नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्या केसांसाठी घेऊन आलो आहोत नैसर्गिक कलप (डाय). ही पद्धत नैसर्गिक असल्यामुळे तुमच्या केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही अगदी कोणीही वापरले तरी ही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार फायदा कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो परंतु नुकसान मात्र अजिबात होणार नाही. अत्यंत चांगला आहे हा उपाय जीव असतो तुम्ही कचऱ्या मध्ये नको आहे म्हणून फेकून देता त्याच वस्तू पासून आपण बनवणार आहोत एक अत्यंत भारी डाय!
कलप लावण्याच्या दोन पद्धती देखील आम्ही तुम्हाला सांगू. पूर्ण डाय लावून झाल्यानंतर देखील एखाद-दुसरा छोटा पांढरा केस राहिल्यामुळे तुमचा मूड खराब होतो असे होऊ नये यासाठी काय करावे ती देखील पद्धत तुम्हाला सांगत आहोत. साधारणपणे पांढरे झालेले केस तुम्ही कसे रंगवू शकाल ते पाहूयात. यासाठी तुम्हाला लागणार आहेत नारळाच्या साली ज्या नको आहेत म्हणून तुम्ही कचर्यात फेकून देता.
या नारळाच्या साली एका जुन्या लोखंडाच्या कढईमध्ये टाकून मध्यम आचेवर भाजून घ्या. लक्षात घ्या यातून धूर येतो त्यामुळे लहान मुलांना या पासून दूर ठेवा. तुम्हीदेखील सावधगिरी बाळगून चिमट्याने हलवत राहून व्यवस्थित या साली भाजून घ्या. हे जळून काळे होईल. कढईच्या आता आग पेटणार नाही याची काळजी घ्या. हे गार होऊ द्या आणि चमच्याने याची बारीक पावडर करून घ्या.
हातात ग्लोज घालून ही पावडर चाळणीने बारीक चाळून घ्या. ही झाली आपली काळ्या रंगाची नैसर्गिक पावडर तयार, जी आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तर तुम्ही केसांमध्ये नेहमी मेहंदी लावत असाल तर त्यामध्ये एक चमचा ही पावडर घालावी. अचानकपणे तुम्हाला कोठे बाहेर जायचं असेल आणि डोक्यात अगदी थोडे चार-पाच पांढरे केस डोकावत आहेत अशावेळी काय कराल?
त्यासाठी एक चमचा कोरफडीचा गर घेऊन त्यामध्ये थोडीशी ही काळी पावडर घाला. चांगल मिक्स करून पातळ ब्रशने जिथे पांढरे केस आहे तिथे लावा. आणि केस वाळल्यावर कंगव्याने केस व्यवस्थित विंचरा. तुमचे छोटे छोटे पांढरे केस होतील छूमंतर! दोन चमचे खोबरेल तेल घेऊन त्यामध्ये ही पावडर घालून एक गोळी विटामिन ई च्या मधील तेल घाला. आणि शेवटी कोरफडीचा गर त्यात घाला.
हे मिश्रण एकत्र करून पूर्ण केसांवर व्यवस्थित लावा. तीन ते चार तास तुम्ही हे डोक्यावर लावून ठेवा. त्यांनतर हरबल शाम्पूने केस धुवा. हा उपाय नेहमी करत राहिल्याने तुमच्या केसांना पोषण मिळून त्यांची क्वालिटी सुधारेल. काही टिप्स केस पांढरे होऊ नये यासाठी : १. दैनंदिन आहारामध्ये एक तरी आवळा खावा. २. भरपूर पाणी प्या. त्यामुळे केसांची कॉलिटी चांगली राहते आणि त्यांच्या तक्रारी कमी होतात.
३. रासायनिक उत्पादने जसे शाम्पू, हेअर कलर, कंडिशनर या ऐवजी घरगुती नैसर्गिक उत्पादन वापरा. ४. अकाली केस पिकणे यामध्ये आहारात हिरव्या पालेभाज्या डाळी फळे यांचे भरपूर प्रमाणात सेवन करा. ५. धूम्रपान मद्यपान रात्रीचे जागरण आणि अतिरिक्त ताण तणाव यापासून शक्यतेवढं दूर राहा. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.