आता केस डाय करणे विसरावे लागेल, चुटकी भर कॉफी करून दाखवेल कमाल, केसांच्या सर्व समस्या होतील गायब.!

आरोग्य

प्रत्येकाला वाटत असते की आपण इतरांपेक्षा आणखी सुंदर दिसायला हवे. सुंदरते मध्ये आपले ओठ, डोळे, नाक, केस सर्व महत्त्वाचे असतात. केसांचे सौंदर्य टिकून ठेवणे देखील खूप गरजेचे असते. आज-काल अनेक पुरुष व स्त्रियांना केसा संबंधीच्या भरपूर अशा समस्या उद्भवू लागल्या आहेत. अगदी तरूण वयातील मुलांना देखील केस पांढरे होण्याची समस्या दिसून येऊ लागली आहे.

अकाली केस पांढरे होणे ही समस्या खूपच भयंकर असून यासाठी आपण वेगवेगळे उपाय करुन बघत असतो. बाजारामध्ये केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल युक्त पदार्थ उपलब्ध असतात याद्वारे केस काळे केले जाते परंतु यामुळे केसांची भरपूर प्रमाणात हानी देखील होत असते हे देखील तितकेच खरे आहे.

आपण आपले केस पांढरे होण्यामागचे कारण जाणून घेत नसतो. आहारामध्ये जर उपयुक्त व पौष्टिक आहार न आल्यामुळे तसेच चुकीचे खानपान केल्यामुळे केसांचे सौंदर्य बिघडले जाते. अनेकांना तर केस गळती ची देखील समस्या निर्माण होत असते. यामुळे केस पातळ होऊ लागतात. तर अशा अनेक समस्यांवर एक खूपच सोपा असा नैसर्गिक उपाय आहे.

हे वाचा:   मूळव्याध झाल्यावर अनेक लोक ही एक चुकी करतात.! मूळव्याध ची अशी काळजी घेतली तर कायमचा त्रास नष्ट होऊ शकतो.!

हा उपाय नैसर्गिक असून तुम्ही अत्यंत कमी साहित्यामध्ये घरीच करू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासेल. हा उपाय केल्यामुळे केसांचे सौंदर्य आणखी वाढले जाईल. तसेच पांढरे असलेले केस देखील काळे होतील. केसांची मजबुती आणखी वाढली जाईल. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा उपाय व कशाप्रकारे करायचा आहे हा उपाय.

सर्वप्रथम एका लोखंडी वाटीमध्ये चहा मध्ये वापरली जाणारी चहा पावडर घ्यावी व त्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकावे. त्यानंतर हे गॅसवर ठेवून थोड्यावेळ याला गरम होऊ द्यावे. गॅस वर याला काही काळ मंद आचेवर ठेवायचे आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा हळद टाकावी. हळदीमुळे केसांमधला कोंडा जात असतो.

काही वेळानंतर यामध्ये एक चमचा कॉफी पावडर टाकावी कॉफी पावडर कुठल्याही कंपनीचे असली तरी चालेल. याला चांगल्या प्रकारे थंड होऊ द्यावे त्यानंतर हे मिश्रण दोन वाट्यांमध्ये समप्रमाणात गाळून काढून घ्यावे. त्यापैकी एका वाटीमध्ये तुम्ही जे केसांना तेल लावता ते थोडेसे तेल टाकावे व दुसऱ्या वाटीमध्ये तुम्ही जो शाम्पू वापरतात तो शाम्पू त्यामध्ये टाकावा.

हे वाचा:   दुधात दोन चमचे बडीशेप टाकून काही दिवस पील्याने शरीरात दिसून आले हे बदल.! म्हाताऱ्या लोकांसाठी खूप महत्वाची आहे माहिती.!

दररोज रात्री जे मिश्रण तेल युक्त आहे ते मिश्रण रात्रीच्या वेळी केसांना अगदी मुळापर्यंत लावायचे आहे व सकाळच्या वेळी ज्या मिश्रणामध्ये शाम्पू टाकला आहे त्याने केस धुऊन काढायचे आहेत. हे जर तुम्ही महिन्याभरात पर्यंत केले तर यामुळे तुमच्या केसांना नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *