कोरपडीच्या या उपायाने घडेल जादू.! कोणतीही क्रीम करू शकणार नाही इतका चेहरा गोरा होईल.!

आरोग्य

आपल्यापैकी सर्वांनाच आपला चेहरा गोरा आणि चमकदार बनवायचा असतो. त्यासाठी बाजारात उपलब्ध असणारे अनेक प्रोडक्स आपण वापरत असतो. काही प्रॉडक्ट आपल्या चेहऱ्यावर चांगला रिझल्ट दाखवतात तर काही नाही दाखवत. या सर्व गोष्टींमध्ये आपले पैसे देखील वाया जात असतात आणि त्यामध्ये आपल्याला हवा असलेला रिझल्ट आपल्याला मिळत नाही त्याचबरोबर आपण अनेक घरगुती उपाय देखील वापरतो.

पण त्यांचा देखील आपल्या चेहऱ्यावर हवा तसा फरक दिसून येत नाही. आपल्या चमकदार चेहरा साठी आणि आपला चेहरा उजळ व्हावा यासाठीच आजचा आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. हा घरगुती उपाय असल्यामुळे आपल्या परिसरातील म्हणजेच नैसर्गिक गोष्टी आणि घरात वापरल्या जाणाऱ्या गोष्टींचा इथे आपण उपयोग करणार आहोत.

तर सर्वप्रथम आपल्याला इथे कोरफड चा वापर करायचा आहे. कोरफड आपल्यापैकी अनेक जणांच्या घरामध्ये म्हणजेच त्यांच्या परसबागेमध्ये किंवा त्यांच्या घरांमध्ये असतेच. जर तुमच्याजवळ कोरफड नसेल तर तुम्ही एलोवेरा जेल चा देखील वापर करू शकता. एलोवेरा जेल मध्ये विटामिन इ, विटामिन बी 1, बी 2, बी 3 ते अनेक विटामिन्स असतात. आणि त्याचबरोबर यामध्ये अनेक असे अनेक असेंसियल ऑइल देखील असतात.

हे वाचा:   दवाखान्यात न जाता झुमक्यामुळे मोठा झालेला कानातील होल आपण बरा करू शकतो.! करा फक्त हा उपाय!

त्यामुळे आपल्या चेहऱ्याला चमक देण्यासाठी एलोवेरा हे अत्यंत उपयोगी आणि फायदेशीर आहे. बाजारामध्ये वापरले जाणारे अनेक सौंदर्याविषयी प्रोडक्स मध्ये देखील कोरफडीचा वापर केला जातो.आपल्या चेहऱ्यावर चमक यायला मदत होते. आपल्याला इथे कोरफडीचा वापर करायचा आहे. पुढील गोष्ट आपल्याला येथे वापरायची आहे ते म्हणजे तांदळाचे पीठ. तांदळाच्या पिठामध्ये देखील असे काही औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आपला चेहरा चमकदार होण्यास मदत होते.

त्यानंतर आपल्याला कस्तुरी हळदीचा देखील वापर करायचा आहे. कस्तुरी हळद आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर असते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर चमक यायला त्याचबरोबर आपला चेहरा उजळ होण्यासाठी देखील मदत होते. आयुर्वेदामध्ये देखील कस्तुरी हळदीचा वापर केला जातो. आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा बेसनचे पीठ देखील घ्यायचे आहे. बेसन चे पीठ आपल्या चेहऱ्यावर लावल्यास आपला चेहरा मुलायम होतो.

आता आपण जाणून घेणार आहोत हा घरगुती उपाय कसा बनवायचा आहे. सर्वप्रथम मिक्सरमध्ये एलोवेरा म्हणजेच कोरफडीचे तुकडे करून त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. या पेसला एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये एक चमचा तांदळाचे पीठ टाकून मिक्स करायचे आहे. मिश्रण करताना हे लक्षात घ्यायचे आहे की कोरफड माध्ये तांदळाचे पीठ पूर्णपणे एकरूप झाले पाहिजे.

हे वाचा:   या वनस्पतीची फक्त पाच पाने टाका तोंडात.! होईल जबरदस्त कमाल.! उत्साह, ताकद, स्टॅमीना होईल दुप्पट.!

त्यानंतर यामध्ये चिमूटभर कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे आणि या मिश्रणामध्ये एक चमचा बेसनाचे पीठ टाकायचे आहे. हे संपूर्ण मिश्रण एकरूप करून घ्यायचे आहे. आता ही पेस्ट आपण चेहऱ्यावर लावून पाच मिनिट मसाज करून दहा मिनिटांसाठी तशीच चेहर्‍यावर ठेवायची आहे. यामध्ये वापरले गेलेले सर्व पदार्थ किंवा गोष्टी नैसर्गिक असल्यामुळे आणि चेहऱ्यासाठी गुणकारी असल्यामुळे याच्या एकाच वापराने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक झालेला दिसून येईल.

त्याच बरोबर चेहरा चमकदार आणि उजळ झालेला दिसून येईल. महाग फेशियल्स करण्यापेक्षा हा एक घरगुती उपाय तुमच्या खूप उपयोगी येणार आहे. यामध्ये वापरले गेलेले सर्व पदार्थ घरगुती आणि नैसर्गिक असल्यामुळे याचा आपल्या चेहऱ्यावर देखील काही हानीकारक परिणाम होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *