हल्ली आपल्यापैकी अनेक जण घरी बसून काम करत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून वर्क फ्रॉम होम नादामध्ये आपण तासनतास कॉम्प्युटर मोबाइल फोन लॅपटॉप यांच्यावर जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. दिवसभर आपल्यापैकी अनेक जण या यंत्रांचा वापर करून एका ठिकाणी जास्त बसून राहतात.जास्त वेळ मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरल्याने आपल्या डोळ्यांवर ताण पडतो.
आपल्यापैकी अनेकांना वारंवार डोळे दुखणे, डोळ्यातून पाणी येणे,डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, चष्म्याचा नंबर वाढणे, डोळ्यांमुळे डोके दुखणे यासारख्या समस्या त्रास देत आहेत. डोळे दुखायला लागल्यावर आपल्यापैकी अनेक जण दुर्लक्ष करत असतात परंतु आपणास सांगू इच्छितो की डोळे हे आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे जर आपण डोळ्यांची काळजी घेतली नाही तर भविष्यात तुम्हाला आंधळे पण येऊ शकतो.
मोतीबिंदू डोळ्यांच्या संबंधित असलेल्या अनेक आजार सुद्धा उद्भवू शकतात म्हणूनच डोळ्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची हलगर्जी अजिबात करू नका. आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहोत हा उपाय करत असताना आपण आपल्या डोळ्यांचे आरोग्य कसे चांगले राहणार आहे याची काळजी घेणार आहोत.
पण त्याचबरोबर आपल्या शरीरातील अन्य सभासद केल्यापासून कशा पद्धतीने नष्ट होतील याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये डोळ्यांचे आरोग्य मजबूत राहण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत परंतु आपल्यापैकी अनेकांना हे उपाय कसे करायचे याबद्दल फारशी माहिती नसते परिणामी आपण आयुर्वेदिक उपचार जास्त करत नाही.
आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहोत ती एक रेसिपी आहे. ही रेसीपी केल्याने तुमच्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहणार आहे.
ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही पदार्थ लागणार नाही आणि जे पदार्थ लागणार आहे ते आपल्या आजूबाजूला सहज रित्या उपलब्ध होतात, चला तर मग जाणून घेऊया.
ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला हिरवे चने लागणार आहे. (हरभरा) याचे फायदे भरपूर आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, प्रोटीन, कॅल्शियम, दातांची समस्या दूर करू शकतो, केसांसाठीही तेवढच उपयोगी आहे. हे चणे आपण कच्चे देखील खाऊ शकतो. हे चणे अनेक प्रकारे बनवून आपण रोजच्या जेवणात खात असतो. पण आज जो प्रकार आपण पाहणार आहोत. तो थोडासा वेगळा आहे. आणि आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे.
आपल्याला प्रथम चणे घ्यायचे आहे त्याचे समान ३भाग करून घ्या,४-५ मिरच्या,७-८ लसूण च्या पाकळ्या सुद्धा घ्यायचे आहे. आता लसूण, मिर्ची आणि चण्याचा एक भाग मिक्सर मध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. आता एक भांडे गॅस वर ठेवून त्यात एक चमचा राईच तेल घ्या, त्यात एक चमचा जीर टाका, आणि थोडंसं हिंग टाका आता जे उरलेले चणे आहेत ते त्यात टाका आणि चण्याची पेस्ट टाका.
आता त्यात थोडी हळद टाकून जर तुम्हाला पाहिजे असल्यास थोडीशी मलई त्यात टाकून घ्या आता ह्या मिश्रणाला २-३ मी शिजू द्या . त्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ, काश्मिरी लाल मिरची, आणि धना पावडर टाकून घ्या आणि आता ह्या मिश्रणाला मिक्स करून शिजु द्या. थोड्यावेळाने त्यात थोडंसं गरम पाणी टाका आणि ह्या मिश्रणाला अजून २मी शिजू द्या. त्यानंतर त्यावर थोडी ओली कोथींबीर टाकून चपाती किंवा राइस सोबत तुम्ही खाऊ शकता.
तर आजची ही हरभरा रेसिपी आपण बनवलेली आहे ती अत्यंत उपयुक्त आहे ही रेसिपी तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जरी खाल्ले तरी तुमच्या शरीरातील अनेक समस्या दूर होणार आहेत त्याचबरोबर आपल्या डोळ्यांना शक्तीदेखील प्रधान होणार आहे तुमची नजर तेज होईल परिणामी भविष्यात डोळ्यांना लागलेल्या चश्मा लवकर निघून जाईल. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद!
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.