मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्या सोबत एक औषधी जडी बुटी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या वनस्पतीचे नाव आहे अश्वगंधा. या वनस्पती च्या फायद्याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. अश्वगंधा ची वनस्पती दोन ते पाच फूट उंच होते. या वनस्पतीची पाने रुईच्या पानांशी मिळतेजुळते असतात. अश्वगंधा चे फळ गुच्छ दार असतात. फळ पिकल्यावर लाल रंगाची होतात.
संपूर्ण जगभरात अत्यंत प्रसिद्ध नावाजलेली अशीही जडीबुटी आहे. आयुर्वेदामध्ये अनेक औषधीमध्ये या वनस्पतीचा वापर केला जातो. या वनस्पतीची मुळं पुरुषांचा स्टॅमिना वाढवण्याचे काम करतात. अश्वगंधाचे फायदे पूर्ण शरीरासाठी आहेत. याच्या सेवनाने मेंदूची कार्यप्रणाली चांगली होते. स्मरणशक्तीचे उपाय ही आहेत ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते.
अँटिऑक्सिडंट गुणधर्म मुळे एजिंग आणि अन्य आजार कमी होण्यास मदत मिळते. अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटंड आणि अँटिइन्फ्लेमेटरीचे गुणधर्म आढळतात. यामुळे हृदयासंबंधित समस्येपासून बचाव होतो. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात आणि शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी याची मदत होते.
अश्वगंधाच्या पानांमध्ये ट्रायथिलीन ग्लायकोल नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे झोप चांगली लागण्यासाठी मदत होते. तुम्हाला निद्रानाशाची समस्या असल्यास डॉक्टरांच्या मदतीने तुम्ही अश्वगंधा चे सेवन करू शकता. अश्वगंधामध्ये असलेल्या सिटोइंडोसाईड (Sitoindosides) आणि एसाईलस्टरीग्लुकोसाईड्स (Acylsterylguucosides) हे दोन्ही घटक शरीरामध्ये अँटिस्ट्रेस चे काम करतात.
यामुळे तणावापासून मुक्ती मिळते. पुरूषांमधील यौनक्षमता वाढवण्यासाठी आणि वीर्य अधिक चांगले बनवण्यासाठी याचा उपयोग होतो.यामध्ये असणारे हायपोग्लायमिक गुण ग्लुकोजचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात. तसं पाहता मधुमेह हा असा आजार आहे जो एकदा झाला की बरा होत नाही पण तुम्ही अश्वगंधाचा वापर करून तुम्ही साखर नियंत्रणात ठेवू शकता.
असे एक ना अनेक फायदे अश्वगंधा या वनस्पतीचे आहेत. कर्करोग, थायरॉईड, वजन वाढलेले असल्यास, त्वचेवर वर सूज येणे, केसांच्या तक्रारी यांसारखा समस्यांवर देखील अश्वगंधा आहे अत्यंत फायदेशीर ठरते. परंतु याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा. गर्भवती स्तनपान करणाऱ्या महिलांनी सावधगिरी बाळगावी. माहिती आवडल्यास आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.