आज आपण डोळ्यांच्या तक्रारींवर एकमेव उपाय बघणार आहोत. डोळे लाल होणे, डोळे जळजळणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे दुखणे, डोळ्यावर वरचेवर ताण येणे अशा सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या आजारांवर आपण आज नैसर्गिक उपाय बघणार आहोत. जर नियमित आपण संगणकावर म्हणजेच कॉम्पुटरवर काम करत असाल तर, दररोज तुम्ही डोळ्यांचा व्यायाम करावा. डोळ्यांच्या व्यायामाने डोळ्यांवरचा ताण निघून जाण्यास मदत होते.
असे सगळेच जण आपल्याला सांगत असतात. पण त्यातही काही चुकीचे नाही. डोळ्यांना अ जीवनसत्त्व आणि प्रोटीन्सची गरज असते. हा उपाय केल्याने डोळ्यांचे सगळे आजार बरे होतात तसेच या उपायामुळे कोणताही दुष्परिणाम होत नाही. या उपायमध्ये आपल्याला लागणार आहे. शेवग्याचा पाला, गोरखमुंडी वनस्पती, पळसाची फुले.
शेवग्याची पाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.
तसेच कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी अशी भरपूर जीवनसत्त्वे शेवग्यामध्ये आढळतात. १०० ग्राम शेवग्याची पाने स्वच्छ धुवून ही पाने अर्धा लिटर पाण्यात टाकावीत. नंतर कुकर घेऊन हे पाणी त्यात ओतावे. त्यात १०० ग्राम गोरखमुंडी वनस्पतीची फुले घ्यावी आणि ही सुद्धा त्यात टाकावी. गोरखमुंडी(Gorakhmundi ) ही एक सुगंधित औषधी वनस्पती आहे जी संपूर्ण भारतभर आढळते, परंतु दक्षिण भारतात ही मुबलक प्रमाणात आढळते.
गोरखमुंडी साधारणतः पावसाळ्याच्या शेवटी वाढू लागतो आणि हिवाळ्याच्या हंगामात याला फुलं आणि फळं येण्यास सुरुवात होते. गोरखमुंडीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, ज्याचा उपयोग आयुर्वेद आणि युनानी या औषधी प्रणालीत अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला गेला आहे. या वनस्पतीचा संपूर्ण भाग जसे की, मुळं, फुले व पाने यासारख्या बर्याच रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे.
तसेच या वनस्पतीमध्ये मधुमेह, ताप, खोकल्यापासून पोटातील आजार, पोटातील जंत, अपचन, कावीळ इत्यादींच्या उपचाराचे गुणधर्म आहेत. गोरखमुंडीचा उपयोग डोळा, कान, नाक आणि घशातील विकार आणि नेत्र रोगविज्ञानातील विविध विकारांसाठी केला जातो. काही काळ ते सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढू शकते. या वनस्पतीच्या मदतीने डोळ्यांचा लालसरपणा देखील दूर होतो.
म्हणून ही खूप फायदेशीर वनस्पती आहे. तसेच आपल्याला लागणार आहे पळसाची फुले १०० ग्राम. पळसाची फुले आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील उष्णता निघून जाते. शरीराला थंडावा मिळतो. अति उष्णता गरमीचा प्रादुर्भाव दिसत नाही. ही फुले थंड असल्याने डोळ्यातील उष्णता बाहेर निघते आणि डोळे साफ होण्यास मदत होते. हे मिश्रण एकत्र करून ते कुकरला लावावे आणि गॅस वर ठेवावे.
त्याआधी कुकरची शिट्टी काढून त्या कुकरच्या वरच्या शिट्टीच्या जागेवर एक पाईप लावावा. आणि त्या पाईपाच्या दुसऱ्या बाजूस एक भांडे लावावे जेणेकरून शिट्टीतून येणाऱ्या पाण्याची वाफ किंवा वाफेचे पाणी जमा होऊन ते तुम्ही वापरू शकता. हेच पाणी गोळा करून एक बाटलीत ठेवावे. आणि रोज दोन ते तीन थेंब डोळ्यात टाकावे. या उपायाने डोळ्यांचे सगळे आजार बरे होतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.