आता लहान मुले पण खातील कारले.! ज्या महिला असे कारले बनवतात त्यांचे कारले कधीच कडू होत नाही.! कारले बनवताना करा हे छोटेसे काम.!

आरोग्य

फळभाजी पालेभाजी खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे आपण ऐकलेच असेल. पावसाळ्याचा ऋतु सुरू झाला आहे या ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या निघण्यास सुरू होत असतात. त्यापैकीच एक फळभाजी ती म्हणजे कारले. डायबेटीज असलेल्या लोकांना कारल्याचे सेवन करणे अत्यंत उपयुक्त मानले गेले आहे. अनेकदा डॉक्टर देखील याबाबतचा सल्ला आपल्याला देत असतात. कारल्याचे सेवन अनेक लोक करत असतात परंतु कारले हे कडू असते हे तर सर्वांना माहीतच आहे.

कारल्याचा कडूपणा हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त मानला गेला आहे. कारले कडू असल्यामुळे लहान मुले याला खात नाही तसेच अनेक मोठे देखील या ला खात नसतात. परंतु तुम्हाला माहिती नाही की तुम्ही खूप मोठी चुकी करत आहात. कारल्याचे सेवन केले पाहिजे. कारल्याच्या सेवनामुळे अनेक प्रकारच्या समस्या नष्ट होत असतात. कारल्याचा कडूपणा पूर्णपणे नष्ट केला जाऊ शकतो.

हे वाचा:   रोज चकरा येणे, मळमळ, उलटी, पित्त सगळे काही थांबले जाईल.! दररोज येताजाता हा एक पदार्थ खा.! खूप फायदा होईल.!

कारले खूप कडू लागते हे अनेक लोक कारले न खाण्याचे कारण सांगत असतात. परंतु कारले कडू लागणे ही समस्या तुम्हाला अतिशय मोठी वाटत असली तरी कारल्याचा कडूपणा पूर्णपणे कमी केला जाऊ शकतो. आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे कारल्याचा कडूपणा तुम्ही सहजपणे कमी करू शकता. असे केल्याने तुम्ही करत असलेली कारल्याची भाजी कधीच कडू लागणार नाही.

कारल्याचा कडूपणा घालविण्यासाठी कारल्यावर असलेला कातडी काढून टाकायला हवीत. कारण सगळ्यात जास्त कडूपणा हा कारल्याच्या हिरव्या भागातच असतो. तुम्ही हे कातडे नंतर उन्हामध्ये वाळू घालू शकता. त्यात मीठ टाकून मसाल्याप्रमाणे याचा उपयोग पुन्हा करू शकता.

कारले कापत असताना आपण कारल्यातून निघणाऱ्या बिया काढून टाकायला हव्यात. अनेक लोकांना कारल्याच्या बिया अजिबात आवडत नसतात. जेवण करत असताना कारल्याच्या बिया तोंडामध्ये येत असतात. असे बऱ्याच लोकांना आवडत नाही. त्यामुळे कारले कापत असताना तुम्ही या बिया काढून टाकायला हव्यात.

हे वाचा:   कसलाही त्वचा रोग सात दिवसाच्या वर टिकणार नाही, यासाठी घरीच बनवा हे असे औषध, करा हा शेवटचा इलाज.!

कारले कापल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे मीठ लावून ठेवायला हवे. मीठ लावून ठेवलेले कारले पंधरा ते वीस मिनिटानंतर पाणी सोडू लागते. पाण्याद्वारे कारल्या मध्ये असलेला सर्व कडूपणा बाहेर पडला जात असतो. असे तुम्ही अर्ध्या तासापर्यंत कारले ठेवायला हवे, असे केल्याने तुम्ही बनवत असलेली भाजी अजिबात कडू लागणार नाही.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.