अंघोळी आधी असे केस धूनाऱ्यांचे केस कधीही गळत नाही.! कोरपडीचा असा वापर केसांना दुपटीने वाढवतो.!

आरोग्य

आपण सर्वजण आपल्या केसांची काळजी अगदी योग्यरीत्या घेत असतो पण कधी कधी आपण असे काही बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरतो ज्यामुळे आपले केस होतात तुटू लागतात. केसांची वाढ होत नाही आणि केसांमध्ये कोंडा देखील निर्माण होतो त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. जो उपाय वापरल्यामुळे आपल्या केसांना एक चमक येईल सोबतच आपले केस मजबूत होण्यास मदत होईल.

केस गळती होण्यापासून देखील आपल्याला मदत मिळेल, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. आणि हा घरगुती उपाय कशाप्रकारे बनवायचा आहे. हा घरगुती उपाय बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे वापरायचे आहे ते म्हणजे एलोवेरा जेल. एलोवेरा जेल हे बाजारात सहज उपलब्ध होते परंतु जर तुमच्या कडे अंगणातील कोरफड असेल तर उत्तम.

आपल्याला आजचा उपाय करण्यासाठी अंगणातील कोरफडीचे जेल वापरायचे आहे कारण जर आपण यामध्ये नैसर्गिक रित्या या कोरफडीचा वापर केला तर तो जास्त फायदेशीर ठरेल. एलोवेरा जेल मुळे केसांची चांगली वाढ होते त्याचबरोबर त्वचेला जेल लावल्यानंतर त्याठिकाणी र’क्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. जर आपल्या केसांना डेंड्रफ ची समस्या असेल तर एलोवेरा जेल मुळे ही समस्या दूर होते.

जर तुमचे केस अधिक गळत असतील किंवा तुटत असतील तर यासाठी एलोवेरा जेल उपयुक्‍त ठरतो. एलोवेरा जेल मध्ये सिस्टीन आणि लायसिन हे घटक असतात, ते केस गळण्यापासून वाचवतात. एलोवेरा जेल केसांचा थीकनेसपणा वाढवतात याच बरोबर यामुळे केस सरळ दिसतात त्यामुळे इथे आपल्याला एलोवेरा जेल चा वापर करायचा आहे. आता अनेक जण असे देखील म्हणतात की एलोवेरा जेल वापरल्यानंतर आमच्या त्वचेला खाज येते.

हे वाचा:   नसांमध्ये कमजोरी, सूज, नसा ब्लॉक होणे, सर्व समस्या असतील तर चिंता करू नका.! हे एक काम करा, आठ दिवसात सगळं काही आपोआप ठीक होईल.! जाणून घ्या कसे.!!!

किंवा आम्हाला ते सूट होत नाही तर तसे नाही आहे एलोवेरा फांदी जेव्हा कापतो तेव्हा त्याला कोणत्यातरी एका ग्लासामध्ये उलटे ठेवायचे आहे काही वेळानंतर जिथून आपण ते कापले आहे तिथे पिवळ्या रंगाचे एक जेल आपल्याला बाहेर आलेले दिसेल. हे जेल आपल्यासाठी विषारी असते. तो पिवळा थर काढून टाकल्यावरच एलोवेरा जेल आपण सहज वापरू शकतो. असे करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो त्यामुळे आपण कोरफड फांदी कापून घेतल्यानंतर त्याच्या शिरा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि शिरा कापून झाल्यावर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत.

त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला येथे वापरायचे आहे. आता आपल्याला जास्वंदीची पाने लागणार आहे.हे पाने हे सुंदर आणि ब्राइट फुल केसांच्या समस्याला दूर करण्यासाठी मदत करते. या फुलांमुळे केस गळती, कोंडा देखील दूर होतात. या फुलांच्या पाकळ्या आणि पानांचा लेप तयार करून केसांना लावू शकता यामुळे केसांच्या अडचणींवर मात करता येते. जास्वंदीची पान, फुल हे आपल्या केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे त्यामुळे इथे आपल्याला पाच ते सहा जास्वंदीची पाने देखील घ्यायची आहे.

तिसरी गोष्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ती म्हणजे मेथीचे दाणे. मेथीचे दाणे आपल्या केसांसाठी किती उपयोगी आहेत हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात ही मेथीचा वापर करण्यात आला आहे. मेथीच्या दाण्यांमध्ये लोह, जस्त आणि भरपूर प्रमाणात प्रथिने आढळून येतात, ज्यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होते. यात अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत, जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.

हे वाचा:   चिकन कलेजी खाणाऱ्या 99 टक्के लोकांना हे माहिती नाही, आजच जाणून घ्या नाहीतर होईल खूप मोठा पछाताप.!

त्यामुळे आपल्याला इथे एक ते दोन चमचे मेथी दाणे टाकायचे आहेत. या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ,या पेस्ट मध्ये पाणी टाकायची गरज नाही कारण एलोवेरा मध्ये पूर्वीपासून एक जेल असल्यामुळे ही बारीक पेस्ट आपोआप बनवून तयार होईल. ही पेस्ट तयार करून झाल्यानंतर आपल्या केसांवर लावायची आहे आणि एक ते दोन तासानंतर आपल्याला केस धुवायचे आहे. दहा दिवसांमधून एकदा जरी हा उपाय वापरला तरी देखील आपली केस गळती, केसांमधील कोंडा आणि केसांसंदर्भात होणारे अनेक त्रास दूर होतील आणि आपले केस देखील वाढू शकतील एवढा जालीम हा उपाय आहे.

त्याचबरोबर यामध्ये वापरले गेलेले सर्व घटक हे औषधी असल्यामुळे त्याचा आपल्या केसांवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. केस काळे भोर होण्यास मदत होईल सोबतच याच्या एका वापरामध्ये तुम्हाला भरपूर फरक झालेला दिसून येईल. केस चमकदार आणि मुलायम बनतील त्यामुळे आपला होणारा बाहेरचा अधिकचा खर्च देखील कमी होईल व आपल्याला आपले मऊ मुलायम आणि चमकदार केस नव्याने मिळतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.