाल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्या.

या नियमाने देखील तुमच्या पोटात कधीच अयोग्य घटक सडत राहणार नाही पोट साफ होईल व पित्ताच्या तक्रारी देखील दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.