नारळ तेल आणि कॉफी पावडर मध्ये फक्त ही एक गोष्ट मिसळून लावा, वर्षानुवर्षे डाय मेहेंदी लावले विसरून जाल.!

आरोग्य

मित्रांनो नुकताच आलेला ‘बाला’ चित्रपट तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी बघितला असेल. केसांच्या समस्येवर अनुसरून भाष्य केले गेले, फक्त महिलाच नाही तर अनेक पुरुषांना सुद्धा अशा समस्यांना सामोरे जायला लागते, जे कोणत्याही व्यक्तीला कधीच आवडत नाही! आजकालच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात तर अकाली केस पांढरे होणे सामान्य झाले आहे.

कारण आता ६० नाही तर ३० वय असतानाच लोकांचे केस पांढरे होतात. अलीकडे तर याचं १८-२० वय झाले आहे. अवेळी केस का पांढरे होतात ते तुम्हाला माहित आहे काय? ह्यामागे अनेक कारण असतात. अवेळी केस पांढरे होणे ह्यामागे अनेक शास्त्रीय कारणे आहेत ते आधी जाऊन घेऊ मग उपाय आणि काही प्रो टिप्स ही पाहू… एका अभ्यासानुसार सतत डोकेदुखी आणि सायनसचा त्रास असलेल्यांचे केस लवकर पिकतात.

या शिवाय अति प्रमाणात ताण आल्याने, शरीरात केस काळे ठेवण्यासाठी जो मुख्य घटक असतो तो म्हणजे मेलानिन, त्यावर फरक पडतो आणि केस लवकर पांढरे होतात. विटामिन बी१२ ची कमतरता तसेच बाजारातील रासायनिक उत्पादनांचा बेसुमार वापर जसे हेयर कलर, शांपू, कंडिशनर, सिरम इत्यादी.. हे देखील केस सफेद होण्याची तितकेच महत्त्वाची बाब आहे.

हे वाचा:   आता म'रेपर्यंत पित्त होणार नाही.! आयुष्यात पित्तासाठी गोळी कधीच घ्यावी लागणार नाही, अपचन, गॅस, तोंड येणे उलटी सर्व होईल बंद.!

आजकाल लहान मुलांना तसेच तरुणांना देखील मधुमेह हा आजार होतो आहे. केस पांढरे होण्याचं हे देखील एक महत्वाचं कारण होय. मद्यपान, धुम्रपान, ड्रग्स हे तर झटपट केसं पिकवतात. शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे केसांना योग्य ते पोषण मिळत नाही, ह्यामुळे देखील केस पांढरे होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्रीच्या वेळी कामामुळे पुरेशी झोप न घेणे.

लवकर झोपून लवकर उठल्यास ताण ही कमी येतो मी केसांसंबंधीच्या सर्व तक्रारी अर्ध्या संपतात. आपलं रूप दिसणं आपल्याच हातात असतं, त्यामुळे त्याची कशी काळजी घ्यायची आणि केसांची कशाप्रकारे निगा राखावी हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. आता पाहुयात आपल्या शीर्षकात नमूद केल्याप्रमाणे उपाय. यासाठी तुम्हाला लागणार आहे सहा चमचे बारीक केलेली चहा पत्ती, दोन चमचे नेस कॉफी पावडर, सहा चमचे नारळाचे तेल.

हे सर्व मिश्रण एका वाटीमध्ये एकत्र करून घ्या. केसं स्वच्छ धुवून केसांच्या मुळांशी आठवड्यातून दोनदा लावा. सुमारे अर्ध्या तासानंतर सौम्य शाम्पूने केस धुवून टाका. नैसर्गिक प्रकारे तुमचे केस काळे होण्यास मदत होईल. टिप्स : १. रात्री १०-१०:३० ला झोपलेच पाहिजे. झोप आठ तासांची हवीच. २. पाणी भरपूर प्या. आहारात प्रथिनं, व्हिटॅमिन बी १२, फायबर असलेल्या गोष्टी वाढवा.

हे वाचा:   सातच दिवसात मुतखड्याचे काम तमाम, कितीही जुनाट मुतखडा असूद्या पडणार म्हणजे पडणार.!

३. शाम्पू, कंडिशनर, सिरम निवडताना आपले वय केस ब्रँड लक्षात घ्या. शक्यतो हरबल उत्पादन वापरावीत. ४. आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळेस तेलाने मालिश करून कोमट पाण्याने केस स्वच्छ धुतले पाहिजेत. ५. प्रत्येकी कंगवा वेगळा असू द्यावा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *