चिकन मटन बनवताना हे दोन मसाले टाका.! जबरदस्त चव येईल.! हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल असे मटन घरीच बनवा.!

आरोग्य

आपल्यापैकी अनेक जण मांसाहारी पदार्थ सेवन करत असतील तर अश्या वेळी तुम्हाला मटण नक्कीच खायला आवडत असेल आणि आपल्यापैकी अनेक जण घरी नाही तर हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये जाऊन मटण खात असतील कारण आपल्या घरापेक्षा अनेकदा आपल्याला चांगल्या गोष्टी बाहेरच्याच म्हणजे रेस्टॉरंट मध्ये किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाण्यास आवडतात म्हणूनच आज आपण असा एक वेगळा प्रकार घरबसल्या कसा बनवायचा आहे हे सांगणार आहोत.

हॉटेल व रेस्टॉरंट सारखे मटण घरबसल्या कसे बनवायचे हे देखील जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया घरबसल्या मटण कशाप्रकारे बनवायचे आहे आणि त्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे त्याबद्दल . आज ची चविष्ट आणि लज्जतदार रेसिपी बनविण्यासाठी आपल्याला सर्वप्रथममटण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि मटणला मॅरीनेट करून घ्यायचे आहे.

आता मॅरीनेशन साठी आपल्याला एक वाटी आले, लसूण पेस्ट टाकायची आहे त्यानंतर त्यावर एक चमचा लाल तिखट, एक चमचा काश्मिरी लाल मिरची, एक चमचा हळद, आणि एक चमचा गरम मसाला टाकून हे सर्व मसाले व आले, लसूण पेस्ट मटण ला व्यवस्थित रित्या लावून घ्यायचे आहे. या मसाल्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे मसाले लावून झाल्यानंतर किमान एक तास आपल्याला हे मिश्रण लावून असेच ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून हे मसाले व्यवस्थित रित्या मटन ला लागतील.

त्यानंतर आपल्याला अजून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला इथे पाच ते सहा काजू लागणार आहेत. चार लवंग चार वेलचीच्या तुकडे आणि या सर्वांची एक बारीक पेस्ट तयार करायची आहे. तुम्हाला मिक्सरला लावून करायची असेल तर पेस्ट मध्ये थोडेसे पाणी देखील वापरायचे आहे. त्यानंतर आपण हे मटण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे एक वाटी मोहरीच्या तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे.

हे वाचा:   या तीन राशीचे नशीब फिरले, 132 वर्षानंतर आला महासंयोग, पुढील दहा वर्ष कायम असेल राजयोग.!

त्यामुळे गॅस वर कुकर ठेवल्यानंतर एक वाटी मोहरीचे तेल यामध्ये टाकून गरम करून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये तेज पत्ता ची पाने टाकायची आहे आणि दोन दालचिनीचे तुकडे. आणि त्यानंतर आपण मॅरीनेट करून घेतलेले जे मटण आहे ते या मिश्रणमध्ये टाकायचे आहे. आणि मंद आचेवर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करून टाकायची आहे सोबतच दोन मोठे कांदे घेऊन भाजून घ्यायचे आहेत.

आता त्याची देखील बारीक चटणी करून यामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर परत एकदा मंद आचेवर पाच मिनिटांसाठी मटण शिजवायचे आहे. मटण शिजवताना लक्षात घ्यायचे आहे की मटण आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. सोबतच आपल्याला यामध्ये आपण काजूची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती पेस्ट देखील यामध्ये टाकायची आहे आणि बारीक कापून कोथिंबीर देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत थोड्या वेळासाठी मटण शिजू द्यायचे आहे.

थोड्या वेळ शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे आहे पण तत्पूर्वी आपल्याला हे थोडेसे शिजवून घ्यायचे आहे. मटण शिजल्यानंतर आपल्याला एक कप पाणी यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला कुकर बंद करून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत तुम्हाला मटन जास्त मऊ हवे असेल तर तुम्ही चार शिट्ट्या देखील करू शकता.

हे वाचा:   कोल्हापुरी चिकन थाळी बनवून त्याच्या स्वादाने सगळ्यांना वेड करून टाका.! हॉटेल मध्ये जाऊन पैसे वाया घालवत बसू नका, एकदा घरी अशी चिकन थाळी बनवली तर वेडे व्हाल.!

शिट्ट्या करून झाल्यावर थंड झाल्यावर परत आपल्याला कुकर उघडून घ्यायचा आहे आणि ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी परत दोन ते तीन मिनिटे हे मटण शिजवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक कापलेले कोथिंबीर देखील टाकायची आहे. थोडा वेळ कुकर बंद करायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे. पाच मिनिटांनी आपण हे मटण सर्व्ह करून खाऊ शकतो.

या मटण ची चव तुम्हाला अगदी रेस्टॉरंट किंवा हॉटेलच्या चवीसारखी लागेल यामध्ये आपण वापरलेले सर्व घटक हे रेस्टॉरंट मध्ये वापरल्या गेल्या घटकांशी अगदी मिळते जुळते असल्यामुळे आणि आपण त्याच प्रकारे ही रेसिपी फॉलो केलेली असल्यामुळे आपले मटण अजून चविष्ट आणि झणझणीत होईल, जेणेकरून तुम्ही कधीही घरबसल्या रेस्टॉरंट आणि हॉटेल सारखे मटन बनवू शकता ते ही कमीत कमी वेळेमध्ये आणि त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याचा देखील गरज भासणार नाही.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.