99 टक्के लोक चुकीच्या पद्धतीने पाणी पितात, पाणी नेमके कसे प्यायला हवे.? आयुष्य बदलून जाईल.

आरोग्य

आपल्यापैकी अनेकजण पाणी पितात. काही जण पित नाही. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला पाणी प्या असे वारंवार सांगत असतात पण आपण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत असतो.अनेकदा आपण पाणी तर पितो पण पद्धत चुकीची असते. आता तुम्ही सर्वजण असा विचार करा की पाणी पिण्याची योग्य पद्धत काय असू शकते. पाणी तर एकाच प्रकारे प्यायले जाते ते कोणत्याही प्रकारे प्यायल्यास आपल्याला काय होणार आहे तर तसे नाही.

पाणी पिण्याची देखील एक योग्य पद्धत असते. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. आजकाल बहुतांश लोक ग्लास ऐवजी बाटलीतून पाणी पितात. फ्रिजमधून थंड पाणी काढून उभे राहून बाटलीतील पाणी पिण्यास सुरुवात करतात. लोक ऑफिसमध्येही बाटली वापरतात आणि त्यातून पाणी पितात पण ही सवय चुकीची आहे त्यामुळे तुमचे अनेक नुकसान होऊ शकतात. विशेषत: भरपूर पाणी प्यावे.

प्रखर सूर्यप्रकाश आणि घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता असते त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. कमी पाणी प्यायल्याने आपली त्वचा आणि केस निर्जीव होतात. शरीरातील बॅक्टेरिया व्हायरससारखा संसर्ग होण्याचा धोकाही असतो, अशा परिस्थितीत डॉक्टर अधिकाधिक पाणी पिण्याचा सल्ला देतात मात्र,पाण्यासोबतच पाणी पिण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची आहे आणि याच पद्धती आज आपण जाणून घेणार आहोत नेहमी ग्लासचे पाणी तिने अत्यंत गरजेचे आहे.

हे वाचा:   तेलात हा एक पदार्थ मिसळून हाता-पायाला लावा.! हातापायाचा सगळा मळ, घाण निघून जाईल.! एका दिवसात हात पाय चमकू लागतील.!

आजकाल बहुतांश तरुण बाटलीतील पाणी पितात, जे आरोग्यासाठी चांगले नाही. ज्यामुळे आपण पाणी कमी पिऊ शकतो. बाटलीपेक्षा जास्त पाणी ग्लास मधून प्यायल्यास आपण भरपूर पाणी पितो अशा प्रकारे, आपण पूर्ण ग्लास पाणी सेवन करतो तेव्हा एक छोटे घोट घेतल्यानंतरच पाणी प्यायला हवे त्याचबरोबर पाणी पिताना नेहमी बसून पाणी पिणे गरजेचे आहे. अनेकदा लोक बाटलीतून पाणी पिताना उभे राहून पाणी पितात.

उभे राहून पाणी प्यायल्याने शरीराला हानी होते. चालण्याचे, सांध्यांशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच असे म्हटले जाते की, पाणी नेहमी बसून प्यायला हवे त्यामुळे नेहमी हळूहळू पाणी पिण्याचा प्रयत्न करा. अजून एक गोष्ट लक्षात ठेवणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे जास्त थंड पाणी पिऊ नये. अनेकजण फ्रीजमधून थंड पाण्याच्या बाटल्या काढून पिण्यास सुरुवात करतात, असे केल्याने आरोग्याला हानी पोहोचते.

जास्त थंड पाणी प्यायल्याने पचनक्रियेत बिघाड होतो. थंड पाणी प्यायल्याने घसा खवखवतो, सर्दी होण्याची भीती असते. उन्हाळ्यात थंड पाणी पिऊ नये. यामुळे रोगप्रतिकार शक्ती ही कमकुवत होते. कोमट पाणी प्यावे. जर ते खूप गरम असेल, तर खोलीच्या तापमानाप्रमाणे गरम पाणी प्या. किमान 3 वेळा प्रयत्न करा त्याचबरोबर दिवसातून जास्त जमत नसेल तर एक लिटर पाणी तरी पिणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला प्रयत्न केला पाहिजे की दिवसात आपण जास्तीत जास्त पाणी पिऊ शकू.

हे वाचा:   ज्वारीचे सेवन करणारे लोक हे एकदा नक्की वाचा, नाहीतर...

जेवल्यानंतर लगेचच पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते यामुळे काय होते तर जेव्हा आपण जेवतो आणि जर आपण लगेचच पाणी प्यायले तर त्यामुळे आपले जेवण पचायला कठीण जाते त्यामुळे जेवणा नंतर किमान एका तासानंतर पाणी पिणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. आपल्याला कोमट पाण्याचा वापर जास्त केला पाहिजे कारण जेव्हा आपण कोमट पाणी पितो ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नाही.

सोबतच कोमट पाणी प्यायल्याने ऍसिडिटी होत नाही त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये कोमट पाणी पिणे गरजेचे आहे.जर आपण सकाळी उठून सर्वप्रथम कोमट पाणी प्यायले तर आपले वजन कमी होण्यासाठी देखील मदत होते त्यामुळे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. की शक्य होईल तेवढे कोमट पाणी प्यायले पाहिजे. हे सर्व प्रकार आपण वापरले किंवा या सर्व गोष्टी योग्यरीत्या पार पाडल्या तर आपण एक हेल्दी आयुष्य जगू. कधीही आपल्याला कोणता भविष्यात आजार होणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.