घरात एकही उंदीर शिल्लक राहणार नाही.! उंदरांना या एका गोष्टीपुढे झुकावेच लागेल.! एक एक उंदीर जाईल पळून.!

आरोग्य

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेकांना वेगवेगळ्या समस्या सतावत असतात. काही आरोग्याच्या समस्या असतात, तर काही बिना आरोग्याच्या समस्या असतात आणि या सगळ्या समस्यांपासून सुटका मिळवत अनेकांच्या नाकी नऊ येत असतात. अशीच एक समस्या अनेकांना त्रास देते ती म्हणजे उंदीर असण्याची. होय, उंदीर आपल्या सर्वांना माहितीच आहेत. बहुतेक वेळा उंदीर आपल्या घरामध्ये अचानक शिरतात आणि एकदा का घरामध्ये उंदीर शिरल्यावर त्यांना बाहेर काढणे आपल्यापैकी अनेकांसाठी मुश्किल होऊन बसते.

उंदीर घरात शिरल्यावर आपले कपडे,वह्या, पुस्तक किंवा अन्नधान्यांची नासधूस करत असतात. अनेकदा अनेक ठिकाणी उंदरांनी पैसे देखील कुरतडलेले आहेत म्हणजेच दहा, वीस, पन्नास किंवा पाचशेच्या नोटा देखील उंदरांनी खाल्लेले आहेत.उंदीर हा असा प्राणी आहे, जो एकदा घरामध्ये शिरल्यावर मोठ्या प्रमाणावर धुडगूस घालत असतो तसेच घरामध्ये अन्नाची देखील करतात. हे उंदीर घरात शिरल्यावर दिवसभर शांत असतात परंतु जशी रात्र होते व घरातील सर्व लाईट बंद झाल्यानंतर हे उंदीर बाहेर पडतात.

आपल्यापैकी अनेक जण उंदरांचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना करतात. अनेक जण पिंजरा देखील घरामध्ये लावतात परंतु उंदीर काही त्यामध्ये अडकण्याचे नाव घेत नाहीत उलट उंदीर घरातील चपाती खाऊन बाहेर पळून जातात. रात्री अनेकदा इकडे तिकडे फिरत असताना सकाळी उठल्यावर आपल्याला उंदरांचे मलमूत्र पाहायला मिळते, यामुळे देखील घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील बसू शकतात.

बहुतेक वेळा उंदरांच्या अंगावर जे बारीक केस असतात ते इकडे तिकडे पडण्याची शक्यता असते त्यामुळे देखील प्लेग सारखा आजार होऊ शकतो. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर अशावेळी घरामध्ये उंदीर असणे अत्यंत विषारी आहे त्यामुळे मुलांना इन्फेक्शन देखील होऊ शकते. जर तुम्ही खूप सारे उपाय करून थकलेला असाल परंतु उंदीर काही घराच्या बाहेर जाण्याचे नाव घेत नसतील तर अशावेळी देखील अनेकदा चिंता होत राहते.

बाजारामध्ये उंदीर पळवण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक पदार्थ उपलब्ध असतात परंतु हे पदार्थ खाल्ल्यानंतर उंदीर आपल्या घरामध्येच मृत पावतात यामुळे देखील घरामध्ये इन्फेक्शन होऊ शकतात म्हणून या सगळ्या समस्येपासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी आजच्या या लेखांमध्ये आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. या उपायाच्या माध्यमातून लवकरच आपल्या घरातील उंदीर बाहेर जातील चला तर मग जाणून घेऊया आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहेत.

हे वाचा:   दुखण्यामुळे आलेला थकवा असा घालवा, हे एवढे अशा प्रकारे घ्या शरीरात येईल भरपूर ऊर्जा...!

आपल्या घरामध्ये धुळगुस घालणाऱ्या उंदरांना लगाम लावण्यासाठी आपल्याला पुदिनाचा वापर करायचा आहे. पुदिन्याचा सुगंध उंदरांना अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच ज्या ठिकाणी पुदिना असतो त्या ठिकाणी उंदीर जास्त वेळ राहत नाही म्हणूनच आपल्याला पुदिन्याची पाने कापसामध्ये गुंडाळून ज्या ज्या ठिकाणी उंदीर येतात त्या ठिकाणी ठेवायचे आहे किंवा पुदिन्याच्या पानांचा रस आपण उंदरांच्या बिळाजवळ देखील ठेवू शकतो.

यामुळे उंदीर या ठिकाणी ये जा करणार नाही. त्यानंतर तुम्ही उंदीर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात ये जा करत असतात अशा ठिकाणी आपण लाल मिरची पावडर ठेवायची आहे. लाल मिरची पावडर ठेवल्याने उंदीर घरामध्ये जास्त वेळ थांबत नाही कारण की याचा सुगंध तसेच या मिरची ची चव ही तिखट असते आणि म्हणूनच अशा वेळी सुगंधातील तिखटपणा उंदरांना आवडत नाही. या वासामुळे देखील उंदीर जर घरामध्ये थांबले असतील ते देखील बाहेर निघून जातील.

आपल्यापैकी अनेकांना तेजपत्ता माहितीच असेल. तेजपत्ता हा एक मसाल्यातील पदार्थ आहे. जर आपण तेजपत्ता घरामध्ये चुरा करून ठेवला तरी उंदीर घराबाहेर निघून जातात तसेच जर तुम्हाला घरामध्ये प्राणी पाळायची आवड असेल तर अशावेळी घरामध्ये मांजर नक्की पाळा,कारण की मांजर आणि उंदीर यांचे शत्रुत्व आहे आणि ज्या घरामध्ये मांजर असते त्या घरांमध्ये उंदीर कधीच वास्तव्य करत नाही आणि म्हणूनच कोणताही उपाय न करता तुमच्या घरातील उंदीर सहजच बाहेर निघून जातील.

आपल्या घरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये जर उंदीर इजा करत असतील तर अशावेळी तुम्ही घरामध्ये पिंजरा देखील लावू शकता. या पिंजरामध्ये आपल्याला असे काही पदार्थ ठेवायचे आहेत ज्यामुळे उंदीर पिंजराकडे आकर्षक होतील. एकदा का उंदीर पिंजऱ्यामध्ये अडकले तर तुम्ही घराच्या बाहेर लांब अशा ठिकाणी उंदरांना सहज सोडू शकतात त्यानंतर आपल्या केसांच्या मदतीने देखील आपण उंदरांना घराच्या बाहेर काढू शकतो.

हे वाचा:   उन्हाळ्यात गरम पाणी पीत असाल तर एकदा नक्की वाचा.! असे करणे बरोबर की चुकीचे.! बघा काय आहे समोर.!

जर उंदरांनी आपले केस खाल्ले किंवा गेले तरी त्यांना अन्नपचन करण्यासाठी त्रास होतो अशा वेळी आपण आपल्या केसांचा उपयोग उंदरांना पळवण्यासाठी सहजरित्या करू शकतो म्हणूनच उंदीर नेहमी मानवांच्या केसांपासून लांबच राहतात. आपल्या घरातील उंदरांना बाहेर पळवण्यासाठी आपण उंदरांच्या वाटेवर कांद्याचा रस देखील शिंपडू शकतो किंवा कांदा ठेवू शकतो. आपल्या सर्वांना माहिती आहे कांद्याचा वास हा उग्र असतो आणि अशावेळी हा उग्र वास उंदरांना अजिबात पसंत नाही यामुळे देखील उंदीर आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही.

जर तुमच्या घरामध्ये उंदीर असतील तर ते बाहेर निघून जातील परंतु हा कांदा आपल्याला जास्त वेळ घरामध्ये ठेवायचा नाही अन्यथा कांद्याच्या वासामुळे घरात देखील तुम्हाला विनाकारण त्रास सहन करावा लागू शकतो. घरातील उंदरांना बाहेर पडण्यासाठी पुढील उपाय म्हणजे उंटाच्या डाव्या पायाचा नख. ज्या ठिकाणी उंदीर जास्त प्रमाणामध्ये येतात अशा ठिकाणी जर आपण उंटाच्या डाव्या पायाचा नख ठेवल्यास उंदीर जास्त प्रमाणात येत नाही.

हा उपाय तसा पाहायला गेलं तर कठीण आहे त्याचबरोबर उंदीर ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये नास धुस करतात अशा ठिकाणी देखील आपल्याला काळी मिरी ठेवायची आहे.काळीमिरी ठेवल्याने उंदीर त्या जागी जास्त वेळ राहत नाही, अशा प्रकारे आपण घरातील काही छोटे-मोठे उपाय करून देखील उंदरांना न मारताच घराच्या बाहेर पळवू शकतो. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.