हे आपल्या आजूबाजूचे प्रदूषण असलेला परिसर आपल्या आरोग्यावर परिणाम करतोच तसेच त्याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा होतात. केस गळण्याची समस्या आजकाल प्रत्येकामध्ये आढळत आहे. यामागील कारण म्हणजे चुकीची जीवनशैली आणि वाढते प्रदूषण मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत बर्याच मुली या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे केसांची निगा राखणारी उत्पादने वापरतात.
परंतु महागड्या आणि रसायनांनी भरलेल्या गोष्टी वापरण्याऐवजी तुम्ही हे वापरू शकता. या उपायांसाठी आपल्याला लागणार आहे. काळे तीळ
(कलोंजी बिया), मेथीच्या बिया किंवा पावडर आणि मोहरीचे तेल. जर आपल्याकडे अक्खे काळे तीळ असतील तर ते बारीक करून त्याची पूड तयार करून घ्यावी. तसेच मेथीचे दाणे सुद्धा बारीक कुटून घ्यावेत. हे मिक्सरला न लावता तुम्ही हाताने कुटून घेतले तर त्यातील गुणधर्म तसेच राहतात.
मेथी दाण्यांमध्ये कित्येक प्रकारच्या पोषक तत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यातील पोषण तत्त्वांमुळे केस पांढरे होत नाहीत. मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘व्हिटॅमिन के’ चे घटक असतात. याव्यतिरिक्त केसांमधील कोंडा, केसगळतीची समस्या देखील कमी होते. मेथीमुळे केस तुटणे तसंच केस गळतीची समस्या कमी होते. तसंच मेथी फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होतात.
मेथीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडेंट, अँटी रिंकल, मॉइश्चराइझिंग आणि त्वचा मऊ करण्यास उपयुक्त पोषण तत्त्वांचा समावेश आहे. या घटकांमुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक चमक येते. मेथीचे दाणे नेहमी खाल्ल्यास सुद्धा शरीराला फायदा होतो. मेथी दाण्यांमुळे केसातील कोंडा कमी होतो. हेअर केअर प्रोडक्ट्ससोबतच स्किन केअर उत्पादनांमध्ये देखील तिळाच्या तेलाचा समावेश केलेला आढळतो.
तिळाच्या तेलाचा उपयोग करुन अनेक नामांंकित कंपन्या साबण, शॅम्पू, स्किन माॅश्चुराइजर यासारखी अन्य कॉस्मेटिक्स उत्पादने बनवण्यावर भर देतात. तिळाच्या तेलामध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-६ या फॅटी अॅसिड्सचे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते. आपल्या शरीरासाठी हे इसेन्शियल फॅटी अॅसिड्स अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.
केसगळती थांबवायची असेल आणि सुंदर काळे लांब केस हवे असतील तर यासाठी मोहरीचं तेल खूप फायदेशीर ठरतं. हे मिश्रण आपण तीन पद्धतीने केसांना लावू शकता. पहिली पद्धत म्हणजे हे मिश्रण एकत्र करून लगेच केसांना लावावे. आणि हलक्या हाताने मालिश करावी. दुसरी पद्धत म्हणजे हे मिश्रण एक ग्लास पाण्यात टाकून ते पाणी उकळून घ्यावे आणि घालावे. त्या पाण्याने केसांना मालिश करावी. मालिश केल्याने फोक्याचे रक्ताभिसरण सुद्धा चांगले होते.
आणि केसांची वाढ होऊ लागते. तिसरी पद्धत म्हणजे हे मिश्रण एक वाटी दह्यात टाकून मिक्स करावे. आणि या हेअर पॅक ने डोक्याला मालिश करावी. या तिन्ही पद्धती खूप फायदेशीर आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.