आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग किंवा आपला चेहऱ्याचा रंग हळूहळू सावळा होऊ लागतो. उन्हामुळे अनेकदा टॅनिंग होतो यासाठी आपण बाजारपेठेत उपलब्ध असणारे अनेक क्रीम लोशन्स किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल यासारख्या गोष्टी करत असतो आणि या सर्व गोष्टीत आपल्याला थोड्या जास्त प्रमाणात मदतही करत असतात पण या उपायांचा रिझल्ट काही दिवसांसाठीचाच असतो, त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत.
ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स सुरकुत्या निघून जातील. आपला चेहरा उजळ होण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर चेहरा मुलायम देखील होईल. चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला मसूर डाळ लागणार आहे. मसूर डाळ म्हटल्यावर आपल्यालाही दाळ दाण्यांमध्ये वापरायचे नाही आहे किंबहुना याचा वापर आपल्याला पावडरच्या स्वरूपात करायचा आहे.
आपल्याला ही डाळ पावडर रुपात देखील उपलब्ध होते. जर आपल्याला बाजारातून ही पावडर घ्यायची नसेल तर आपण स्वतः मसूर डाळची पावडर बनवू शकतो. त्यासाठी एका मिक्सरमध्ये मसूर डाळ टाकून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. मसूर डाळ ही त्वचेसाठी अत्यंत उपयोगी असते. या डाळी चा वापर आयुर्वेदामध्ये देखील केला जातो म्हणून मसूर डाळ आपल्याला वापरायची आहे.
दुसरा घटक इथे आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे एलोवेरा जेल. एलोवेरा जेल आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत लाभदायी आणि फायदेशीर असते. आपण वापरणाऱ्या चेहऱ्याच्या क्रीम किंवा लोशन मध्ये देखील एलोवेरा चा वापर केला जातो त्यामुळे एलोवेरा जेल चेहरा साठी खरच खूप उपयोगी ठरते. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे ऑलिव ऑइल.
ऑलिव्ह ऑइल देखील आपल्या चेहरा साठी अत्यंत फायदेशीर आहे त्याचबरोबर ते आपल्या चेहऱ्यावर ग्लो आणायला मदत करते. शेवटची गोष्ट इथे घ्यायची आहे ती म्हणजे दुध. दुधाचा वापर करायचा आहे तो कच्चा करायचा आहे. कारण कच्चा दुधामध्ये जे औषधी गुणधर्म असतात ते उकळून घेतलेल्या दुधामध्ये नसतात त्यामुळे कच्चे दुध आपल्या त्वचेसाठी जास्त फायदेशीर असते.
आता एका वाटीमध्ये दोन चमचे मसूर डाळ ची पावडर, एक चमचा एलोवेरा जेल तीन ते चार थेंब ऑलिव ऑइल आणि एक चमचा दूध टाकून या चारही घटकांना एकत्रित पणे मिक्स करून घ्यायचे आहेत. या सगळ्याची एक बारीक क्रीम किंवा पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आताही बनवून घेतलेली पेस्ट आपल्याला लगेचच त्वचेवर लावायची नाही आहे. यामध्ये वापरली गेलेली मसूर डाळ ची पावडर थोडावेळ मिश्रणामध्ये मिक्स होईपर्यंत 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे मिश्रण तसेच झाकून ठेवायचे आहे.
तोपर्यंत आपल्याला अजून एक प्रक्रिया करायची आहे सर्वप्रथम एका वाटीमध्ये एक ते दोन चमचे कच्चे दूध घ्यायचे आहे आणि कापसाच्या मदतीने आपण ज्या त्वचेवर तयार करून घेतलेले पॅक लावणार आहोत. त्या त्वचेवर कापसाच्या मदतीने कच्च्या दुधाने मसाज करून घ्यायचे आहे,यामुळे आपल्या त्वचेवरील पोल्स ओपन होण्यास मदत होते. त्वचेवर जर मळ असेल तर तो देखील निघून जातो. त्यामुळे पाच मिनिटे आपल्याला दुधाने मसाज करून घ्यायचे आहे म्हणजेच आपली त्वचा दुधाने साफ करून घ्यायची आहे.
पाच मिनिटानंतर तयार करून घेतलेले पेस्ट आपल्याला आपल्या त्वचेवर लावायची आहे. त्वचेवर लावल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला मसाज देखील करायचे आहे. मसाज करून झाल्यावर पाच ते दहा मिनिटे ही पेस्ट आपल्या त्वचेवर तशीच ठेवायची आहे जेणेकरून यामध्ये इन्ग्रेडियंट आपल्या त्वचेला अजून उजळ बनवण्यास मदत करतील. जर तुम्हाला मसूरच्या डाळीची पावडर तुमच्या त्वचेला सुट करत नसेल तर तुम्ही इथे बेसन च्या पिठाचा देखील वापर करू शकता.
या घरगुती उपाय चा वापर आठवड्यातून तीन वेळा देखील तुम्ही करू शकता. यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक घरगुती असल्यामुळे याचा आपल्या शरीरावर किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम किंवा हानीकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.