अर्धे लिंबू असे लावा.! नाकावर उगणारे ब्लॅक हेड्स क्षणात नाहीसे होतील.! ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची पण गरज नाही.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जणांना ब्लॅकेड आणि वाईट एड येत असतात ज्यांचा चेहरा जास्त ऑईली म्हणजेच तेलकट असेल. त्यांना या अशा प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागते यामुळे त्रास होत नाही पण चेहरा हा विचित्र देखील दिसू शकतो. आपला चेहरा साफ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे आपण यासाठी अनेक प्रयत्न करतो.

पार्लरमध्ये जाणे,महाग वस्तू वापरणे, महाग स्क्रब वापरणे अशा प्रकारचे अनेक प्रयत्न आपण करत असतो. भरपूर पैसे खर्च करत असतो पण एवढं सगळं करून देखील यापासून सुटका काही आपल्याला मिळत नाही. थोडा जास्त प्रमाणात कमीपणा दिसून येतो पण हेब्लॅकहेड्स पूर्णपणे निघून जात नाहीत. हे सारे आपल्यालाच आवडत नाही.

त्यामुळे आज आपण असे काही घरगुती पदार्थ वापरून असा घरगुती उपाय बनविणार आहोत ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील म्हणजेच आपल्या नाकावरील ब्लॅकहेड्स आणि वाईट एड निघून जातील. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा उपाय कसा बनवायचा आहे आणि आपल्या चेहऱ्यावर कशा प्रकारे लावायचा आहे.

हे वाचा:   दररोज फक्त एक आवळा खाल्ल्यामुळे होतात हे जबरदस्त बदल.! आवळ्याचे हे समृद्ध करणारे फायदे तुमचे डोळे उघडतील.! खाण्याचा आहे ही योग्य पद्धत.!

हा घरगुती उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक चमचा चहापावडर लागणार आहे. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये चहा पावडर आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊन जाते. या चहापावडर च्या मदतीने आपण आपले ब्लॅकहेड्स काढू शकतो. त्यामुळे एक चमचा चहा पावडर एका वाटीमध्ये घ्यायची आहे त्यामध्ये चिमुट्भर हळद टाकायची आहे.

हळद फक्त चिमूटभरच असली पाहिजे कारण आपण इथे जास्त हळदीचा वापर केल्यास आपला चेहऱ्यावर हळदीचा रंग चढला आणि ते बरे दिसणार नाही त्यामुळे चिमूटभर हळदीचा वापर करायचा आहे. ही हळद तुम्ही रोजच्या वापरातील देखील घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे. लिंबाचा रस हा आपल्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स काढण्यासाठी एक रामबाण घटक आहे.

त्यामुळे इथे एक चमचा लिंबाचा रस वापरायचा आहे. आता या तिन्ही गोष्टींना एकत्रितपणे वीस ते पंचवीस सेकंदासाठी हलवून मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून हे सर्व पदार्थ एकजीव होतील. आता अर्धा कापून घेतलेल्या लिंबा उरलेल्या सालीमध्ये हे मिश्रण घेऊन आपल्या नाकावर पाच ते दहा मिनिटे हळुवारपणे मसाज करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपले ब्लॅक हेड्स निघून जायला मदत होणार आहे.

हे वाचा:   पाण्यामध्ये एवढी गोष्ट टाकून दररोज प्या; एका आठवड्यात निम्मे वजन कमी होईल, जबरदस्त उपाय.!

हे मसाज करताना हळुवारपणेच करायचे आहे. जास्त जोर देऊन केल्यास आपल्या चेहऱ्यावर हानी होऊ शकते त्यामुळे हळुवारपणे मसाज करायचा आहे आणि पंधरा मिनिटांनंतर परत दहा मिनिटांसाठी हे मिश्रण तसेच नाकावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर कोमट पाण्याने कोणत्याही फेस वॉश द्वारे आपला चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.

हा उपाय आठवड्यातून तीन वेळा केल्यास तुमच्या नाकावरील ब्लॅकहेड्स कायमचे निघून जातील आणि परत होणार देखील नाहीत. हा उपाय बनविण्यासाठी वापरले गेलेले सर्व घटक हे घरगुती आहेत त्यामुळे याचा आपल्या चेहऱ्यावर कोणताही हानीकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *