जिथे सापडेल तिथून घेऊन या.! अनेक आजार यामुळे झटपट होतात बरे.! डॉक्टर सुद्धा हैराण आहेत.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला बकुळीच्या झाडाबद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो आज-काल सौंदर्य क्षेत्रामध्ये त्वचा आणि केस निरोगी राहण्यासाठी चढाओढ चालू आहे. त्याकरिता उत्तम गुणधर्म असणाऱ्या वनस्पतीची गरज कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये पडत आहे. ही वनस्पती भारतामध्ये शतकानुशतके वापरली जात आहे याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आढळतो.

आपल्यापैकी अनेक जणांनी हे बकुळीचे फुल पाहिले असेल त्याचा सुगंध ही अनुभवला असेल. परंतु या वनस्पतीचे फायदे काय आहेत या बद्दल मात्र आपल्याला माहित नसते. या झाडाला शिवकेसर सिंह केशर असे देखील नाव आहेत. ही वनस्पती सदाहरित आहे. याची सावली देखील खूप घनदाट असते. आपल्या भारतामध्ये कोकण आणि दक्षिण भागांमध्ये काही ठिकाणी ह्या वनस्पती आढळतात. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊयात या झाडाचे काही फायदे…

जुन्या काळी दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी बकुळीच्या झाडाच्या सालीपासून आणि खोडापासून दंतमंजन बनवले जाई. याचा नियमित वापर केल्याने कोणत्याही प्रकारचा दातांचा रोग होत नाही तसेच हिरड्या देखील मजबूत राहतात. अनेक जण बकुळीची वाळलेली फुले कपाटात कपड्यांमध्ये ठेवतात यामुळे कपड्यांना झुरळे कीड लागत नाही व एक नैसर्गिक अंतराप्रमाणे सुगंध कपड्यांमध्ये दरवळत राहतो.

हे वाचा:   खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज, चिकट कफ सर्वांवर आहे हे चमत्कारी पाणी औषध.! फक्त हे पाणी सकाळ संध्याकाळ घ्यावे.! सगळे दुखणे ओके.!

बकुळीच्या झाडांना केशरी रंगाची फळे देखील लागतात. या फळांचा उपयोग जर तुमच्या दातातून रक्त येत असेल तर त्यामध्ये करावा. तो पुढील प्रमाणे बकुळीच्या फळाच्या गरामध्ये, पाव चमचा तुरटी पावडर, एक चमचा तुळशीच्या पानांची पेस्ट असे सगळे मिश्रण एकत्रित घेऊन मिक्स करा. रक्त येत असल्यास दातांमध्ये हे मिश्रण लावा तुमचे दाताचे प्रॉब्लेम सुटतील. बकुळी च्या पानांचा काढा बनवून सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने वजन नियंत्रणात राहते.

हे बर्‍याच लोकांना माहीत नाही. या उपायांमुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त वाढलेले कोलेस्ट्रॉल देखील कमी होण्यास मदत होते. नियमितपणे पोट साफ होत नसेल तर या पानांचा काढा तुम्ही नियमितपणे सेवन करावा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आपल्यापैकी अनेक जणांना गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी याचा कधी ना कधी त्रास होतोच. अशा वेळी तुम्ही या पानांचा उपयोग करू शकता. तो असा, या पानांवर मोहरीचे तेल लावून गरम करून शरीराच्या दुखणारा भागांवर ही पाने लावून फडक्याने बांधावेत.

हे वाचा:   जेवणात रोज रोज हळदीचा वापर पडू शकतो महागात.! हे आजार उगाच मागे लावून घेऊ नका.! खूप महत्त्वाची माहिती नक्की वाचा.!

तुम्हाला लवकर आराम मिळेल. तसेच तुमच्या शरीरावर कोठेही जखम झाली असल्यास या पानांचा रस लावावा. यामुळे जखम लवकर बरी होण्यास आपले मदत होते. बकुळीच्या झाडाच्या बिया तुम्ही लावू शकता किंवा छोटे रोप देखील तुम्ही लावू शकता. आपल्या अंगणी हे झाड अवश्य असावे ते केवळ या वनस्पतींचा या आयुर्वेदिक फायदा मुळेच नव्हे तर बकुळीच्या फुलांचा सुगंध म्हणजे स्वर्गच जणू..! या वाळलेल्या फुलांचा वापर तुम्ही तेलामध्ये सुगंध येण्यासाठी देखील करू शकता.

तसेच अंतराप्रमाणे देखील वापरू शकता. याव्यतिरिक्त काही घरांमध्ये बकुळीच्या फळाचा वापर लोणची मुरांबा बनवण्यासाठी देखील केला गेल्याचे ऐकण्यात आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *