हार्ट अटॅक चे हे लक्षण कोणीही ओळखू शकत नाही.! हे लक्षण प्रत्येकाला माहिती हवे.! आयुष्यात खूप उपयोगी पडेल ही माहिती.!

आरोग्य

आजकाल हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. हार्ट अटॅक कशामुळे येतो किंवा तो कधी येईल हे सांगता येत नाही, हे खरे आहे पण हार्ट अटॅक येण्यापूर्वीची लक्षणे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. जर आपल्यालाही लक्षणे माहीत असतील तर पुढे जाऊन आपण हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणत्याही माणसाला वाचवायचा प्रयत्न करू शकतो,त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत हार्टचा येण्यापूर्वीची लक्षणे चला तर मग जाणून घेऊया.

आजकाल अनेकांना हार्ट अटॅक हा आजार कधी येईल हे सांगू शकत नाही आणि हा अटॅक कशामुळे येतो, हे देखील आपल्याला माहीत नसते. जर कोणत्याही व्यक्तीला हार्ट अटॅक येणार असेल तर त्या आधी व्यक्तीचे मूड स्विंग होतात. आता मूड स्विंग होणे म्हणजे काय तर जर माणूस हसत असेल तर दुसऱ्या क्षणाला त्याला राग यायला लागतो. जर तो रागात असेल तर दुसरा क्षणाला तो कोणत्यातरी विचारांमध्ये गुंग होतो.

यालाच मूड स्विंग होणे असे म्हणतात. त्याचबरोबर कोणत्यातरी विचारात असणे, स्वतः मध्ये गुंग असणे किंवा सारखा राग येणे ही लक्षणे असू शकतात त्यामुळे या गोष्टी हार्मोनल चेंजेस होत असल्यामुळे घडून येतात. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनडायझेशन याचाच अर्थ अपचन. रिसर्चमध्ये हे दिसून आले आहे की, ज्या लोकांना समस्या आल्या आहेत त्या आधी त्यांना अपचनचा त्रास देखील होत होता त्यामुळे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये दररोज अपचन होत असेल तर त्याला नजर अंदाज न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

हे वाचा:   लसणाचा केला जाऊ शकतो असाही उपयोग, कानामध्ये टाकून ठेवा काही वेळ सर्व ठणक दोन मिनिटात शांत होईल.!

सोबतच स्वेटिंग म्हणजे शरीराला भरपूर प्रमाणामध्ये घाम सुटणे. जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा कोणतेही काम करत असाल आणि तुम्हाला घाम येतोय तर त्यामध्ये आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही कारण आपण कोणते तरी काम केल्यावर किंवा शरीराची हालचाल केल्यावर आपल्याला घाम येतो पण जर आपण एका जागेवर बसलेलो असू आपण काहीच करत नसू आणि जर आपल्याला घाम येत आहे तर ही मात्र चिंतेची बाब आहे.

अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण आपण अनेकदा बघितलेले असेल की ज्यांना हार्ट अटॅक येतो त्या आधी त्यांना भरपूर घाम सुटतो त्यामुळे जर तुम्हाला काही काम न करता घाम येत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेस्ट पेन म्हणजेच छातीत दुखणे. आपण अनेक मालिकांमधून किंवा चित्रपटांमधून पाहिले असेल किंवा आपल्यासमोर कधी कोणाला हार्ट अटॅक आला असेल तर आपण पाहिलं असेल की हार्ट अटॅक येण्यापूर्वी त्यांच्या छातीमध्ये दुखायला सुरुवात होते आणि त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक येतो.

सोबतच आळस येणे किंवा थकवा जाणवणे ज्यांना आजपर्यंत हार्ट अटॅक आला आहे त्यांचे असे म्हणणे आहे की त्यांना जेव्हाही हार्ट अटॅक आला आहे त्या आधी त्यांना आळस आणि थकवा जाणवला आहे त्यामुळे जर तुम्हाला वरच्यावर थकवा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे कारण ही लक्षणे हार्ट अटॅक ची असू शकतात त्यानंतर ब्रीदिंग प्रॉब्लेम्स म्हणजे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होणे.

हे वाचा:   या वेळी आणि अशाप्रकारे जो खाईल अंडा त्याला मिळेल अंड्याचा डबल फायदा.!

आपल्याला श्वास घेण्यास अडथळे निर्माण होणे ही एक मोठी समस्या आहे. जर हे हार्ट अटॅकचे लक्षण जरी नसेल तरी देखील श्वास घेण्यास अडथळे येणे, हे कोणत्या ना कोणत्या आजाराचे कारण बनू शकते त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास आता होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणे डॉक्टरला आपला आजार दाखवणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकनेस म्हणजेच चक्कर येणे.

जर तुम्हाला दररोज किंवा दर काही दिवसानंतर चक्कर येत असेल तर मात्र हे एक हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला फक्त चक्कर येत असेल तर तो एक वेगळा आजार असू शकतो पण वर दिलेल्या गोष्टीनुसार जर त्याबरोबर तुम्हाला चक्कर येत असेल तर मात्र काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

ही सर्व लक्षणे हार्ट अटॅकची असल्यामुळे तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण दिसून येत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घ्या आणि आपल्याला हार्ट अटॅक येण्यापासून वाचा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.