आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक चुका करत असतो ज्याचा असर आपल्या शरीरावर दिसून येऊ शकतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आरोग्य संबंधाची खूप महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत. आपण दैनंदिन जीवनात करत असलेल्या चुकांचा आपल्या शरीरावर कसा प्रकारे परिणाम होऊ शकतो हे आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत.
जर तुम्ही देखील या चुका करत असाल म्हणजे अशी काही कामे करत असाल ज्याचा परिणाम तुमच्या थेट किडनी वर होऊ शकतो. तर आजच्या आज या सवयी तुम्ही बदलल्या पाहिजे अन्यथा तुम्हाला याचे भरपूर मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या सवयी ज्या आपण प्रामुख्याने बदलल्या पाहिजेत.
किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. किडनीमध्ये काही गडबड निर्माण झाल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यास जीवही जाऊ शकतो. किडनी फेल्युअरचा उपचार हा खूप खर्चिक असतो आणि जीवही धोक्यात असतो. म्हणूनच अशा चुका आपण करू नयेत ज्याचा वाईट परिणाम होईल.
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे किडनी खराब होते. आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती आहे, तरीही आपण त्याकडे लक्ष देत नाही. अशाच काही चुका आहेत ज्या आपण जाणूनबुजून किंवा नकळत करत राहतो. या चुका वेळीच सुधारायला हव्या. एका जागेवर जास्त वेळ बसने: ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे, पण जास्त वेळ बसून राहिल्याने तुमच्या किडनीला हानी पोहोचू शकते.
मात्र, बसल्याने किडनी खराब होण्याशी काय संबंध आहे, हे अद्याप संशोधकांना कळू शकलेले नाही. पण ही बाब समोर आली असेल, तर काळजी घ्यायला हवी. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा, हे तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे. औषधे जास्त खाणे: तुम्ही याआधी अनेकांच्या तोंडून हे ऐकले असेल किंवा वाचले असेल. वेदनाशामक औषधांचा मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो.
जिथे लहान औषध किंवा इतर काही घरगुती उपाय उपयोगी पडतात तिथे खूप हाय पावर चे औषध घेणे टाळावे. पाणी कमी पिणे: मूत्रपिंड आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. जर तुम्हाला किडनीची समस्या नसेल तर दररोज दीड ते दोन लिटर पाणी नक्कीच प्या. असे केल्याने तुम्ही किडनी स्टोन सुद्धा टाळाल.
जास्त मीठ खाणे: अनेकांना सवय असते की ते जेवणासोबत मीठ टाकून खातात. जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो, ज्यामुळे तुमच्या किडनीला जास्त काम करावे लागते आणि त्याचे नुकसान होते. त्यामुळे जेवणात कमीत कमी मीठ टाकावे. आपल्या आहारामध्ये मिठाचा कमीत कमी वापर करावा. यामुळे तुमचे आरोग्य देखील चांगले राहील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.