खोकला वर आहे हे जादुई औषध.! कोणी खोकताना दिसले तर हे एक पान लगेच द्या.! दुसऱ्या क्षणाला खोकला गायबच झाला पाहिजे.!

आरोग्य

पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. या दिवसांमध्ये आपल्याला सर्वात जास्त आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे असते कारण बदलत्या वातावरणामुळे, पावसामुळे पावसाळ्यात होणाऱ्या वायरल तापामुळे, आपल्याला सर्दी खोकला कफ होत असतो. एकदा का कफ झाला आणि तो कफ सुकला की त्याच्यामुळे दम्याचा त्रास देखील सुरू होतो त्यामुळे जेव्हा सर्दी होते तेव्हाच तो कफ मुळापासून नाहीसा केला तर आपल्याला पुढील त्रास होणार नाही.

म्हणूनच आज आपण असे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत ज्याचा वापर केल्यामुळे आपला दमा सर्दी खोकला हे सर्व आजार दूर होतील व हा उपाय बनविण्यासाठी आपल्याला जास्त खर्च देखील होणार नाही, त्या उलट आपल्याला लवकरात लवकर बरे वाटेल. चला तर मग जाणून घेऊया.. हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती सामग्री लागणार आहे. या उपायासाठी आपल्याला वापरायचे आहे त्या वनस्पतीचे नाव आहे अडुळसा. आयुर्वेदामध्ये याचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो.

औषधी गुणधर्माचे भंडार आहे अडुळसाची पाने. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक औषधांमध्ये देखील अडुळसाचा वापर केला जातो. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. या वनस्पतीचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात. या पानांत वासिसाईन हे अल्कलोइद आणि अ‍ॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो. त्यामुळे अडुळसा अत्यंत औषधी आणि फायदेशीर आहे जिथे आपल्याला जास्त पैसे खर्च करून अनेक औषधी विकत घ्यावे लागतात तिथे अगदी शुल्लक किमतीमध्ये एका पानाच्या वापराने आपण मोठे मोठे आजार देखील कायमचे बरे करू शकतो.

हे वाचा:   जेवल्यानंतर खूपच ढेकर येतात.? पोटात सतत गॅस राहतो.? अहो मग चिंता करु नका हा उपाय देईल तुम्हाला या सर्वांपासून सुटका.!

त्यासोबतच आपल्याला या पानासोबत अजून एक गोष्ट वापरायची आहे ती म्हणजे काळी मिरी. एवढ्यात आपल्याला एवढे करून आले असेल की काळीमिरी आपल्या शरीरासाठी किती तरी पटीने जास्त उपयोगी आहे. औषधी गुणधर्मांचे भंडार असलेली काळी मिरी सर्दी खोकल्यासाठी तर उत्तम उपाय ठरते. सर्दी, खोकल्याने त्रस्त असणाऱ्या लोकांसाठी काळी मिरी अतिशय उपयुक्त उपाय ठरते. आयुर्वेदात काळ्या मिरीच्या सेवनाने सर्दी आणि खोकला ठीक होऊ शकतो.

असे अनेक शास्त्रात सांगितले गेले आहे म्हणून ज्या लोकांना सर्दी आणि खोकल्याची समस्या आहे त्यांनी मधासोबत काळ्या मिरीच्या पावडरचे सेवन करावे. एवढेच नाही तर जर काळी मिरी नसेल तर काळी मिरीची पावडर देखील आपण वापरू शकतो. दररोज सकाळी आपल्याला एक अडुळशाचे पान व त्यामध्ये एक काळी मिरी किंवा काळीमिरी पावडर टाकून खायचे आहे. हा उपाय आपल्याला दररोज सकाळी करायचा आहे,असे याचे सेवन केल्यामुळे दिवसभरात आपला कफ निघून जाईल.

हे वाचा:   म्हणून गणपती बाप्पा ला अर्पण कराव्या लागतात एकवीस दुर्वा.!

कफाचे प्रमाण जास्त असेल तर तीन ते चार दिवस दररोज याचे सेवन करा. एक आठवड्यासाठी देखील हा उपाय करू शकतो पण कफ किती आहे सर्दी खोकला किती आहे यावर या औषधाचे प्रमाण ठरवायचे आहे, त्यामुळे दररोज सकाळी उठल्यानंतर पान स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि मिरी सोबत हळूहळू चावून हे पान चघळून खायचे आहे जेणेकरून अडुळशाच्या पानातील सर्व औषधी गुणधर्म आपल्या पोटात जातील व आपला कफ हळूहळू पडेल. सर्दी व खोकला सारखे आजार देखील दूर होतील.

अडुळसा वनस्पती अत्यंत औषधी असल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही उलट त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.