याच कारणामुळे जपानी लोक जास्त वर्ष जगतात.! त्यांचे रहस्य आता आले आहे जगासमोर.! त्यामागील कारणे ऐकून तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल.!

आरोग्य

आजकाल जमाना खूपच बदलत चालला आहे. ४जी संपून ५जी येत आहे. असं मानल जातं टेक्नॉलॉजी आणि आधुनिक सुविधांमुळे आपलं जीवन सहज सोपं बनवलं आहे तर दुसरीकडे यामुळे आपल्या शारीरिक हालचाली कमी होत चालल्या आहेत. जे काम आपण पूर्वी हाताने करायचो त्याची जागा आता रोबोट आणि मशीन, रिमोटने घेतली आहे. लठ्ठपणा, डायबेटिस, रक्तदाब, कोलेस्‍ट्रॉल, हार्ट अटॅक, मायग्रेन सारखे गंभीर आजार अनेक देशात तेजीने पसरत आहेत.

परंतु जपान टेक्नॉलॉजी आणि आधुनिक दृष्टीने सर्व देशांमध्ये अग्रगण्य असून देखील विश्वातील सर्वात सुदृढ निरोगी देशांच्या श्रेणीत आहे. इथे राहणारे लोक दीर्घायुषी असतात. मेलबर्न येथील एक युनिव्हर्सिटी मधील एका अभ्यासानंतर आढळून आले कि जपान मध्ये 5000+ लोकांचे वय शंभर वर्षापेक्षा जास्त आहे. लठ्ठपणा मध्ये देखील जपान चा रेट सगळ्यात कमी आहे.

जपान मध्ये आज झोपणे फिरणे चालणे खाणेपिणे प्रत्येक गोष्टीचा टेक्नॉलॉजी ची मदत घेतली जाते. तरीदेखील येथील लोक इतके तंदुरुस्त कसे? काय कारण आहे जे येथील लोक इतके दीर्घायुष्य तरुण राहतात. खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन रुटीन यांचे नियम तेथील लोकांचे वेगळे आहेत. ते जर आपण देखील करू शकलो तर दीर्घायुष्य सोबतच सुंदर त्वचा व केस मिळून अनेक रोगांपासून दूर राहू शकू.

जाणून घेऊयात असे त्यांचे काय सीक्रेट आहेत ते.. चहा पिणे, चहा पिणे जपानचे फेव्हरेट ड्रिंक आहे. 100 पेक्षा जास्त प्रकारचे चहा येथे पिले जातात. परंतु सगळ्यात जास्त ग्रीन टी पीला जातो. आपण पितो त्यापेक्षा चांगल्या प्रतीचा चहा तिकडे पिला जातो. चहामध्ये हे लोकं असे काही घटक वापरतात ज्यामुळे त्वचा हाड केस सर्वांवरच प्रभाव पडतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शरीर सतत डीटॉक्स होत राहते.

हे वाचा:   लिंबू पाणी खरच वजन कमी करते का.? पोटावर चरबी घेऊन मिरवणारे एकदा हे नक्की वाचा.!

जपानी लोक आपले सगळे काम करताना पाई चालणे याला प्राधान्य देतात. अनेक सुखसुविधा असून देखील तेथील लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट चा वापर जास्त करतात. आळस दूर करून स्वतःला ऍक्टिव्ह ठेवतात. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत असताना होणाऱ्या स्ट्रगल मुळे जेवण पचायला सोपे जाते आणि शरीराचे वजन वाढत नाही.

जपानी लोकांच्या आहारामध्ये कॅलरी फॅट आणि साखरेचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात राहते आणि डायबिटीस कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा होत नाही. शाकाहारी असो किंवा मांसाहारी जपानी लोक जास्त करून आपल्या आहारात समुद्री पाण्यामध्ये आढळणाऱ्या वस्तू घेतात. काय तुम्हाला माहित आहे का समुद्रात उगवणाऱ्या वनस्पती(भाज्या) जमिनीवर उगवणाऱ्या वनस्पती पेक्षा दहा पटीने ताकदवान असतात?

जपानी लोकं पूर्ण जगाच्या 10% मासे एकटेच खातात. समुद्री भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयोडीन आणि पोटॅशियम असते. माशांमध्ये विटामिन डी, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड, विटामिन बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक असे भरपूर पोषकतत्वे असतात. समजलं जातं समुद्री आहार सेवन करणाऱ्या लोकांची हाडं नेहमी मजबूत असतात.

त्वचा नेहमी तरुण राहते आणि केस दीर्घ वयापर्यंत काळी आणि दाट राहतात. जपानी आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे फार कमी सेवन होते. समुद्री भोजन केल्यामुळे यांना दूध सूट होत नाही. त्यांच्या आहारात मैदा कमी आणि भाज्या भरपूर प्रमाणात असतात. यामुळे येथे पोटा संबंधीच्या तक्रारी कमी आढळतात.

हे वाचा:   याचा फक्त एक चमचा ७ दिवस घ्या; हाडांसंबंधी एकही समस्या राहणार नाही, शरीर होईल दगडासारखं मजबूत.!

चपाती ब्रेड च्या जागी येथे तांदूळ खाल्ला जातो. जपानी तांदूळ आपल्या तांदळापेक्षा खूप पोषक असतात. इथे ब्राऊन राईस आणि ग्रीन राईस जास्त प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे चरबी वाढत नाही. जपानी लोक तळलेले पदार्थ खूप कमी खातात. घरामध्ये जास्त करून जेवण वाफेवर शिजवले जाते. वाफेवर शिजवल्यामुळे जेवणातील पोषकतत्व टिकून राहतात. जेवण बनवण्यासाठी मंद आचेचा उपयोग केला जातो.

जास्त अन्न सूप आणि ग्रेव्ही वाले असतात. जेवताना वापरली जाणारी भांडी देखील कमी आकाराचे असतात. गरजेपेक्षा जास्त खाणे जपानमध्ये योग्य मानले जात नाही. साफसफाईच्या बाबतीत जपान जगातील एक अग्रगण्य देश आहे. यामुळे अनेक रोग आणि तक्रारी आपोआप कमी होतात. जपानी लोक नियमित आरोग्याच्या चाचण्या करत असतात. ही होती जपानी लोकांची दीर्घ आयुष्य संबंधीत काही माहिती!

आपणदेखील काही चांगल्या सवयी आत्मसाद केल्या पाहिजेत. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.