गुडघेदुखी चा वैताग आलाय काय.? मग आता हा उपाय करा आणि शांत झोपा.! गुडघेदुखी पळून जाईल.!

आरोग्य

वातावरणातील बदलामुळे आपल्यापैकी अनेकांना सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी ची समस्या त्रास देत असते. या समस्या मागे वेगवेगळी कारणे देखील असू शकतात. बहुतेक वेळा आपल्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्याने आपल्याला या वेदना त्रास देऊ लागतात, अशा वेळी अनेक जण डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करतात. काहीवेळा औषधोपचार केल्याने आपल्याला फरक जाणवतो परंतु वेदना पुन्हा सुरुवात होऊ लागते.

अशा वेळी आपण वैतागून जातो जर तुम्हाला सुद्धा गुडघे दुखी, कंबर दुखी, मान दुखी संधिवाताची समस्या नेहमी त्रास देत असेल तर अजिबात काळजी करू नका. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सगळ्या समस्यांवर औषध उपचार सांगण्यात आलेले आहेत. सांधेदुखीची समस्या घरच्याघरी दूर करण्यासाठी आपण आजच्या लेखामध्ये काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला काळीमिरी लागणार आहे.

काळीमिरी घरांमध्ये सहजरीत्या उपलब्ध असते. अन्नपदार्थांना चव देण्यासाठी काळी मिरी चा प्रामुख्याने उपयोग केला जातो.आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला काळी मिरची पावडर बनवून घ्यायची आहे. आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी आपल्याला आले लागणार आहे. आल्या मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर पडण्यासाठी मदत होते.

हे वाचा:   घरातले हे दोन पिठे तुमचा चेहरा उजळून टाकेल.! चेहरा इतका उजळून जाईल की कुठल्याही क्रीम ची गरज पडणार नाही.!

आले आपल्याला बारीक किसून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक ते दोन ग्लासभर दूध लागणार आहे. दुधामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते आणि आपल्या शरीरामधील जर कॅल्शियमचे प्रमाण कमी झाले असेल तर कॅल्शियम वाढवण्याचे कार्य दूध करत असते. आपल्यापैकी अनेकांना अवस्थांना चालताना- उठता- बसताना हाडांचा आवाज येत असतो.

हाडे ठिसूळ होत असतात.कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यामुळे हातापायांना पेटके येतात मुंग्या येतात या सगळ्या समस्या शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यामुळे होतात म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे, आता आपल्याला हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित एकत्र करून गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे. दूध व्यवस्थित गरम होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला धाग्याची खडीसाखर लागणार आहे. ही खडी साखर किराणाच्या दुकानावर सहज उपलब्ध होते. ही खडीसाखर आपल्या शरीराला शीतलता प्रदान करते. बहुतेक वेळा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराची लाही लाही होत असते,अशावेळी उष्णतेचे प्रमाण देखील वाढून जाते यामुळे देखील अनेकांच्या शरीरामध्ये वेदना जाणवत असतात. खडीसाखर च्या मदतीने आपण आपल्या शरीरातील अनेक वेदना दूर करू शकतो.

हे वाचा:   अनेक आजारांसाठी लाभदायक आहे सुपारी; जाणून घ्या सुपारीचे काही चमत्कारिक उपाय.!

हे मिश्रण व्यवस्थित उकळल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचे आहे, अशाप्रकारे आजचा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून तीन वेळा जरी केला तरी तुम्हाला लवकरच फरक जाणवू लागेल. हा उपाय रोज केला तरी तुमच्या शरीराला कोणताही दुष्परिणाम भोगावे लागणार नाही. हा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरले होते ते अगदी नैसर्गिक आहेत.आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी आपण तिळाचं तेल देखील वापरू शकतो.

रात्री झोपताना तिळाच्या तेलाने ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या बाधीत जागेवर आपल्याला हलकी मालिश करायची आहे. काही दिवस मालिश केल्याने तुमच्या शरीराला योग्य ती ऊर्जा देखील प्राप्त होईल तसेच पोषकतत्व देखील मिळतील म्हणून हा उपाय अवश्य करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *