या तीनच वस्तू अशा वापरा चार चौघात तुमचाच चेहरा उठून दिसेल.! एकदा हा उपाय करून बघा काय जादू होती ते.!

आरोग्य

आपला चेहरा सुंदर दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक जण आपली त्वचा सुंदर गोरीपान व टवटवीत फ्रेश दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात.आपल्या चेहरा जर सुंदर असेल तर आपला आत्मविश्वास देखील द्विगुणित होतो. अनेकदा बाजारामध्ये उपलब्ध असणारी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने आपण वापरत असतो.

आपल्यापैकी अनेकांना काळे डाग, पिंपल यासारख्या समस्या त्रास देत असतात, या समस्या मुळे आपला आत्मविश्वास देखील कमी होतो आणि अनेकदा आपण नाराजी व्यक्त करत असतो. आपल्यापैकी अनेक तज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन बाजारामध्ये उपलब्ध असणारी उत्पादने विकत आणतात परंतु अनेक उत्पादने हे रासायनिक पदार्थांची बनलेले असल्याने आपल्या त्वचेवर त्याचा विपरीत परिणाम देखील होत असतो परंतु तुम्ही काळजी अजिबात करू नका.

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्याच्या सगळ्या समस्या दूर होणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपण एक मास्क तयार करणार आहोत. हा मास्क तयार करण्यासाठी आपल्याला जे पदार्थ वापरायचे आहेत ते सहज उपलब्ध होतात, चला तर मग जाणून घेऊया आजच्या उपायाबद्दल.

जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग, वांग, पिंपल, सुरकुत्या आल्या असतील तर आजचा उपाय तुमच्या साठी रामबाण ठरणार आहे. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला केळी लागणार आहे परंतु आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला पिकलेली केळी घ्यायची आहे. केळी आपल्यापैकी अनेक जण सेवन करतात यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. केळीचे उपयोग आपले शरीर सदृढ बनवण्यासाठी तर केला जातो पण त्याच बरोबर आपल्या चेहरा त्वचेसाठी देखील उपयुक्त असतो.

हे वाचा:   लाखो रुपयांच्या बरोबरीत आहे ही एक वनस्पती.! याचे फायदे ऐकून डॉक्टर सुद्धा तोंडात बोट घालतात.! कचरा समजू नका.!

हे अनेकांना माहिती नसते. केळीचा वापर करून आपण आज आपला चेहरा सुंदर करणार आहोत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला केळीची साल लागणार आहे.अनेकदा आपण केळी खाल्ल्यानंतर साल फेकून देतात परंतु आपणास सांगू इच्छितो की, केळीच्या सालीचे फायदे अनेक औषधी गुणधर्म असतात. आता आपल्याला केळीची साल घ्यायची आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे.

आपल्याला एका पातेल्यामध्ये केळीच्या सालीचे बारीक बारीक तुकडे टाकायचे आहेत आणि एक ते दोन ग्लासभर पाणी देखील ओतायचे आहे त्यानंतर आता एक ते दोन चमचा आपल्याला तांदूळ लागणार आहे. तांदळामध्ये देखील आपली त्वचा सुंदर व टवटवीत बनवण्याची शक्ती असते. तांदूळ मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे आपल्या त्वचेवरील मृत पेशी व विषारी घटक बाहेर काढण्याचे कार्य करतात म्हणूनच अनेकदा आपला चेहरा जर सुंदर टवटवीत फ्रेश बनवायचा असेल तर आपल्याला हा तांदूळचा उपयोग जास्त करायला पाहिजे.

आपल्या माहितीसाठी सांगतो की, अनेकदा बाहेरच्या देशांमध्ये म्हणजेच जपान या देशांमध्ये तांदुळाचा वापर महिला सौंदर्यप्रसाधने म्हणून अधिक प्रमाणात करत असतात म्हणूनच जर तुम्ही बघितले असेल तर जपान मधील स्त्रिया दिसायला अतिशय सुंदर असतात व त्याचबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग आपल्याला पाहायला मिळत नाही. आता हे पातेले आपल्याला गॅस वर ठेवायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित उकळू द्यायचे आहे.

हे वाचा:   पोटाचा सुटलेला घेर नष्ट करा असे.! वजन कमी होतच जाईल.! आयुष्यात एकदा नक्की वापरून पहा हा उपाय.!

जोपर्यंत मिश्रण व्यवस्थित उकळत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस बंद करायचा नाही त्यानंतर आपल्याला गाळणीच्या साहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि याची आपल्याला व्यवस्थित पेस्ट बनवायची आहे. पेस्ट तयार झाल्यानंतर आता आपल्याला दोन ते तीन चमचे लिंबुचा रस मिक्स करायचा आहे त्यानंतर कॉर्न स्टार्च पीठ आपल्याला मिक्स करायचे आहे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला एका काचेच्या डबी मध्ये हे मिश्रण भरून ठेवायचे आहे.

ज्या पद्धतीने आपण क्रीम जमा करतो त्याच पद्धतीने आपल्याला बनवलेले मिश्रण जमा करून ठेवायचे आहे.हे मिश्रण चेहर्‍यावर लावल्याने आपली त्वचा कोमल मुलायम बनते. अनेकदा आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आपली त्वचा रुक्ष होते व कडक बनते, अशा वेळी देखील हा उपाय केल्याने तुमची त्वचा कोमल मुलायम बनणार आहे. ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायची आहे.

पेस्ट चेहर्‍यावर लावल्याने तर वीस ते पंचवीस मिनिटं ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आहे, असे जर आपण आठवड्यातून दोन वेळा जरी केले तरी तुमचा चेहरा अगदी सुंदर ताजातवाना दिसणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग तर दूर होणार आहे पण त्याचबरोबर चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या देखील नष्ट होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *