ब्युटी पार्लर मध्ये जाणे बंद करावे लागेल.! चेहरा एखाद्या अभिनेत्रीच्या वर सुंदर दिसेल.! सुंदर चेहऱ्यासाठी हे काम कराच.!

आरोग्य

मित्रांनो आपल्याला संपुर्ण शरीराचे प्रातिनिधीक सौंदर्य कोण दाखविते तर ती आपली त्वचा!त्वचा ही आपल्या संपूर्ण शरीराला व्यापुन असते..आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या आरसाच असते ती.म्हणुनच खुप थकले की त्याचे परिणाम त्वचेवरील भा किंवा तेज कमी होण्यात दिसुन येतात.दीर्घ मुदतीच्या आजारानंतर त्वचा निस्तेज बनते.जसजसे वय वाढते तसतसे त्वचेचे स्वरुप पण बदलत जाते.

छोट्या बाळाची त्वचा मनाला भुरळ घालते.तिचा स्पर्श हवाहवासा वाटतो.त्या कडे पाहुन मन प्रसन्न होते.हाच टवटवीतपणा कायम टिकवायचा असेल…अगदी चाळीशीनंतरही तर त्वचेसाठी काही काळजी घ्यायलाच हवी. त्वचेचे प्रकार…ढोबळ मानाने
रुक्ष त्वचा, तेलकट त्वचा आणि सामान्य त्वचा असे करता येतात. रूक्ष त्वचा असणाऱ्यांनी केवळ oily lotions बाहेरुन लावण्यापेक्षा पोटातुनही स्निग्ध पदार्थ खायला हवेत.

जेणेकरून त्या अन्नातुन मिळणारे स्निग्ध घटक त्वचेला पोहोचवण्याची व्यवस्था शरिराकडूनच होईल आणि मुळातूनच त्वचेचा कोरडेपणा जायला मदत होईल. आपल्या आहारातील खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी जाणून घेऊन त्यात बदल करावा. आहारात साजूक तुपाचा समावेश जरूर करावा. तूप खाल्ले की लगेच जरी रूप येत नसले तरी सातत्याने तुपाचा वापर केल्यास त्वचेवरील त्याचे सुपरिणाम नक्कीच दिसून येतात.

हे वाचा:   लाखोच्या किमतीच्या बरोबरीत आहे ही एक वनस्पती, आरोग्यासाठी आहे विशेष फायदे.!

प्रकृतीनुरूप विविध प्रकारची औषधी घृते (तूप) वैद्य बनवून देऊ शकतात. उदाहरणार्थ सुकुमार घृत, शतावरी घृत इत्यादी. स्निग्ध (तेलकट) त्वचा असलेल्यांनी आपला आहार त्या प्रमाणे बदलावा. जास्त तेलकट चरबी युक्त पदार्थ, मांसाहार, मसालेदार पदार्थ वर्ज्य करावे. आहारात ताकाचा समावेश करावा. बाहेरून उटण्याचा वापर जरूर करावा.

उटणे त्वचेखालील अतिरिक्त मेद शोषून घेते व त्वचेवरील चिकटपणा घालाविते. घामही कमी करते. तेलकट त्वचा असणार्यानी आपला चेहरा दिवसातून दोन ते तीन वेळा कोमट पाण्याने जरूर धुवावा. ऋतुअनुरूप त्वचेची काळजी – ऋतूनुसारही त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी पडण्याची तक्रार बहुतेकांत आढळते.

अशावेळी रोज रात्री झोपताना संपूर्ण शरीराला बलातैल, चंदनबला लक्षादी तेल असे तेल वापरून मालिश करावे. लावताना तेल कोमट करावे. सकाळी अंघोळ करतेवेळी डाळीचे पीठ व उटणे + हळद यांचा वापर करावा. उन्हाळ्यात अनेकांना घाम येऊन त्वचेचे आरोग्य बिघडते. अश्यावेळी थकवा पण येतो व त्वचा अधिकच निस्तेज बनते.

त्यासाठी विविध सरबताचा वापर जसे कोकम सरबत, आवळा सरबत, लिंबू सरबत, नारळाचे पाणी, ताक इत्यादी जरूर प्यावे. तसेच दोन वेळा कोमट पाण्याने स्नान करावे. स्नान करते वेळी चंदन, कपूर इत्यादी द्रव्ये पाण्यात टाकल्यास त्वचेचा दाहही कमी होतो व प्रसन्न वाटते. एवढी काळजी घेवुन देखील त्वचेचा पोत सुधारण्यासाठी पोटातुन प्रभावी आयुर्वेदिक औषधे घेता येतात.

हे वाचा:   हे आजार आता तुमच्या शरीराला टच पण करू शकत नाही.! खसखस आणि दूध एकत्र पील्याने होतात हे जबरदस्त फायदे.!

त्यासाठी तद्न्यांचे मार्गदर्शन आवश्यक.ऋतुनुरुप पंचकर्म केल्याने देखील त्वचेस आरोग्य प्राप्त होऊन तुमची त्वचा उजळुन नितळ होते व निखळ सौंदर्याचा आनंद झळकतो! आशा आहे आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. ची माहिती आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *