याच्या फक्त चार दाण्याने शुगर च्या गोळ्या बंद करून टाकल्या.! वीस वर्षापासून असलेली शुगर सुद्धा होऊ शकते बरी.! फक्त करावे लागेल हे एक काम.!

आरोग्य

नमस्कार मित्रानो आपल्या दैनंदिन खानपान-आहारात सर्व पदार्थांचे एक वेगळे विविध वैशिष्ट्य आहे. म्हणूनच संतुलित आहारात विविध प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, फळे, धान्य, कडधान्य, दूध, मांस अंडी, मासे इत्यादींचा समावेश उत्तम नीटनीटक आरोग्य राखण्यास नेहमीच लाभदायक ठरते. आरोग्याच्या दृष्टीने ६० टक्के पिष्टमय पदार्थ, २० टक्के स्निग्ध पदार्थ आणि २० टक्के प्रथिने(प्रोटीन्स)रोजच्या आहारातून मिळणे महत्वाचे आहे.

आपण इतकं तोलूनमापून अन्न ग्रहण करतो का? अर्थातच आजकालच्या पिझ्झा बर्गर सारख्या फास्ट फूड च्या जमान्यात नाही हे च बऱ्याच जणांचं उत्तर असेल. यामुळे शारीरिक संतुलन आणि योग्य वाढीसाठी पोषक आहार मिळत नाही. आजकाल चे अनेक आजार हे शरीरात पोषक तत्वाची कमतरता आणि सुमार रोगप्रतिकारक क्षमता यामुळे होतात.

बरेचस रोग/आजार हे आवश्यक प्रमाणात प्रोटीन्स न मिळाल्यामुळे होतात. म्हणूनच प्रोटीन्सचा स्रोत म्हणून आपण आजकाल बाजारातील महागडी प्रोटीन्स पावडर घेऊन ती दुधात घालून सेवन करत असतो. परंतु अगदी शाळेत शिकलेली बेसिक गोष्ट विसरतो कि प्रोटीन्स चा भरपूर प्रमाणात स्रोत म्हणजे कडधान्य होय. रेडिमेड प्रोटीन पावडर च्या तुलनेत कडधान्य ही स्वस्त आणि अधिक पौष्टिक नैसर्गिक असतात म्हणून ती आपण खाल्ली पाहिजेत.

हे वाचा:   दाढी आणि मिशा लईच पांढऱ्या व्हायला लागल्या असतील तर, हे काम करणे आजच बंद करा दाढी मिशा परत काळ्या कुळकुळीत बनतील.!

सर्वसामान्यपणे मटकी, मुग, चवळी, कुळीथ, सोयाबीन, राजमा, मसूर इत्यादी आपल्या दैनंदिन वापरातील कडधान्य आहेत. परंतु यापैकी मूग हे कडधान्य काही विशेष गुणधर्मांनी युक्त आहे. मुगामध्ये ६२% कारबोहायड्रेट्स, २४% प्रोटीन्स आणि १-२% स्निग्धांश असतात. याशिवाय अत्यल्प संतृप्त स्निग्धांश( saturated fats)आणि कोलेस्टेरॉलचा पूर्ण अभाव असतो.

लोह, पोटॅशियम, झिंक, फास्फोरस अशी खनिजे आणि व्हिटॅमिन्स ए, बी, सी आणि नायसिन हे सुद्धा मुबलक प्रमाणात मुगामध्ये असतात. मुबलक प्रमाणात फायबर असल्याने पोट साफ होण्यासाठी तसेच वाढलेले वजन नियंत्रित करण्यासाठी देखील मुग आणि मुगाचे पदार्थ बेस्ट आहेत. यात सोडियम नसल्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्यांना मूग उत्कृष्ट आहार आहे.

मूगामध्ये सायट्रोजन नावाचा घटक असतो जो आपल्या शरीरात कोलेजन आणि एलास्टिन पातळी कायम संतुलित ठेवतात. यामुळे चेहऱ्यावर वय दिसून येत नाही(Anti-aging). आपली त्वचा ही चमकदार राहते. मोड आलेले मूग नियमित सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडायला आपली मदत होते. यामुळे अनेक त्रास कमी होतात. पचानक्रिया सुधारते.

मुगामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि anti-inflammatory गुणधर्म असतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. fertility क्षमता वाढवण्यासाठी देखील मूग खाण्याचा सल्ला विवाहितांना दिला जातो. झाले मूग खाण्याचे बऱ्यापैकी फायदे, परंतु काय तुम्हाला माहित आहे का हेच मोड आलेले मूग खाल्ल्याने हा फायदा किती तरी पटीने जास्त होतो.

हे वाचा:   सर्दी झाल्यावर या पदार्थांना आजिबात खाऊ नका.! अन्यथा सर्दी आणखी वाढेल.!

आपल्या दैनंदिन आहारामध्ये मुगाची भाजी, उसळ, डाळ, कांदा-टोमॅटो घालून केलेल कमी तेलातील स्प्राऊट भेळ, मुगाचे डोसे असे अनेक पद्धतीने मूग समाविष्ट करता येतो. अगदी रोज मूठभर मोड आलेले मूग सेवन केल्यास तुमच्या शरीरातील इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते. यासोबतच यामुळे ब्लड ग्लूकोजही कंट्रोलमध्ये राहतं. परिणामी तुमची कितीही जुनी डायबिटीस ची समस्या असू देत ती समस्या कमी करण्यास मदत होते.

हा मुख्य फायदा मुगाचा आहे..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.