लांबसडक केसांसाठी जास्त काही नाही करावे लागते हे छोटेसे काम.! अनेक महिला यामुळे आहेत खुश.!

आरोग्य

मित्रांनो, सुंदर केस हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. जसा आपला चेहरा आपल्या सौंदर्याचे, व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे तसेच आपले केस देखील हे आरोग्याचे, सौंदर्याचे प्रतीक आहेत. कोणाचे कुरळे केस असतात तर कोणाचे सरळ कोणाचे काळेभोर तर कोणाचे पिंगट कुणाला लांब केस आवडतात तर कोणाला छोटे केस आवडतात. आपल्या व्यक्तिमत्त्वात भर टाकते ती आपल्या केसांची चेहऱ्याला शोभेल अशी केशरचना.

पण सतत केसांच्या तक्रारी समस्या असतील तर तुम्ही केशरचना करू शकत नाही. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात बदल तर दिसतोच शिवाय तुमचा आत्मविश्वासही डगमगतो. पुरुषांचे केस स्त्रियांच्या मानाने छोटे असतात. स्त्रियांचे केस मोठे असल्यामुळे गळल्याचे जास्त प्रमाणावर दिसून येते. तर आज आपण केसांचा तक्रारी आणि घरगुती उपाय बघणार आहोत.

हल्ली केस गळणे, केसात कोंडा होणे, अकाली केस पिकणे यासारख्या समस्या सर्वत्र बघायला मिळतात. त्याच्या जोडीला केस अर्धवट तुटणे, रुक्ष होणे, चाई किंवा टक्कल पडणे, केसांना फाटे फुटणे या समस्यांची भर पडलेली दिसते. कोणताही उपाय करण्यापूर्वी त्याचे मूळ कारण जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते.

हे वाचा:   रोज-रोज होणाऱ्या पित्तावर याच्या पेक्षा सरळ सोपा उपाय नसेल.! ना कुठले औषध ना गोळी फक्त एकदा खायचे आणि पित्त विसरून जायचे.!

केसांच्या तक्रारींमध्ये चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, ताणतणाव, हार्मोनल इमबॅलन्स, व्यसन, विभिन्न प्रकारचे हानीकारक केसांचे सौंदर्यप्रसाधन, post टायफाईड किंवा post pregnancy नंतर केसांच्या तक्रारी वाढल्याचे दिसून येते. आम्ही तुम्हाला पुढे उपाय सुचवूच पण एक छोटीशी टीप तुमच्या आहारामध्ये बायोटीन, झिंक, सेलेनियम, लोह, बी 12, विटामिन ए,इ, डी, कॉपर मॅग्नेशियम आदी घटक असलेले पदार्थांचे सेवन वाढवा.

पुरेशी झोप घ्या. रात्रीचे जागरण कमी करा. रासायनिक उत्पादनां ऐवजी नैसर्गिक उत्पादने जसे शिकेकाई रिठा वापरा. हिरव्या पालेभाज्या फळे यांचे सेवन करावे. केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरु जास्त गरम पाणी वापरू नये. आता वळुयात आपल्या मूळ मुद्द्याकडे आजच्या उपायाकडे. यासाठी आपल्याला लागणार आहे आंबट दही आणि नेस कॉफी.

एक वाटी आंबट दही घ्या. यात एक मोठा चमचा कॉफी एकत्र करा. हा हर्बल हेयर पॅक तुम्हाला आपल्या केसांच्या मुळांशी लावायचा आहे. मेहंदी लावतात तसेच ब्रशने हे मिश्रण आपल्या केसांच्या मुळाशी लावा. सुमारे पाऊण ते एक तास असेच ठेवा. यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुऊन टाका. दुसऱ्यादिवशी हर्बल शाम्पूने केस धुवावे. हा उपाय आठवड्यातून केस धुण्याआधी दोनदा करावा.

हे वाचा:   असा उपाय तुम्ही कधी ऐकला सुद्धा नसेल, झटपट चरबी कमी, पोटातला गॅस शून्य मिनिटात बाहेर.!

वर दिलेल्या कोणत्याही प्रकारच्या केसांच्या समस्या असतील तर त्या दूर होतील. शिवाय केसांना कॉफीचा नैसर्गिक रंग येईल. तुम्हाला मिळतील सुंदर दाट मऊ लांब सडक केस. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.