खाज खरुज ला आता सहन करू नका.! दोन दिवसात सर्व गायब होऊन जाणार.! आयुष्यात कधी त्वचा विकार होणार नाही.! रामबाण उपाय.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा कोणताही ऋतू असेल तरीदेखील कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्याला खाज येण्याच्या समस्येला तोंड द्यावेच लागते. आपल्यापैकी अनेक जणांना अशी समस्या झाल्याचे दिसून येते. अशा वेळी काय करावे कोणती काळजी घ्यावी हे सुचत नाही. त्याकरता आम्ही आज तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलो आहोत जे तुम्हाला अत्यंत फायद्याची ठरणार आहे.

सर्वप्रथम आपण बघूया तशी खाज सुटणे याचे काय कारण आहेत? कारण समस्या सारखी असेल तरी प्रकृतीनुसार व्यक्तीनुसार समस्येची तीव्रता आणि प्रकार थोड्याफार प्रमाणात बदलतात. आपल्या समस्येचे मूळ कारण काय शोधून यावर सर्वप्रथम उपचार केला पाहिजे. अनेक जणांचे त्वचा ही कोरडी त्वचा असते. अशी त्वचा असणाऱ्यांना थंडीच्या दिवसात खाज सुटण्याची समस्या वाढते.

पोटामध्ये उष्णता भडकल्यास देखील शरीरावर खाज सुटल्याचे दिसून येते. उष्ण गरम मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तसेच घामामुळे देखील अनेकदा खाज सुटते. त्वचेची योग्य निगा राखल्याने असे त्रास कमी होतात त्याशिवाय काही उपाय पोटातुन देखील करावे लागतात. बाजारात अनेक प्रकारचे विविध मलम उपलब्ध आहेत. तेलही उपलब्ध आहेत. परंतु हे वापरल्यानंतर यामध्ये रासायनिक घटक असल्याने त्वचेला अपायकारक ठरू शकते.

हे वाचा:   सतत चहा पिणारे नक्की वाचा.! चहा प्रेमी साठी खूपच महत्वाची बातमी.! अति चहा च्या सेवनाने काय होत असते.?

त्यामुळे घरगुती पदार्थ वापरून आयुर्वेदिक ज्ञानाच्या जोरावर बनवलेले औषध केव्हाही चांगले. याचा काहीही साईड इफेक्ट नाही. शिवाय यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू देखील सहज उपलब्ध होतात आणि मुख्यतः हे खूप महागही पडत नाही. अनेक लोकांना खूप जुनाट खाज येण्याची समस्या असते. कितीही जुनी समस्या असेल तरीदेखील हा उपाय केल्याने ती कायमची ठीक होईल.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणारा प्रथम घटक आहे तो म्हणजे जवस. जवसा मध्ये असे काही गुणधर्म असतात की ज्यामुळे आपली त्वचा मॉइश्चरायझ होते. व्हिटॅमिन बी, सि, ई व लोह, पोटॅशियम, फॉस्फरस अशा खनिजांनी समृद्ध असते जवस. यामुळे आपली त्वचा टवटवीत राहते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वाटी जवस कढईमध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे. काही वेळ थंड होऊ द्या. याच सेवन तुम्ही करा.

या उपायात दुसरा घटक आहे तो म्हणजे अक्रोड. दोन अक्रोड फोडून त्यातील गर काढा. पाण्यात भिजवा. आपल्या स्वास्थ्यासाठी अक्रोड म्हणजे वरदानच होय. अक्रोड मुळे आपल्या त्वचेला भरपूर फायदा होतो आपली त्वचा मऊ राहते. यामध्ये विटामिन ई,ओमेगा थ्री फॅटी ॲसिड, प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुमच्या त्वचेवर असणारे खाज खुजली ची समस्या त्वरित दूर होण्यास मदत होते. भिजवून खाल्लेले अक्रोड तुमच्या शरीराला थंडावा देतात.

हे वाचा:   चार दिवस दुधासोबत घेऊन बघा शरीराचे रोग दुर पळू लागतील.! नसाची कमजोरी- दबलेली नस, गॅस, बद्धकोष्ठता कायमची होईल दूर...!

दररोज कधीही कोणत्याही वेळी तुमच्या सोयीने भाजलेले जवस एक चमचा खा. परंतु भिजवलेले अक्रोड मात्र सकाळी रिकाम्या पोटी सेवन केलेलं उत्तम. अक्रोड खाल्ल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नका. सलग सात दिवस हे करून बघा तुम्हाला अत्यंत फरक जाणवेल. ज्यांना अक्रोड खाण्याचे शक्य नाही किंवा आवडत नाही त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी चार ते पाच कडुनिंबाची कवळी पाणी तोडून खावेत.

यासोबत उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज भरपूर प्रमाणात खा. काकडी मुळे देखील शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. अशाप्रकारे उपाय केल्याने तुमची त्वचा मॉइश्चरायझ होऊन खाज येण्याची समस्या होईल दूर. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *