झटपट सगळी घाण बाहेर.! सकाळी उठल्याबरोबर पोट एकदम मोकळे वाटेल.! एक चमचा हे औषध लिंबा बरोबर करा सेवन जबरदस्त फायदा होईल.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेकांना माहितीच आहे की, पोट हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. आपल्या शरीराची पचनसंस्था जर उत्तम रित्या कार्य करत असेल तर आपले पोट नेहमी स्वच्छ राहते. असे अनेकदा म्हटले गेले आहे की, ज्या व्यक्तीचे पोट वेळेवर स्वच्छ होते त्या व्यक्तीला भविष्यात कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही आणि ज्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभते.

तो व्यक्ती भविष्यात कधीच आजारी पडत नाही म्हणूनच आपले शरीर जर उत्तम निरोगी राखायचे असेल तर आपल्या सर्वांना पोटाचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे. हॉकी जीवनशैली बदललेली आहे. प्रत्येक जण व्यस्त झालेला असल्याने घरचे जेवण करण्याची बाहेरचे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात सेवन करत असतो. बाहेरचे पदार्थ जिभेला चविष्ट लागतात पण त्याचबरोबर या सर्व पदार्थांमुळे अनेकदा आपल्या पोटांचे आरोग्य बिघडून जाते.

तेलकट, तिखट पदार्थ सेवन केल्याने आपली पचनसंस्था निघून जाते म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पचन संस्था मजबूत राहण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने काही दिवसांमध्येच तुमचे पोट स्वच्छ होणार आहे. तुमच्या पैकी कोणाला ब’द्ध’को’ष्ठतेचा आजार असेल तर हा आजार देखील निघून जाणार आहे. बहुतेक वेळा आपले पोट वेळेवर स्वच्छ न झाल्याने ब’द्ध’को’ष्टता हा आजार उद्भवतो.

हे वाचा:   अंघोळ करताना केस असे धुवा, एकही केस गळणार नाही.!

जर आपण या आजाराकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मु’ळ’व्याध देखील होण्याची शक्यता असते. आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चूर्ण सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये त्रिफळा चूर्ण चे अनेक उपयोग सांगण्यात आलेले आहे आणि म्हणूनच आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला त्रिफळा चूर्ण वापरायचा आहे.

त्रिफळा चूर्ण हा प्रामुख्याने तीन पदार्थांपासून बनविलेले चूर्ण आहे, यामध्ये आवळा, हिरडा, बेहडा या सारखे तीन पदार्थ समाविष्ट केलेले असतात. त्या तिन्ही पदार्थांमध्ये आपले शरीर मजबूत बनवण्याचे गुणधर्म असतात. त्रिफळा चूर्ण हे अमृत समान मानले जाते. आपल्यापैकी अनेक जण रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण सेवन करत असतात परंतु असे करणे जरी बरोबर असले तरी ही पद्धत मात्र कधीकधी चुकीचे ठरू शकते.

जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये पोटदुखी पोट साफ होत नसेल तर अशा वेळी रात्री हे चूर्ण सेवन केले तर योग्य ठरते, अन्यथा तुम्ही सकाळी चार वाजता उठून एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा चूर्ण मिक्स करून सेवन केले तर आपल्याला फरक पडू शकतो. हे मिश्रण सेवन केल्यानंतर आपल्याला आहार देखील नीट करायचा आहे जेणेकरून तुमच्या पोटाला आराम मिळेल त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपल्यापैकी अनेक जण जेवण करताना सुक्या चपात्या सेवन करत असतात.

हे वाचा:   फक्त एक केळी आणून अशी वापरली आणि मूळव्याध कायमचा नष्ट झाला.! मूळव्याध चा त्रास सहन करत बसण्यापेक्षा आजच करा हा उपाय.!

असे केल्याने देखील पोट व्यवस्थित साफ होत नाही आपल्याला सातत्याने पंधरा दिवस तूप लावलेल्या चपाती आहारामध्ये समाविष्ट करायचे आहे असे केल्याने तुमचे पोट लवकरच साफ होईल त्याचबरोबर तुम्ही कोमट पाण्यामध्ये एक चमचा काळे मीठ किंवा सैंधव मीठ मिक्‍स करून सेवन करू शकता असे केल्याने तुमच्या पोटाची कार्यक्षमता वाढणार आहे पचनसंस्था पूर्वीपेक्षा जास्त वेगाने कार्य करू लागेल आणि परिणाम होईल व पोट वेळेवर स्वच्छ होईल.

जर आपण नियमितपणे थंड पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी सेवन केले तर आपल्या शरीरात विषारी घटक देखील बाहेर पडतात. कोमट पाणी आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ करते अशा वेळी आजच्या लेखामध्ये सांगितलेले उपाय आपण जर नियमितपणे केले तर आपले पोट वेळेवर साफ होईल व भविष्यात पोटाच्या समस्या त्रास देणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.