सतत ऍसिडिटी.! सतत गॅस.! कंटाळा आलाय का.? चिंता करू नका फक्त एक ग्लास प्या.! पूर्ण महिनाभर पोटाचा कणभर सुद्धा त्रास होणार नाही.!

आरोग्य

गरमीच्या दिवसांमध्ये आपल्या सर्वांनाच पोटाचे आजार भरपूर प्रमाणात होत असतात. फक्त गरमीच्या दिवसांमध्येच नाही तर इतर दिवसांमध्ये देखील आपल्याला पोटाचा आजार होत असतात जसे की उलटी येणे, मळमळल्यासारखे होणे, ऍसिडिटी, किंवा पोट खराब होणे असे अनेक आजार आपल्याला होत असतात यावर आपण अनेक उपाय करत असतो जसे की डॉक्टर जवळ जाऊन त्यांचा सल्ला घेऊन काय औषधे खाणे पण दररोज औषधांचा वापर केल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा नुकसान देखील होऊ शकतो.

त्यामुळे आज आपण असा एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्यामुळे आपल्याला पोटाचे असणारे सर्व आजार कायमचे दूर होतील आणि हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील होणार नाही. आपले भरपूर पैसे वाचतील,चला तर मग जाणून घेऊया हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे आणि हा उपाय बनविण्यासाठीची प्रक्रिया काय असणार आहे हे जाणून घेऊया.

सर्वप्रथम आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे पुदिना. पुदिना हा पोटासाठी अत्यंत उपयोगी असून तो आपल्या शरीरासाठी देखील तेवढाच फायदेशीर आहे त्यामुळे गरमीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पुदिनाचा वापर केला जातो. पुदिना हा शीत प्रवृत्ती चा असतो त्यामुळे गरमीमध्ये पुदिना सेवन केल्यास आपल्याला अधिक फायदेशीर ठरतो. पुदिना मध्ये असे काही गुणधर्म असतात त्यामुळे आपले पोट साफ राहण्यास मदत होते.

त्याबरोबरच ऍसिडिटी, गॅस यासारखे आजार होत नाहीत. इथे आपल्याला एक वाटी पुदिन्याची पाने घ्यायची आहे आणि त्याची बारीक पेस्ट तयार करायची आहे. हवे असेल तर या पेस्ट मद्ये तुम्ही थोडेफार पाणी देखील यामध्ये टाकून शकता. सोबतच हा उपाय लगातार सात दिवस आपल्याला करायचा आहे, त्यामुळे एकदाच पेस्ट तयार करून आपण तीन दिवसासाठी ती पेस्ट वापरू शकतो. तीन दिवसापेक्षा जास्त दिवस ही पेस्ट वापरू नये त्यामुळे आपल्याला ही पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये तीन दिवसासाठी स्टोअर करून ठेवायची आहे.

हे वाचा:   रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेला गूळ सकाळी उठून खाल्ला तर काय झाले तुम्हीच वाचा.! असा चमत्कार तुम्ही आयुष्यात देखील बघितला नसेल.!

एकदाका ही पेस्ट तयार करून झाली की एका ग्लासामध्ये एक चमचा पेस्ट घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचे आहे. या ग्लासमध्ये काठोकाठ पाणी भरून टाकू नये कारण यामध्ये अजून काही गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट आपल्याला इथे टाकायची आहे ती म्हणजे जिरे. जिऱ्याची पावडर आपल्याला या मिश्रणमध्ये वापरायचे आहे. आता तुमच्यापैकी अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की जिरे हे गरम असते पण इथे आपल्याला जिऱ्याचा वापर भाजून त्याची पावडर तयार करून करायचा आहे.

जेणेकरून तो आपल्या शरीरासाठी थंडावा देण्याचे काम करेल त्यामुळे भाजून घेतलेल्या जिऱ्याचा एक चमचा वापर आपल्याला या मिश्रण मध्ये करायचा आहे. त्यानंतर एक चमचा काळ्या मिरीचा वापर करायचा आहे. काळ्या मिरीच्या एक चमचा वापराने आपल्याला उलटी सारखे होत असेल तरी ते देखील बरे होण्यास मदत होईल. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला काळे मीठ देखील एक चमचा टाकायचे आहे त्याने देखील पचनास मदत होते व आपली पचनक्रिया सुधारते.

हे वाचा:   एका लसणाने महिन्याभरात पाच किलो वजन कमी केले.! वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी लसूण आहे एक वरदान.! फक्त कसे खायचे हे नक्की वाचा.!

ऍसिडिटी आणि अपचनासारखे आजार आपल्याला होत नाही. एक ते दोन चिमूटभर एवढे हिंग टाकायचे आहे. हिंगामुळे देखील पचनक्रिया सुधारते. आपल्याला दोन चिमूट हिंगाचा वापर करायचा आहे. आता हे पाणी एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचे सेवन आपल्याला दररोज सकाळी उठल्यानंतर करायचे आहे, जेणेकरून आपले पोट साफ राहण्यास मदत होईल सोबतच जेवल्यानंतर ची जळजळ असते ती देखील निघून जाण्यास मदत होईल.

त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर या मिश्रणाचा वापर आपल्याला करायचा आहे. आपल्याला चाय चे सेवन सात दिवसांसाठी बंद करायचा आहे, कारण चहाच्या जागेवरच आपल्याला हा जो बनवून घेतलेला काढा आहे तो प्यायचा आहे. त्यामुळे जर शक्य असेल तर सात दिवसांसाठी चहा पूर्णपणे बंद करायचा आहे, आणि फक्त या उपायाचा वापर करायचा आहे. हा उपायाचा वापर केला नंतर तुम्हाला भरपूर प्रमाणात फरक झालेला दिसून येईल, छातीत झालेली जळजळ कमी होईल, अन्नपचन सुरळीत होईल.

त्याचबरोबर उलटी सारखी समस्या देखील भविष्यात होणार नाही. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.