आपल्यापैकी सर्वांनाच बिर्याणी खायला आवडते. बिर्याणी चे वेगवेगळे प्रकार हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, तंदुरी बिर्याणी, कबाब बिर्याणी, दम बिर्याणी, व्हेज बिर्याणी अशा विविध प्रकारच्या आपण अनेकदा खात असतो. बिर्याणी हा अनेकांचा जीव की प्राण असतो म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक आगळी वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत.
आपण बिर्याणी कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत व त्याचबरोबर घरच्या घरी देखील हॉटेल सारखी बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला जाणून घेणार आहोत आणि ही बिर्याणी काही वेळातच तयार होईल. तुम्हाला अगदी हॉटेल सारखी चव देखील मिळवून देईल. चला तर मग जाणून घ्या कि अंडा बिर्याणी कशी बनवायची आणि त्यासाठी नेमके कोणकोणते साहित्य आपल्याला लागणार आहे त्याबद्दल.
साहित्य: एक कप बासमती तांदूळ, एक कप बारीक, चिरलेला कांद आणि टोमॅटो, चार चमचे दही, जवित्री, तमालपत्र, दालचीनी, काळीमिरी, लवग, पाव चमचा जिरे, दोन हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना ची पान, तळलेला कांदा, एक चमचा धणे पूड // अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, बिर्याणी मसाला, एक चमचा आल लसुन पेस्ट, तेल / तूप आता आपण पाहूया अंडा बिर्याणी कशी करावी.
सर्वात आधी तांदूळ नीट धुवून घ्या. अर्धा तास तांदूळ भिजत ठेवावा जेणे करून तांदुळाचा आकार वाढेल. तांदूळ भिजवून झाल्यानंतर मध्यम आचेवर गॅस ठेवून ते भिजवलेले तांदूळ एका टोपात घेऊन त्यामध्ये पाच ते सहा कप पाणी घालायचे आहे आणि त्यामध्ये वरील साहित्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ते सर्व खडे मसाले त्या पाण्यात घालायचे आहेत. आणि ते गरम करण्यास ठेवायचे आहे. 80 ते 90 टक्के तरी तांदूळ आपला शिजवुन घ्यायचा आहे.
त्यानंतर एका बाऊलमध्ये एक चमचा लाल तिखट , अर्धा चमचा गरम मसाला , एक चमचा धने पूड , ½ हळद , ½ मीठ हे सर्व सुखे मसाले एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये उकडलेली अंडी घालायचे आहेत परंतु उकडलेल्या अंड्यांमध्ये आपल्याला थोडेसे चिरा करून घ्यायचे आहे जेणेकरून सर्व मसाले अंड्यांना पूर्णपणे मॅरीनेट होतील. उकडलेले अंडे त्या मसाल्यांमध्ये पूर्णपणे एकत्र करून झाल्यावर ते अंडी तव्यावर थोडीशी शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत.
त्यानंतर मध्यम आचेवर गॅस ठेवून त्यावर एक कढई गरम करायला ठेवायची आहे. त्यामध्ये एक चमचा तेल, एक चमचा साजूक तूप घालायचा आहे आणि तेल व तूप थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, आलेलसूण पेस्ट, धणे पूड, हळद, हिरवी मिरची घालायची आहे आणि पुन्हा ते तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे.
परतून झाल्यानंतर त्यामध्ये दही घालून ते परतवायचा आहे आणि ते दोन मिनिट शिजवुन घ्यायचा आहे. दोन मिनिटे शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालायची आहेत. सर्व मिश्रण मिसळून घ्यायच आहे. सर्व मिश्रण मिसळून घेतल्यानंतर त्यामध्ये शॅलो फ्राय केलेली अंडी आहेत ती घालायची आहेत व ते पुन्हा सर्व एकत्र करायचा आहे. एकत्र करून झाल्यावर त्यामध्ये जे आपण शिजवलेला भात आहे तो घालायचा आहे.
शिजवलेल्या भारतामध्ये जर पाणी असेल तर ते पाणी गाळून घ्यायचे नंतर त्याचा वापर करायचा आहे. शिजवलेला भात घालून झाल्यानंतर त्यावर ती तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिनाची पाने, तूप व थोडे पाणी घालायचे आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर गॅस ठेवायचं आहे व ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. अन् बिर्याणी थोडी वेळ तशीच ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही ही बिर्याणी सहजच खाऊ शकता.
अशा प्रकारे अगदी हॉटेल सारखी लज्जतदार आपली अंडा बिर्याणी ही तयार झालेली आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.