मित्रांनो, अनेकांना त्वचेसंबंधित वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. त्यासाठी अनेक क्रीमचा देखील आपण वापर करीत असतो. तसेच डॉक्टरांचा देखील सल्ला घेत असतो. परंतु सल्ला घेऊन देखील काहीही फरक पडत नाही. आपल्या या समस्या दूर होत नाहीत. त्यामुळेच आपण हतबल होऊन जातो. तोंड येणे, चेहऱ्यावर काळे डाग, पांढरे डाग असतील तर काही घरगुती उपाय जर तुम्ही केलेत तर हे सर्व डाग निघून जातात.
मित्रांनो अनेकांना ओठावरती फोड येतात तसेच जिभेवर देखील फोड येत असतात त्यामुळे यावरती कोणता उपाय करावा हे आपल्याला सुचत नाही. ओठांवरचे तसेच जिभेवरचे फोड नाहिसे करण्यासाठी आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे आपली ही समस्या क्षणात दूर होईल. चला तर मग जाणून घेऊयात हे घरगुती उपाय नेमके कोणते आहेत ते. मित्रांनो, या उपायासाठी आपल्या आजूबाजूला असणारे कोरफड उपयुक्त ठरते.
आपणाला कोरफड घेऊन त्यावरील साल काढून घ्यायची आहे आणि आतील जो गर आहे तो जिभेवरती लावायचा आहे. हा गर आपणाला ज्या ठिकाणी फोड वगैरे आले असतील त्या ठिकाणी लावायचं आहे. या कोरफडीचा स्वाद कडू असला तरी आयुर्वेदात या कोरफडीला खूपच महत्त्वाचे स्थान आहे. हा उपाय तीन दिवस केल्याने जिभेवरती तसेच तोंडावर आलेले फोड नाहीसे होतात.
एकदा लावलेला हा कोरफडीचा गर नंतर वापरायचा नाही. दुसरा नवीन गर घेऊन तो वापरायचा आहे. दिवसभरामध्ये दोन वेळा हा उपाय करायचा आहे. सलग तीन दिवस हा उपाय केल्याने आपणाला नक्कीच परिणाम दिसून येईल. दुसरा उपाय आहे त्या उपायासाठी आपणाला तुळशीचा वापर करायचा आहे. तुळस ही उन्हाळ्यामध्ये खूपच फायदेशीर ठरते. गडद कलर असणारी तुळस आपल्याला घ्यायची आहे.
या तुळशीची पाने स्वच्छ धुऊन घ्यायची आणि ते बारीक करून घ्यायची आहेत. ही बारीक केलेल्या तुळशीचा रस आपणाला आपल्या चेहऱ्यावर पांढरे डाग किंवा काळे डाग असतील तर त्यावर तो लावायचा आहे. या रसांमुळे आपणाला आराम मिळतो. रस काढल्यानंतर राहिलेली तुळस असेल त्या तुळशीमध्ये तुम्ही नवीन तुळशीची पाणी टाकून बारीक करून नंतर त्याचा वापर करू शकता.
दिवसभरात दोन वेळा तुम्हाला हा रस लावायचा आहे. असे सलग तीन दिवस केल्याने हे डाग पूर्णपणे गायब होतील. तीसरा उपायासाठी आपणाला लागणार आहे वेलदोडे. जर आपणाला गॅस, अपचनाचा त्रास असेल तर वेलदोड्याचा वापर केल्याने हे आजार देखील दूर होतात. मित्रांनो वेलदोडे हे आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतात. तुम्हाला वेलदोडे पापुद्रा सहित बारीक करायचे आहेत.
यामध्ये थोडीशी तुम्ही साखर घालू शकता. 1/4 चमचा तुम्ही वेलदोड्याची पावडर घेतली असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा मध घालायचा आहे. हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत आणि हे मिश्रण तुम्हाला आपल्या बोटाने जिभेवर, ओठावरती लावायचे आहे. तुम्हाला जर तोंडाच्या अल्सरची समस्या असेल तर तोंडावर तुम्ही हे मिश्रण लावायचे आहे.
लावल्यानंतर अर्धा तास तुम्हाला तसेच थांबायचे आहे म्हणजेच लावलेले मिश्रण खाली पडू नये याची काळजी आपण घ्यायची आहे. तुम्हाला दिवसभरात दोन वेळा हे लावायचे आहे. असे तीन दिवस करायचे आहे. अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही आपले तोंड धूऊ शकता. मित्रांनो आपल्या आजूबाजूला पेरूचे झाड आपल्याला आढळते. या पेरूच्या झाडाची कोवळी पाने जर तुम्ही चावून खाल्ली तर तोंडामध्ये असणारे अल्सर दूर होऊ शकतात.
तसेच दात स्वच्छ करण्यासाठी देखील या पानांचा उपयोग फायदेशीर ठरतो. जर तुम्ही कोवळी पाने तसेच चावून खाऊ शकत नसाल तर मित्रांनो वेलदोडे आणि मधाचे जे आपण मिश्रण बनवलेले असते ते या पानांमध्ये घेऊन तुम्ही हि पाने खाऊ शकतात. दिवसभरात दोन वेळा तुम्ही जर ही पाने खाल्ली तर तोंड येण्याची समस्या दूर होऊन जाईल. सलग तुम्ही तीन दिवस हे करत रहा.
तसेच पेरूच्या झाडाच्या कोवळ्या पानांचा रस तुम्ही काढून तोंडाला तसे दाताला लावल्यास तोंडातील अल्सर गायब होतो. तसेच आपले दात स्वच्छ दिसायला लागतात. हा उपाय तुम्ही दहा ते पंधरा दिवस केल्यानंतर याचा परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येईल. तर मित्रांनो अनेकांना तोंड येणे तसेच पुरळ उठणे, चेहऱ्यावरती काळे डाग अशा समस्या असतील तर वरील सांगितलेले उपाय जर तुम्ही केलेत तर या सर्व समस्या दूर होतील.
मित्रांनो हा घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अधिक माहिती साठी जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारची माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.