आपल्यापैकी अनेकजणांना भेंडीची भाजी खायला आवडत असेल आणि आपण अनेकदा भेंडीचे अनेक प्रकार बनवून खातच असू पण आज आपण भेंडीचा एक असा प्रकार जाणून घेणार आहोत. जो खाल्ल्यानंतर तुम्ही कायम त्याच प्रकारची भेंडीची भाजी खाल. ही भाजी बनविण्यासाठी आपल्याला रोजच्या वापरातील आता काही गोष्टी लागणार आहेत.
त्या गोष्टी वापरून आपण चविष्ट भाजी बनवू शकतो. ज्या लोकांना भेंडीची भाजी आवडत देखील नसेल ते देखील या भाजीचे सेवन आवडीने करतील. चला तर मग जाणून घेऊया ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे आणि याची प्रक्रिया काय असणार आहे. भेंडीची भाजी बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काही भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे.
त्यानंतर अगदी जाड किंवा अगदी बारीक न कापता मिडीयम स्वरूपाची आपल्याला कापून घ्यायची आहे. त्यानंतर गॅस वर एक पात्र ठेवून यामध्ये एक ते दोन चमचे तेल टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये तीन बारीक कापून घेतलेली तेल, लसुन टाकायचे आहे आणि एक चमचा जिरे टाकून मंद आचेवर फोडणी घ्यायचे आहे एक मिनिटानंतर लसुन, भाजुन घेतल्यावर यामध्ये आपल्याला कापून घेतलेली भेंडी टाकुन फ्राय करून घ्यायची आहे.
ही सर्व प्रक्रिया आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची आहे. यानंतर एक बारीक मिरची कापून घ्यायची आहे आणि तीन ते चार यामध्ये टाकायचे आहे. आणि त्यावर एक चमचा मिरची पावडर एक चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिश्रण एकत्रितपणे मिक्स करायचे आहे. आता परत या संपूर्ण मिश्रणला दहा मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे.
दहा मिनिटे शिजवून घेतल्यानंतर परत एकदा थोडसं वाढून आपण फ्राय करून घ्यायची आहे. हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला करत असलेली भेंडी झाकून शिजवायची नाही आहे. त्यानंतर परत एकद गॅस मंद आचेवर ठेवून सर्व भाजी एका बाजूला करून घ्यायची आहे आणि अर्ध्या बाजूला एक वाटी बेसन टाकून ते हलके भाजून घ्यायचे आहे.
आता हे बेसन थोडसे भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि ती थोडा वेळ परत एकदा मंद आचेवर फ्राय करायची आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला तीन समसे दह्यामध्ये थोडेसे पाणी टाकून हे दही भेंडी मध्ये टाकून आता हे मिश्रण मंद आचेवर कमीत कमी पाच मिनिटे शिजवायचे आहे जेणेकरून हे सर्व घटक एकमेकांमध्ये व्यवस्थित रित्या मिक्स होतील.
आता ही बनवून घेतलेली भाजी खाण्यासाठी तयार आहे आता तुम्ही या भाजीचा लाभ उठवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.