जर तुम्ही कोणत्याही पोटाच्या आजारांपासून अस्वस्थ असाल किंवा शरीरात कोणताही आजार असेल तर आपला आजचा उपाय या आजारांवर मात देण्यासाठीच असेल. हा उपाय जर आपण केला तर आपल्याला कधीच कोणताही आजार होणार नाही. कांद्याच्या पातीला आयुर्वेदातील मुख्य घटक मानले जाते. खूप औषधी अशी ही कांद्याची पात असते. आपल्याला ही कांद्याची पात घेताना त्यातील कांदा न घेता आपल्याला हिरवी पात घ्यायची आहे.
ही पात एकदम पातळ असली पाहिजे आणि पिवळी असू नये. एकदम ताजी आणि हिरवी पात आपल्याला इथे घ्यायची आहे. कांद्याची पात खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या शरीरातील अनेक रोग दूर होतात. आता आपण जाणून घेणार आहोत की, या कांद्याच्या पातीचा उपयोग आपण कशाप्रकारे करणार आहोत त्याबद्दल..
सर्वप्रथम आपल्याला ही कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्यायची आहे, त्यानंतर तिच्या मूळापासून तिला बारीक तुकड्यांमध्ये कापायची आहे. जिथे आपल्याला वाटेल की कांद्याच्या मुळाची साल थोडी जाड आहे तर ती जाड साल आपल्याला काढून टाकायची आहे. कांद्याच्या पातीची भाजी तर सर्वच खातात. पण जर ही भाजी आपण योग्य प्रकारे बनवून खाल्ली तर त्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो.
जे आपल्या घरी रोज येणारे कांदे असतात ते साठवण्याचे कांदे असतात. म्हणजेच त्या कांद्यांना स्टोअर करून ठेवलेले असते. कोणतीही गोष्ट खूप वेळ साठवून खाल्ल्याने त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही म्हणून आपल्याला प्रयत्न करायला हवा की, आपण सर्व गोष्टी, दररोज चे जेवण ताज्या गोष्टींनी बनवले पाहिजे. ताजा कांदा, ताजे लसूण या गोष्टी आपल्या शरीरासाठी अधिक उपयोगी असतात.
त्यानंतर दुसरी गोष्ट इथे घ्यायची आहे ती म्हणजे टोमॅटो. टोमॅटो रोजच्या जेवणामध्ये वापरताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. ते म्हणजे टोमॅटो मधील आतला भाग जो पांढऱ्या रंगाचा असतो त्या भागाला आपल्याला काढून टाकायचे आहे. कारण तो पांढरा भाग आपल्या शरीरासाठी उपयुक्त नसतो. हा भाग पचायला देखिल कठीण जातो.
आता आपल्याला तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या मिरच्या कापून टाकायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिऱ्याची पावडर टाकायची आहे. तुमच्याजवळ जिऱ्याची पावडर नसेल तर तुम्ही काळ्या जिऱ्याचा देखील वापर करू शकता. त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कापून घेतलेले टोमॅटो टाकायचे आहेत.
तुम्हाला गरज भासत असेल तर तुम्ही यामध्ये एक चमचा चाट मसाला देखील टाकू शकता. आता या मिश्रणाची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता या मिश्रणाला आपल्याला एका पात्रांमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचे आहे. तुमच्याजवळ कश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही त्याचाही वापर येथे करू शकता.
त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा काळे मीठ टाकायचे आहे. काळे मीठ आपल्या पचनक्रियेला सुधरवते. आता या संपूर्ण मिश्रणाला एकत्र करून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये आपण कापून घेतलेली कांद्याची पात टाकून मिक्स करून घ्यायची आहे. आता ही आपली चटणी बनवून तयार आहे. या चटणीला तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत देखील खाऊ शकता.
ही चटणी खाल्ल्याने तुमचे सर्व पोटाचे आजार दूर होतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.