जर आपले शरीर आपल्याला तंदुरुस्त आणि मजबूत हवे असेल तर आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशनची गरज असते.जर आपल्या शरीरामधील न्यूट्रिशन चे प्रमाण कमी होत गेले तर आपल्याला झोप येणे, थोडे चालल्यावर थकवा येणे, गुडघेदुखी होणे,कंबर दुखी होणे, हाडांमधून कटकट असा आवाज येणे डोकेदुखी, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे असे अनेक आजार आपल्याला होत असतात त्यासाठी आपल्या शरीराला न्यूट्रिशन ची गरज असते म्हणून आज आपण असे काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
ज्यामुळे तुम्हाला भरपूर न्यूट्रिशनची प्राप्ती होईल. तुम्हाला भविष्यात कोणतेच गंभीर असे आजार होणार नाही, चला तर मग जाणून घेऊया हा घरगुती उपाय बनविण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे आणि हा घरगुती उपाय कशाप्रकारे बनवायचा आहे. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत अळशी.अळशी मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे आपल्याला आपले वजन नियंत्रित करण्यास मोठी मदत मिळते.
अळशी आपली भूक कमी करते. आपल्याला पोट भरल्याची जाणीव होते.अळशीचे बियाणे र’क्तातील साखर नियंत्रित करते त्यामुळे शरीरावर मधुमेहाचे दुष्परिणाम कमी होतात. अळशी वजन कमी करते. अळशीचे बियाणे दैनंदिन जेवण्यात वापरल्याने वजन कमी करण्यास फायदेशीर असतात. ह्यात फायबर, ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि अँटी ऑक्सीडेन्ट असतात जे आपल्या शरीराला अत्यंत गरजेचे असते.
आज पर्यंत माशांमध्ये म्हणजेच मच्छी मध्ये जास्त प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते असे म्हटले जाते पण शाकाहारी लोक मच्छीचे सेवन करू शकत नाहीत त्यांच्यासाठी अळशी फायदेशीर आहे. आजचा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अळशी घ्यायची आहे. अळशी आपल्याला ड्राय रोज करून घ्यायची आहे म्हणजेच हलकी भाजून घ्यायची आहे जेणेकरून आपण त्याची पूड बनवू शकतो त्यानंतर ही भाजून झाल्यावर त्याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे.
ही पुड एवढेच बनवायची आहे जेवढी आपण एक आठवडा वापरू शकतो कारण अळशी जास्त पूड बनवून ठेवल्यास ती सात दिवसानंतर खराब होते. कारण या पुड ला हवा लागल्यावर ही खराब होण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर रोज भाजल्या जाणाऱ्या चपाती किंवा भाकरी मध्ये याचे एक ते दोन चमचा वापर करून आपल्याला चपाती किंवा भाकरी भाजून त्याचे सेवन करायचे आहे.
जर चार लोकांसाठी भाकरी बनत असेल तर फक्त दोन चमचे ही पावडर आपल्याला वापरायची आहे आणि जर सहा लोकांसाठी बनत असेल तर तीन चमचे अशाप्रकारे याचा वापर करायचा आहे. त्यानंतर यामध्ये ओवा आणि काळे तीळ हे देखील आपण टाकू शकतो जर चार लोकांसाठी भाकरी बनत असेल तर यामध्ये अर्धा चमचा काळे तीळ आणि त्याचा वापर करायचा आहे.
यामुळे भाकरी पचण्यास मदत होते जर आपल्याला जेवण बसले नाही तर आपल्या छाती मध्ये जळजळ सुरू होते याचे प्रमाण वाढते त्यामुळे याचा वापर आपल्याला भाकरी मध्ये वापर करायचा आहे. सांगितलेला उपाय हा आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे आपल्या शरीरामधील न्यूट्रिशन वाढण्यास मदत होईल त्याबरोबर आपले शरीर तंदुरुस्त आणि फिट राहील, जेणेकरून आपल्याला कधीही कोणते आजार होणार नाहीत.
आपल्याला पुढील आयुष्यामध्ये डॉक्टरच्या गोळ्या किंवा औषधे घेण्याची वेळ येणार नाही त्यामुळे जरी तुम्हाला कोणता आजार नसेल तरी देखील तुम्ही या घरगुती उपाय याचे सेवन करू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.