कोल्ड्रिंक्स आपल्यापैकी अनेक जण दैनंदिन जीवनात पीत असतात. आपल्या सर्वांना माहिती आहे की कोल्ड्रिंक्स सेवन केल्याने आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतात. तरी देखील आपण अनेकदा कोल्ड्रिंग सेवन करत असतो. पार्टीमध्ये, एखाद्या फंक्शन मध्ये, जेव्हा मित्र भेटतात किंवा जेवणासोबत देखील आपण आवर्जून कोल्ड्रिंक्स चा वापर करत असतो. आपल्या आजूबाजूला वेगवेगळे ब्रँड असलेले कोल्ड्रिंक्स बाजारामध्ये विकायला ठेवलेले असतात.
अनेकदा आपण टीव्हीवरील जाहिरात पाहत असतो. टीव्हीवरील अभिनेता-अभिनेत्री ज्या पद्धतीने कोल्ड्रिंग सेवन करतात ते पाहून आपल्या मनामध्ये देखील कोल्ड्रिंक्स पिण्याची इच्छा निर्माण होते. हल्ली वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. अशावेळी आपल्यापैकी अनेक जण तहान भागवण्यासाठी व शरीराला थंडावा, गारवा मिळवण्यासाठी कोल्ड्रिंक्सचा वापर करताना दिसून येतात.
हे कोल्ड्रिंक्स आपल्या शरीरासाठी खूपच घातक आहे. कोल्ड्रिंक्स मध्ये वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा समावेश केला जातो. कोल्ड्रिंक्स मध्ये कार्बोरेटर वॉटर, साखर, धोकादायक ऍसिड आणि आर्टिफिशिअल रंग जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. या पदार्थामुळे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम देखील होऊ शकतो. आजच्या लेखामध्ये आपण कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपल्या शरीरावर नेमके कोणकोणते विपरीत परिणाम होतात याबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…
आपल्या सर्वांना माहिती आहे की, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स उपलब्ध असतात. ब्रँड मधील वाढलेली स्पर्धा आणि ग्राहकांची मागणी यामुळे वेगवेगळ्या कोल्ड्रिंक्स कंपन्या ग्राहकांच्या समोर नव्याने आपले उत्पादन आणत असतात. अशा वेळी ग्राहक देखील वेगवेगळ्या उत्पादनांना सकारात्मक प्रतिसाद देत असतात. जेव्हा एखादे कोल्ड्रिंक्स तयार केले जाते त्यामध्ये कार्बोरेटर वॉटर, साखर, धोकादायक रासायनिक पदार्थ आणि आर्टिफिशियल रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
कोल्ड्रिंक्स सेवन केल्याने आपल्या शरीरावर वेगवेगळे परिणाम पुढील एका तासांमध्ये जाणवू लागतात. कोल्ड्रिंक्स सेवन करणे म्हणजे जास्त प्रमाणात साखर सेवन करणे असे असते. 350 मिली च्या बॉटल मध्ये साधारण 40 ते 50 ग्रॅम साखरेचे प्रमाण जास्त असते. 40 ते 50 ग्रॅम साखर म्हणजे आपल्या घरातील 10 चमचा साखर असते. तेवढी साखर आपण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सेवन करू शकत नाही. बहुतेक वेळा गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्याला जीव घाबरल्यासारखा वाटतो.
उलटी होते परंतु जेव्हा आपण एखादे कोल्ड्रिंग सेवन करतो अशा वेळी आपल्याला अनेक समस्या भविष्यात उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमचे पोटाचे आरोग्य देखील बिघडू शकते. जेव्हा आपण कोल्ड्रिंक्स पीत असतो तेव्हा आपल्याला कोणतीही अडचण येत नाही किंवा कोणतेही जास्त प्रमाणात गोड पदार्थ लागत नाही कारण की कोल्ड्रिंक्स मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॉस्फरिक ऍसिड मिसळलेले असते. या ऍसिडमुळे कोल्ड्रिंक्स मध्ये गोडवा कमी होतो.
कोल्ड्रिंग प्यायल्यानंतर आपल्या शरीरात साखरेची मात्रा वाढून जाते. अशा वेळी शरीरातील इन्शुलिन ला आपली गती वाढवावी लागते आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी खूप मोठ्या हालचाली कराव्या लागतात. मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या हालचालींमुळे किंवा बदलामुळे लि’व्हर योग्य पद्धतीने कार्य करू लागत नाही. शरीरातील वाढलेली साखरेचा निचरा होण्याची साखर फॅट मध्ये रूपांतरित होते.
आणि परिणामी शरीरामध्ये अतिरिक्त चरबी वाढू लागते. कोल्ड्रिंक्स मध्ये चहा, सिगारेट, कॉफी प्रमाणे कॅफिन उपलब्ध असते. कॅफिन शरीरामध्ये गेल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये त्याचा प्रभाव आपल्या शरीरावर जाणवू लागतो. जास्त प्रमाणामध्ये कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या पसरू लागतात आणि परिणामी डोळ्यांचे गंभीर आजार देखील आपल्याला त्रास देऊ लागतात.
आपल्यापैकी अनेकांना चहा कॉफी प्यायल्याने शरीरामध्ये उत्साह निर्माण होत असतो. या सगळ्या गोष्टी कॅफिन मुळे घडत असतात शरीरामध्ये कॅफिन प्रमाण वाढल्याने शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर हालचाली कराव्या लागतात. अशा वेळी शरीरातील साखर नियंत्रण करण्यासाठी लि’व्ह’रला जास्त प्रमाणात कार्य करावे लागते. जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपल्या शरीरातील मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यांचे प्रमाण कमी होते.
परिणामी आपल्याला भविष्यात हाडांचे अनेक समस्या त्रास देतात. हाडे ठिसूळ होणे,हाडांमधून आवाज येणे ,अशक्तपणा जाणवणे यासारख्या अनेक गोष्टी आपल्याला त्रास देऊ लागतात. या सगळ्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराला थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. शरीरातील पाण्याची मात्रा देखील कमी होते. शरीरातील पाण्याची मात्रा कमी झाल्याने आपल्याला डीहायड्रेशन सारख्या समस्येला सामोरे जावे लागते त्यामुळे चक्कर येणे, डोके दुखणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
जेव्हा कोल्ड्रिंक्स बनवले जाते तेव्हा कोणत्याही प्रकारचे नैसर्गिक पोषकतत्व समाविष्ट केले जात नाही. कोल्ड्रिंक्स बनवताना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आर्टिफिशियल पदार्थांचा, आर्टिफिशिअल रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेकदा कोल्ड्रिंक्स वर लिहिलेले सुद्धा असते परंतु लिहिलेले असूनदेखील आपण कोल्ड्रिंक्स मोठ्या प्रमाणावर वापर करत असतो.
जास्त प्रमाणामध्ये कोल्ड्रिंग सेवन केल्याने आपल्याला पोटामध्ये वेदना होणे, पोटामध्ये अ’ल्स’र होणे, डा’य’बि’टीस, ब्रे’स्ट कॅ’न्स’र, प्रो’स्टे’ट कॅ’न्स’र, हा’र्मोन्स बदल, हा’र्ट अ’टॅक , पोषक तत्वांची कमतरता यासारखे गंभीर आजार देखील उद्भवतात. वरील माहिती आवडल्यास लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.