उन्हाळा हा तसा उष्णतेचा ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारचे विकार होत असतात. सर्वात जास्त विकार निर्माण होतात ते म्हणजे त्वचा विकार. उन्हाळ्यामध्ये त्वचा विकाराचा त्रास खूपच जास्त प्रमाणात झालेला दिसत असतो. कारण उष्णतेमुळे त्वचेवर वेगवेगळे फुटकुळ्या फोड निर्माण झालेले दिसत असतात. अशातच घामामुळे व उष्णता मुळे घामोळ्या, लाल पुरळ हे येत असतात.
घामोळ्या आल्यावर यावर खूपच आग होऊ लागते. तसेच संपूर्ण शरीरावर हे निर्माण होत असते. घामोळ्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पावडरचा उपयोग करून बघत असतो परंतु याचा काही फायदा आपल्याला होत नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक आयुर्वेदिक पद्धतीचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमचे उन्हाळ्यामध्ये निर्माण होणारे सर्व त्वचाविकार नष्ट होतील.
हा उपाय तुम्ही अगदी घरगुती पद्धतीने करू शकता. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या उपायाविषयी सविस्तर पणे माहिती सांगणार आहोत. हा उपाय कशाप्रकारे करावा हा उपाय करण्यासाठी कोणकोणत्या साधनांची आवश्यकता भासेल हे सर्व आपण सविस्तरपणे पाहूया. या उपायाने केवळ एवढ्याच समस्या थांबत नाही तर पायाची जळजळ, केसात कोंडा होणे, केस गळती होणे, यासाठी देखील हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रिठा लागणार आहे. आपल्याला या उपायासाठी चार ते पाच रिठा लागणार आहे. सर्वप्रथम हे रिठा फोडून घ्यावी व यामध्ये असलेले बिया बाजूला काढून ठेवावे. त्यानंतर या रिठा खलबत्त्यामध्ये चांगल्याप्रकारे बारीक कुटून घ्यावे. कुटलेला हा पदार्थ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यावा व त्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकावे. पाणी टाकल्यानंतर याला हाताने ढवल्या नंतर यातून फेस निघेल.
हा फेस घेऊन ज्या ठिकाणी घामोळ्या आलेल्या आहे किंवा लाल पुरळ उठलेले आहे त्या ठिकाणी हा फेस लावावा. हा फेस लावल्यानंतर तुम्हाला होत असलेली चुनचुन कमी झालेली दिसेल. तसेच काही दिवसातच सर्व घामोळ्या व लाल पुरळ नाहीसे होतील. ज्या लोकांना तळपायाची आग होत आहे अशा लोकांनी देखील तळपायांना हा फेस लावावा.
तुम्ही जर या मिश्रणाला तुमच्या केसांना अगदी मुळापर्यंत लावले. तर यामुळे केसांमध्ये असलेला कोंडा सर्व गायब होतो तसेच जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल तर यासाठी देखील हा उपाय खूपच उपयुक्त ठरेल. फक्त या मिश्रणाला तुम्हाला केसांच्या मुळापर्यंत लावायचे आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.