फक्त एक चमचाभर घेऊन कोपऱ्यात ठेवा पाली जमा होऊ लागतील.! आयुष्यात पुन्हा घरात पाली दिसणार नाही.! एकदा करून बघावा हा घरगुती जुगाड.!

आरोग्य

हल्ली पावसाळ्याचे दिवस आहे. वातावरणामध्ये सगळीकडे ओलावा पाहायला मिळतो तसेच वातावरणामध्ये प्रचंड प्रमाणात गारवा पसरलेला आहे. या पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा आपल्या घरामध्ये कळत नकळत पाल, कीटक, झुरळ प्रवेश करतात. अनेकदा हे कीटक, झुरळ, पाल घरामध्ये आल्यावर सहसा बाहेर जाण्याचे नाव घेत नाही अशावेळी आपण अनेकदा वैतागून जातो व या सगळ्यांना घराच्या बाहेर काढण्यासाठी विविध उपाय करत असतो.

हल्ली बाजारामध्ये पाल, झुरळ,माशा यांना बाहेर काढण्यासाठी रासायनिक पदार्थ सहजच विक्रीला ठेवलेले असतात. बहुतेक वेळा हे विक्रीला ठेवलेले वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड आपण विकत आणतो आणि याद्वारे घरातील कीटकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो परंतु या सर्व रासायनिक पदार्थांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. जर तुम्हाला एखादी एलर्जी असेल तर तुम्हाला श्वासाचे आजार देखील होऊ शकतात.

त्याचबरोबर जर घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच अशा सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये आपले आरोग्य मजबूत राखण्यासाठी व घरातील पाल कीटक झुरळ यांना नैसर्गिक रित्या बाहेर काढण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने काही तासांमध्ये तुमच्या घरातील पाल सहजच बाहेर निघून जाईल आणि पुन्हा भविष्यात कधीच प्रवेश करणार नाही.

हे वाचा:   हातापायांना मुंग्या येणे, हातांच्या नसाचे दुखणे किंवा नसांची कमजोरी, शरीराच्या सर्व नसा मोकळ्या करा.!

चला तर मग जाणून घेऊया आजचा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे त्याबद्दल… आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला जे काही पदार्थ लागणार आहेत ते आपल्या घरामध्ये सहजरीत्या उपलब्ध होतात म्हणूनच आपल्या घरातील पाल, झुरळ यासारखे कीटक दूर करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक ग्लासभर पाणी लागणार आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला डेटॉलचे काही थेंब टाकायचे आहेत.

आपल्या सर्वांना डेटॉल माहितीच आहे. डेटॉल मध्ये असे अनेक घटक असतात, जे आपल्याला संरक्षण प्रदान करत असतात तसेच या डेटॉलचा वास हा उग्र असतो. या वासाने तुमच्या घरातील झुरळ पाल लवकरच बाहेर पडतील.आता आपल्याला डेटॉलचे काही थेंब पाण्यामध्ये टाकल्यानंतर एक ते दोन चमचा कांद्याचा रस लागणार आहे. कांद्याच्या रसाचा वास देखील उग्र असतो म्हणून आपल्याला हा रस इथे लागणार आहे त्यानंतर आपल्याला सायट्रिक ऍसिड पावडर लागणार आहे.

ही पावडर दुकानांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होते. एक ते दोन चमचा पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करायची आहे,आता सारे मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर आपल्याला एका बॉटलमध्ये हे मिश्रण भरायचे आहे आणि स्प्रे ने ज्या ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये झुरळ, पाल, माशा जास्त प्रमाणामध्ये फिरतात अशा ठिकाणी आपल्याला स्प्रे करायचा आहे, असे केल्याने काही दिवसातच तुमच्या घरामध्ये असलेल्या पाली झुरळ कीटक लगेच बाहेर निघून जातील व या मिश्रणाच्या उग्र वासामुळे पुन्हा घरामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटक प्रवेश करणार नाहीत.

हे वाचा:   कुठे ही दिसली ही पाने तर झटकन तोडून घ्या, याचे फायदे पाहून डॉक्टरही हैराण आहेत.!

हा उपाय केल्याने आपल्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही. हा अतिशय साधा सोपा व तितकाच प्रभावी उपाय आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय अवश्य करायला हवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.