गुलाबाचे फुल कोणाला आवडत नसेल ? खूपच कठीण आहे हे शोधणं. काहींना गुलाबाची फुले आवडतात पण ती झाडावरून तोडायला आवडत नाही. माणसाला प्रेम, आदर, कुतघ्नता, आनंद, दुख, इत्यादी सर्व भावना व्यक्त करताना गुलाबाची फुले दिली जातात. गुलाबामध्ये अनेक आकर्षक जाती, विविध रंगछटा, आणि सुवास असल्यामुळे या फुलांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सातत्याने केला जातो.
त्याचप्रमाणे या फुलांचा अनेक पद्धतींनी औषध म्हणून सुद्धा उपयोग केला जातो.
आपल्या घरातील वातावरण आनंदी राहावे म्हणून सुद्धा तुम्ही गुलाबाचे रोप घरी लावू शकता.
हे रोप लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे गुलाबाची काडी किंवा त्याचे खोड. पण हे खोड तीन प्रकारचे असते. यातले योग्य तेच निवडले तरच आपल्याला गुलाबाची फुले कमी वेळात आणि योग्य पद्धतीने मिळतात. काही खोड नाजूक, पोपटी रंगाचे आणि थोडे मऊ असते.
दुसऱ्या प्रकारचे खोड म्हणजे पहिल्या खोडापेक्षा थोडे मोठे, हिरव्या रंगाचे आणि थोडे मध्यम आकाराचे असते. तिसऱ्या प्रकारचे खोड म्हणजेच फांदी ही गदड लाल रंगाची असते. आणि हे आकाराने जाड असते.
या तीन प्रकारामधून आपल्याला दुसऱ्या प्रकारचे खोड घ्यायचे आहे. ते मध्यम आकाराचे, हिरव्या रंगाचे असते. आणि याला व्यवस्थित फुले येतात.
अशी फांदी घेऊन ती कुंडीत लावावी.
कुंडीत लावण्यासाठी त्यात गांडूळ खत आणि वाळू लागणार आहे. हे दोन्ही आपल्याला समप्रमाणात घ्यावे लागेल. आणि त्यात बागेतील माती टाकावी लागेल. या तीन गोष्टी आपण कुंडीत टाकुन मिश्रण करून घ्याव्यात. आता गुलाबाच्या फांद्यांना खालून तिरक्या पद्धतीने कापावे. आणि त्या वर दालचिनीची पूड लावावी किंवा तुम्ही मध देखील वापरू शकता.
पूड किंवा मध लावून त्या कुंडीत पुरावी. आणि पुरेसे पाणी घालावे. या फांदीला पाने येण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागतो. जर काही गोष्टींची थोडीफार काळजी घेतली, तर गुलाबाची रोपं बागेत वाढवणं तसं काही फार अवघड काम नाही. कधी- कधी काहीतरी आपल्याकडून नकळतपणे होऊन जातात आणि मग बागेतले गुलाब सुकून जातात. म्हणूनच गुलाबाच्या झाडांची काळजी घेण्यासाठी या काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या.
गुलाबाचे झाड लावण्यासाठी कडक माती कधीच वापरू नका. भुसभुशीत माती निवडा. गुलाबाचे रोप लावल्यानंतर सुरूवातीचे दोन- तीन दिवस ते कधीच कडक उन्हात ठेवू नका. गुलाबाच्या रोपांसाठी शेण हे सगळ्यात चांगले खत समजण्यात येते. गुलाबाचे रोप लावण्याआधी कुंडीला खालून छिद्र पाडून घ्या जेणेकरून जास्तीचे पाणी निघून जाईल. अशाप्रकारे आपण घरीच गुलाबाचे झाड लावू शकता.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.