सुंदरतेचे सर्वात मोठे रहस्य आहे नारळाचे तेल.! फक्त अशाप्रकारे करता यायला हवा उपयोग.! पंधरा दिवसात त्वचा इतकी बदलेल की स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा भरोसा राहणार नाही.!

आरोग्य

सुंदरता एक वरदान आहे. सुंदर दिसण्याचे स्वप्न हे सर्वांचेच असते. द्वापरयुगात सुंदरतेला देव-दानवच नव्हे तर ऋषि-मुनी पण भुलले. अनेक लोकांच्या चेहर्यावर अथवा शरीराच्या त्वचेवर काळेपण अथवा सुरकुत्या येतात. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या परिसरात वाढत असणारे प्रदूषण. प्रदूषणामुळे तुमची त्वचा खराब होते. त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते व ती सुकून त्यावर सुरकुत्या पडू लागतात. आणि याच मूळे तुमच्या सौंदर्यात कमी पणा येवू लागतो.

त्वचा निर्जीव असणे कोणालाच आवडत नाही. त्वचेची ही समस्या आज काल अत्यंत सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येक घरात कोणी ना कोणी या समस्येने ग्रस्त झालेला व्यक्ती आपल्याला पहायला मिळतो. तुम्ही अथवा तुमच्या शेजारी-पाजारी देखील कोणी या समस्येने त्रस्त असेल व त्यांना यावर कायमचा उपाय हवा असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. होय मित्रांनो अगदी घरातील काहीच सामग्री वापरुन तुम्ही हा अत्यंत साधा-सोपा पण उपयुक्त असा उपाय बनवू शकता.

हा उपाय अत्यंत नैसर्गिक आहे त्यामुळे याचा तुमच्या त्वचेवर कोणता ही दुष्परिणाम अथवा अपाय दिसून येत नाही. चला तर पाहूया हा उपायासाठी लागणारी सामग्री व याची कृती. मित्रांनो हा उपाय तयार करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता आहे तांदळाच्या पीठाची. होय तांदळाचे पीठ हे अँटी ऑक्सिडेंटने मुबलक प्रमाणात भरलेले असते. तुमच्या त्वचेसाठी हे खूपच उपयोगी असते. शरीरावरच्या सुरकुत्या व डाग घालवण्यासाठी हे प्रभावशाली आहे.

हे वाचा:   सतत नाक गळते का? सतत सर्दी खोकला चा त्रास असेल तर एकदा नक्की बघा. चक्कर येणे नाक वाहणे होईल बंद.!

मात्र चक्कीतून आणलेले तांदळाचे पीठ यासाठी न घेता. घरीच मुठभर तांदूळ घ्या व मिक्सरच्या मदतीने बारीक वाटून घ्या. हा आपला पहिला घटक झाला. या नंतर ओलिव ऑइल हा आपला दुसरा घटक होय. ओलिव ऑइल सुद्धा आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्वचा ड्राय झाली असल्यास ओलिव ऑइल टवटवीत व तेजस्वी बनवते. म्हणून 100 मि.ली. ओलिव ऑइल आपणास या उपायासाठी आवश्यक आहे.

खोबरेल तेल हा एक बहुगुणी घटक असलेला पदार्थ आहे. आपल्या केसांसाठी खोबरेल तेल हे अत्यंत उपयुक्त आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच असेल मात्र आपल्या त्वचेसाठी देखील हे फायदेशीर आहे. त्वचा राठ झाली असेल अथवा कापले भाजले असल्यास खोबर्याचे तेल लवकरात लवकर बरे करण्यासाठी एक चांगला घटक आहे. खोबरेल तेलात जीवनसत्व क असते म्हणून 20 मि.ली. खोबरेल तेल देखील घ्यायचे आहे.

हे वाचा:   पायाच्या टाचाच्या भेगा आता दोन मिनिटात होईल नष्ट.! आता तुम्हाला घरीच करायचे आहे हे एक काम.! सगळ्यात सोपा उपाय.!

आता तांदळाचे पीठ, ओलिव ऑइल व खोबरेल तेल यांना एका काचेच्या भांड्यात एकत्र करा व मंद आचेवर गरम करा. गरम करताना काचेचे भांडे पाण्यात ठेवा व त्यात एक सुती कापडा ठेवून मग गॅस वर ठेवा. अश्याने काचेचे भांडे गरमीने फ़ुटणार नाही. हे मिश्रण गरम झाल्यावर त्याला थंड होण्यासाठी ठेवा. आता शेवटचा घटक तुम्हाला लागणार आहे तो म्हणजे ग्रीन टी पावडर. मित्रांनो ग्रीन टी आता या गरम केलेल्या मिश्रणात टाका व व्यवस्थित ढवळून घ्या.

हे मिश्रण योग्यरित्या मिक्स झाल्यावर त्याला रात्री झोपताना आपल्या त्वचेवर लावा आणि सकाळी कोमट पाण्याने त्वचा धुवून टाका.बाजारात मिळणारे पदार्थ आज काल केमिकल रसायने टाकून बनवले गेलेले असतात. त्यामूळे याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. चेहर्यावर लाल डाग अथवा चट्टे खाज उठू शकते. हे उपाय अपाय कारक आहेत म्हणूनच आम्ही सांगितलेला हा नैसर्गिक उपाय करा व त्वचा पुन्हा तेजस्वी बनवा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.