दोन रुपयाच्या चॉकलेट पासून बनवा एकदम चविष्ट कुल्फी.! लहान मुलांना एकदा नक्की बनवून द्या ही कुल्फी.!

आरोग्य

आपल्या सर्वांनाच आईस्क्रीम खायला खूप आवडत असते पण दररोज आईस्क्रीम घेणे त्यावर एवढे पैसे खर्च करणे आपल्याला जमत नाही तर आज आपण घरात स्वतः आईस्क्रीम कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे कच्चा मंगो चॉकलेट. म्हणजेच कच्च्या मँगो टॉफिज आपल्याला घ्यायचे आहेत. फक्त यापासून आपण घर बसल्या आईस्क्रीम बनवू शकतो आणि हे आईस्क्रीम बनविण्यासाठी आपल्याला घरातीलच अजून काही गोष्टी लागणार आहेत.

ज्या आपण दररोज वापरत असतो. त्यामुळे आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील होणार नाही तर मग जाणून घेऊया यासाठी आपल्याला कोण कोणत्या गोष्टी लागणार आहेत. आणि आइस्क्रीम बनविण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल. सर्वप्रथम आपल्याला वीस टॉफिज घ्यायच्या आहेत आणि यांची आपल्याला बारीक पूड तयार करून घ्यायची आहे, आता हि पूड तयार करण्यासाठी कोणत्याही प्लास्टिकची पिशवी आपल्याला घ्यायची आहे.

त्यामध्ये या टॉफिज बाहेर काढून त्यांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकत्रितपणे टाकायचे आहे त्यानंतर दगडाच्या किंवा कोणत्याही जड वस्तूच्या सहाय्याने आपल्याला ठेचून त्याची बारीक पेस्ट तयार करायचे आहे. बारीक म्हणजे एकदम पीठासारखे बारीक नव्हे तर थोडीशी बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसर्‍या बाजूला आपल्याला गॅसवर एक पात्र ठेवून त्या पात्रांमध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे आता साखर आपण यासाठी टाकत आहोत कारण कच्चा मॅगो मध्ये ऑल रेडी गोड पणा असतो.

हे वाचा:   जेवणानंतर रोज बडीशेप खात असाल तर नक्की वाचा.! पोटात बडीशेप चे काय होते? आरोग्यासाठी बडीशेप खाणे योग्य की अयोग्य?

पण आपण दोन ग्लास पाणी घेतल्यामुळे त्यामधील तो गोडवा नाहीसा होईल म्हणून आपण थोडेसे साखळ्या मध्ये टाकणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा लिंबाचा देखील समावेश करायचा आहे. कारण कच्चा मॅंगो मध्ये असलेला एक आंबटपणा पाण्यामुळे थोडसं नाहीसा होईल म्हणून आपल्याला याचे लिंबाचा वापर करायचा आहे. आपल्याला त्याच बरोबर येथे इसेन्स किंवा फ्लेवर टाकायची गरज नाही आहे.

कारण कच्चा मॅंगोचा जो कलर म्हणजेच रंग आहे तो पुरेसा आहे. आता आपण कच्चा मॅगो ची करून घेतलेली बारीक पूड यामध्ये टाकायची आहे आणि जोपर्यंत ही पूड व्यवस्थित रित्या मिक्स होत नाही तोपर्यंत या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित रित्या मिक्स करत राहायचे आहे. एकदा का ती पूड पाण्यामध्ये मिक्स झाली की त्यानंतर आपल्याला फक्त दोन ते तीन मिनिटे या मिश्रणाला उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून या पाण्याला कच्चा मॅगो चा रंग चढेल.

जास्त वेळ पडल्यास आपल्याला जास्त घट्ट मिश्रण मिळेल म्हणून त्या मिश्रणाला कमी शिजवायचे आहे. दोन-तीन मिनिटानंतर गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्यायचे आहे. आता याचे आईस्क्रीम रूपात रूपांतर करण्यासाठी आइस्क्रीमचे कंटेनर घ्यायचे आहेत. जर तुमच्याजवळ आइस्क्रीमचे कंटेनर नसतील तर आपण घरातील ग्लास किंवा पेला देखील वापरू शकतो.

हे वाचा:   या लहान मोठ्या टीप्स ज्यांना माहिती आहेत त्याचे खूप पैसे वाचतात.! तुम्ही देखील या टिप्स माहिती करून घ्या जेणेकरून तुमचे पण लाखो रुपये वाचतील.!

त्यानंतर तयार केलेले पाणी आपल्याला या ग्लासमध्ये किंवा आईस्क्रीमच्या कंटेनर मध्ये टाकून त्यावर फॉइल पेपर लावून जर तुम्ही ग्लास किंवा पेल्या मध्ये आईस्क्रीम तयार होण्यास ठेवत असाल तर वर छोटासा फॉइल पेपर देखील लावला पाहिजे आणि त्याला थोडेसे छिद्र करून नंतर त्यामध्ये आईस्क्रीम स्टिक लावून घ्यायचे आहे. जर तुमच्याजवळ आईस्क्रीम स्टिक देखील नसेल तर चमचा उलटा करून टाकला तरीही चालेल.

तयार करून घेतलेले हे मिश्रण पेल्या मध्ये आणि ग्लास आण मध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला कमीत कमी पाच ते सहा तासांसाठी हे फ्रीजर मध्ये ठेवायचे आहे. सहा तासानंतर बाहेर काढल्यावर याचे चवदार आईस्क्रीम तुम्हाला पाहायला मिळेल आता या आइस्क्रीमचा स्वाद घेण्यासाठी आईस्क्रीम तयार झालेले असे. आता हे आईस्क्रीम बनविण्यासाठी आपल्याला घरातील दररोजच्या वापरामध्ये काही साहित्य लागले आहे त्यामुळे आपला खर्च देखील कमी होतो. आणि आपल्याला चविष्ट आईस्क्रीम देखील खायला मिळते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.