पेरूचे झाड हे घरगुती झाड म्हणून ओळखलं जाते. आपल्या इथे आपल्या परसबागेत एक ना एक तरी पेरू चे झाड असत. कारण त्यावर पेरू येतात आणि आपण हे पेरू खूप आवडीने खातो. तुम्हाला माहित आहे का हेच पेरूचे झाड आपल्याला किती उपयोगी आहे? जर नसेल तर आज आपण पेरू च्या झाडा चा फायदे आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.
पेरूच्या झाडांच्या कच्चा पानांचा रस काढून प्यायल्यास पोटाचा आजार निघून जातो. जर तुम्हाला जुलाब (लूज मोशन) झाले असल्यास पेरूचे तीन ते चार पाने काढून त्याला मिक्सर मध्ये वाटून 50 एम एल पर्यंत त्याचा ज्यूस काढून रिकामी पोटी तो प्यायचा .जर तुम्हाला जास्त त्रास होत असल्यास दिवसातून दोन वेळा हा रस तुम्ही सेवन करू शकता. हा ज्यूस पोटाच्या आजारांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.
जर तुम्हाला दाताच्या समस्या त्रास देत असेल तर या पानांचा काढा करून गुळण्या केल्यास दातांचे आजारही दूर होतात. जर आपल्या दातातून र’क्त निघत असेल. हिरड्या सुजल्या असतील. तोंडातून येणारा घाण वास असेल.तर हा काढा खूप उपयुक्त आहे. हा काढा 30 किंवा 40 एम एल प्यायल्याने कोलेस्ट्रॉल मध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात घट होते.
जर तुमचे वजन जास्त असेल आणि कमी करायचे असेल तर त्यांच्यासाठी देखील हा काढा खूप उपयुक्त ठरतो. हे एक दोन महिने प्यायल्याने पूर्ण चरबी निघुन जाईल. ज्यांना शुगर म्हणजेच डायबिटीस चा आजार असलेल्यांना देखील हा काढा उपयोगी आहे. हा काढा रोज सकाळ संध्याकाळ 50 एम एल पिणे गरजेचे आहे त्याच बरोबर जर कोणाला नशा झाली असेल तर त्याला हा काढा दिल्यास हळूहळू त्याची नशा आपोआप उतरु लागेल.
काढा आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतो. आपल्या पैकी अनेकजणांना पेरूच्या पानांचे फायदे माहीत नसल्यामुळे आपण हे उपाय करू शकत नाही. ह्या काढा चे जर आपण नित्यनियमाने सेवन केले तर आपल्यासाठी हे खूप उपयोगी आहे.
वरील माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.