जेवणात टाकलेले आमसूल काढून टाकावे की खाऊन टाकावे.? आमसूल खाल्ल्यावर काही होते का? आमसूल बद्दल आश्चर्य दायकगोष्टी.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. कोकम चा उपयोग फार पूर्वीपासून आपल्या आहारात केला जातो. सुंदर राणी रंगाचे कोकमचे सरबत आपल्यापैकी अनेक जणांनी पीलेच असेल. कोकम या फळाचे आयुर्वेदिक औषधी गुणधर्म देखील आहेत. कोकम ला आपण आमसूल देखील म्हटले जाते. याची झाडं केरळ, कोकण आणि कर्नाटकात भरपूर प्रमाणात दिसून येतात. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते.

हे फळ सुकल्यानंतर त्याचे कोकम किंवा आमसुल म्हणून आपण वापर करतो. त्याचा रस काढून त्यापासून सरबत किंवा सोलकढी बनवली जाते. याच्या बियांचा देखील औषधी उपयोग असतो. कोकम मध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, प्रथिन, मॅंगनीज, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व क आढळून येते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्त शुद्ध करते तसेच, पित्तशमन करते, अत्यंत पाचक आहे. कोकम पचनास मात्र जड असते.

मित्रांनो आज आपण कोकम किंवा अमसूल या फळाचे औषधी गुणधर्म आणि त्यापासून मानवी शरीराला होणारे फायदे सविस्तर जाणून घेणार आहोत. १.पचना संबंधी व्याधीवर उपयुक्त असते कोकम. भूक वाढवणे, अन्नाची रुची वाढवणे, मल निचरा होण्यास मदत करणे हे कोकमचे प्रमुख कार्य होत. रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इत्यादी तक्रारी दूर होतात. व पचन चांगले होते.

२. पायाच्या भेगांवर रामबाण इलाज. अनेक लोकांचा पायाला थंडीमध्ये तसेच अस्वच्छता यामुळे भेगा पडतात. अशावेळी पाय गरम पाण्याने धुऊन स्वच्छ कोरडे करावेत. व भेगांमध्ये कोकमच्या तेलाचा घट्ट असा लेबल तयार करून लावा. असं केल्याने पायाच्या भेगा भरून येतात आणि पाय गुळगुळीत स्वच्छ होतात. ३. मूळव्याधीच्या त्रासापासून सुटका. एखाद्या व्यक्तीला भयंकर प्रमाणात मूळव्याधीचा त्रास होत असल्यास, रक्त पडत असल्यास यामध्ये कोकमचा कल्क दह्यामध्ये निवळी पाडून ते सेवन करावे. यामुळे हा त्रास लवकर संपतो.

हे वाचा:   जर एखाद्या व्यक्तीने कच्चा पालक खाल्ला तर काय होते.! पालकला आयुर्वेद का म्हणते अमृत.? हे आजार कायमचे नष्ट करते.!

४. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कोकमचे सर्वात नियमित पिल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास आपली मदत होते. कोकम मध्ये असे काही घटक असतात की ज्यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढीस लागते. यामुळे आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. ५. शीत पित्त दूर करण्यास उपयुक्त. नियमितपणे कोकमचे सेवन केल्याने सरबत पिल्याने तोंडाची चव वाढते तसेच गुणांनी अति उपयुक्त असल्याने शरीरातील शीतपित्ता चा त्रास दूर होतो.

६. शरीराचे तापमान थंड ठेवण्यास मदत करते. कोकममध्ये शरीराचे तापमान थंड ठेवण्यास चे गुणधर्म असतात. यामुळे ज्या लोकांना उष्णतेचा त्रास असतो त्या लोकांनी कोकम सरबत आवर्जून पिले पाहिजे. उन्हाळ्यात तर कोकम सरबत म्हणजे वरदानच होय. ७. त्वचेच्या अनेक विकारांवर उपयुक्त. त्वचेच्या अनेक प्रकारच्या आजारांमध्ये कोकम फायदेशीर ठरते. भाजलेल्या ठिकाणी अंगावर रॅशेस असल्यास किंवा पित्त उठल्यास खाज असल्यास त्याजागी कोकम चा रस लावावा.

विटामिन इ मुबलक प्रमाणात असल्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो. या सोबत केसांच्या अनेक तक्रारींवर देखील कोकम उपयुक्त असते. ८. थकवा कमी करून ऊर्जा देते. कोकम सरबत पिल्यामुळे प्रचंड प्रमाणात आलेला थकवा देखील दूर होऊन आपल्या शरीराला नवीन ऊर्जा मिळते. मैदानी खेळ खेळणार यांनी आणि लहान मुलांनी कोकम सरबत अवश्य घ्यावे. कोल्ड्रिंक ला अति उत्तम पर्याय म्हणजे कोकम सरबत ठरते.

हे वाचा:   ही वनस्पती देवानेच धरती वर पाठवली आहे, या वनस्पती मध्ये आहे अनेक आजारांना गायब करण्याची शक्ती.!

९. अजीर्ण होणे. अनेकदाजड अन्न खाल्ल्यास ते आपल्याला पचायला जड जाते. त्यामुळे अजीर्ण होते अशावेळी तहान खूप लागते. पोट फुगते त्यामध्ये एक ग्लासभर पाण्यामध्ये मूठभर कोकम घाला. कोकमचे पाणी अर्धा अर्धा तासाने प्यावे. यामुळे शौ’चास साफ होऊन आराम मिळतो. १०. पित्तावर गुणकारी. अंगावर पित्त उठल्यास कोकमचे सरबत तर घ्यावेच. शिवाय कोकम स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात व ती वाटून अंगावर चोळावे. त्यामुळे शरीरावर येणारी खाज बंद होते.

अशा प्रकारे कोकमचा उपयोग स्वयंपाक घरात तर होतोच परंतु त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा आपल्याला फार उपयुक्त ठरतात. अशा प्रकारे कोकम म्हणजेच आमसूल उपयोगात आणावेत. आणि इतरांनाही उपयुक्तता पटवण्यासाठी हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *