लोक आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. चेहरा सुंदर आणि पांढरा करण्यासाठी लोक बाजारातून रासायनिक समृद्ध क्रीम आणि सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. त्यामध्ये रासायनिक पदार्थांच्या अस्तित्वामुळे ते चेहऱ्यासाठी धोकादायक असतात. तेलकट त्वचेच्या लोकांना त्यांच्या चेहऱ्याची थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते.
त्वचेच्या काळजीसाठी महाग सौंदर्य उत्पादने लागू करण्याची देखील आवश्यकता नाही. चेहऱ्याचे डाग, मुरुम,पुरळ काढून चेहरा स्वच्छ, सुंदर आणि पांढरा करण्यासाठी अनेक उपाय आहेत. काही वेळेला ऊन्हामुळे आपली त्वचा काळी पडते. आणि त्वचा काळी पडल्याने चेहरा चांगला दिसत नाही. म्हणूनच आज आपण एक उपाय बघणार आहोत.
यासाठी आपल्याला लागणार आहे हळद पूड. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा आहे. हळद केवळ आपल्या आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेसाठीही वरदान आहे. फेस पॅकमध्ये हळदीचा वापर केल्यास चेहऱ्यावरील डाग, मुरुम कमी होण्यास मदत मिळते. हळदीतील अँटी ऑक्सिडेंट आपल्या त्वचेचं संरक्षण करतात. महागड्या क्रीम वापरण्याऐवजी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये हळदीचा समावेश करून पाहा.
हळदीमुळे आपली त्वचा उजळण्यास मदत होते. हळदमध्ये कर्क्युमिनोइड नावाचे घटक असते. जे शरीराला अँटी ऑक्सिडेंटचा योग्य वापर करण्यास मदत करतात. अँटी ऑक्सिडेंट आपल्या त्वचेच्या पेशींचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतात. पण आपल्याला या उपायासाठी छोटा अर्धा चमचा हळद लागणार आहे. जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही ती कमी सुद्धा घेऊ शकता. यात आता मिक्स करायचे आहे कोलगेट.
तुम्हाला माहीत आहे का की, टूथपेस्ट केवळ दातांसाठीच नाही तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे पोर्स बंद होतील, स्कीन टाइट होईल आमि चेहरा ग्लो करायला लागेल. टूथपेस्टमध्ये असलेल्या हर्बल गोष्टींमुळे जसे की, मध आणि लवंगमुळे चेहरा खुलतो. ब्लॅकहेड्सही अनेकांना होणारी मोठी समस्या आहे. हे दूर करण्यासाठी तुम्ही पेस्ट वापरू शकता.
व्हायटनिंग प्रॉपर्टी असलेले टूथपेस्ट सनटॅन दूर करण्यासाठी फायदेशीर असतात आणि त्यासोबतच याने स्कीनवर ग्लो सुद्धा येतो. म्हणूनच यात आपण कोलगेट चा वापर करत आहोत. आणि यात आता मिक्स करायचा आहे कोणताही शाम्पू किंवा फेस वॉश. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून चेहऱ्याला लावून ठेवावे. आणि चेहरा सुकल्यावर ते व्यवस्थित धुवून टाकावे.
याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसेल. चेहरा खूप खुललेला दिसेल. चेहऱ्यावरचा काळपटपणा कमी झालेला दिसेल. चेहऱ्यावर असलेले डाग घालवण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे. म्हणून तुम्ही नक्की हे करून पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.