शारीरिक मजबूती साठी कशातले पाणी पिणे योग्य.! कोणत्या भांड्यातले पाणी आरोग्यासाठी असते वरदान.! नक्की जाणून घ्या.!

आरोग्य

जेव्हा आपण पाणी पितो तेव्हा आपण पाणी पिण्यासाठी वेगवेगळ्या धातूचे ग्लास किंवा पेल्याचा वापर करतो. काही लोक तांब्याच्या भांड्यात ओतून पाणी पितात, काही लोक मातीच्या भांड्यातून पाणी पितात, तर काही लोक काचेच्या भांड्यातून देखील पाणी पितात आणि काही लोक अजूनही स्टील च्या भांड्यातून पाणी पितात. पण खरोखर ह्या गोष्टीने फरक पडतो का?

की आपण कोणत्या धातूच्या भांड्यातून पाणी पीत आहोत हे शरीरासाठी महत्वाचे ठरते का असे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. आपल्या शरीरामध्ये 70 टक्के पाणी असते. हे पाणी आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असते. त्यामुळे आपण कोणत्या धातूच्या भांड्यातून पाणी पितो हे तेवढेच महत्त्वाचे असते.

चला तर मग जाणून घेऊया या वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यातून पाणी प्यायल्यास आपल्या शरीरावर काय आणि कसे परिणाम होतात. आणि कोणत्या भांड्यातून पाणी पिल्यास ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत मातीच्या भांद्याबद्दल. मातीच्या भांड्यामध्ये एक खास गोष्ट असते. कारण मातीचा आणि पाण्याचा संबंध हा खूप जुना आहे, जसे की नदी, तलाव, समुद्र कुठे ना कुठे या दोघांचा मेळ पूर्वीपासूनच आहे.

त्यामुळे मातीमध्ये कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, पहिल्यापासूनच खूप जास्त प्रमाणात असते. हे मडके देखील मातीने भरलेले असल्यामुळे जी पोषकतत्वे मातीमध्ये आहेत ती सर्व पोषकतत्वे पाण्यामध्ये येतात. ते पुढे जाऊन आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते. जर आपण मातीच्या मडक्याचे निरीक्षण केले तर आपल्याला एक गोष्ट दिसून येते की मातीचे मडके हे थोडे खडबडीत असते.

या मडक्याला छोटी-छोटी छिद्रे दिसून येतात. याच कारणामुळे हे मातीचे मडके नैसर्गिक फ्रीज म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे फ्रिजमध्ये थंड केलेले पाणी आणि मडक्यामध्ये थंड केलेले पाणी हे समान प्रमाणात थंड असते. फ्रिजच्या तुलनेत मडक्यातील थंड पाणी आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू देत नाही. आपल्याला ही पोषकतत्वे तेव्हाच मिळतील जेव्हा आपण मडके घेताना ते मडके तपासून घेऊ.

मडके घेताना एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे की ते मडके चांगल्या मातीचे बनलेले असले पाहिजे. जर ते चांगल्या मातीने बनले नसेल तर त्याचे आपल्या शरीरासाठी फायदे होणार नाही. उलट त्याने नुकसान होईल. त्याचबरोबर आपल्याला नेहमी मडक्याला दररोज आतून स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यानंतर कधीही मडक्या मध्ये हात घालून पाणी काढू नये त्यामुळे आपल्या हाताचे दूषित जंतू पाण्यात जाऊन पाणी खराब होते.

हे वाचा:   शरीर सफाई करण्यासाठी आता फक्त दहाच रुपये लागतील.! शरीरात खूप घाण तयार होते पण बाहेर पडत नाही त्यासाठी करावे लागते हे काम.!

त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत की तांब्याच्या भांड्यात बद्दल. आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की खरंच तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला काही फायदे होत असतील का? . तर तांब्याला इंग्रजी मध्ये कॉपर या नावाने ओळखले जाते. जसे की कॅल्शियम आणि आयरन आपल्या शरीरासाठी मुख्य घटक आहेत. त्याचप्रमाणे कॉपर देखील आपल्या शरीरासाठी एक पोषक तत्व आहे.

आपल्या दररोजच्या जेवणामधून देखील आपल्याला कमी जास्त प्रमाणात कॉपर मिळत असते. पण जर आपण रोज तांब्याच्या भांड्यात ओतून पाणी पीत असू तर तांब्याच्या भांड्यातील गुणधर्म आपोआप पाण्यामध्ये येतात. त्यानंतर हे पाणी शरीरामध्ये जाऊन आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. आणि यामुळे आपल्या शरीरात जाऊन अनेक आजारांशी लढायचे काम करते.

त्याच प्रमाणे जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो तेव्हा पाण्यातील छोटे छोटे किटाणू, बॅक्टेरिया मरून जातात आणि आपल्याला स्वच्छ पाणी मिळते. त्यानंतर आपल्यासमोर कायमच एक असा प्रश्न निर्माण होतो की तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला गरम पाणी ठेवले पाहिजे की थंड? तर कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवताना नॉर्मल पाणी ठेवावे जर आपण जास्त गरम पाणी ठेवले तर या पाण्यामध्ये जास्त प्रमाणात वापर चे तत्त्व घेतात.

त्यामुळे कंबर दुखी, गुडघे दुखी असे त्रास होऊ शकतात. त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये कधीच लिंबू किंवा विनेगर टाकू नये कारण यामध्ये एसिडीक तत्त्वे असतात. आणि ही तत्वे पाण्यात मिसळल्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातून आपल्याला साधे पाणी प्यायचे आहे. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकत नाही. त्यामुळे तांब्याचे भांडे लवकर फुटण्याची शक्यता असते.

हे वाचा:   नव्वद वर्ष वया पर्यंत एकदा पण कॅल्शियम कमी पडणार नाही.! पीठ मळताना त्यात टाका फक्त एक चमचा.! पचन शक्ती, कफ, वात सगळे गायब.!

त्याच बरोबर आठ ते बारा तास आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवून ठेवू शकतो. आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास ते अधिक फायदेशीर ठरते. त्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये साठवून ठेवलेले पाणी आपण शक्यतो तांब्याच्या भांड्यातूनच तिने गरजेचे आहे. किंवा तुम्ही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी काचेच्या ग्लासातून पिऊ शकता. तुम्हाला ते पाणी स्टील किंवा मेटल च्या ग्लास मधून किंवा भांड्या मधून प्यायचे नाही आहे.

त्याच बरोबर आपण तांब्याच्या बॉटल मध्ये ठेवलेले पाणी किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी दिवसभर तसेच ठेवून देऊ शकतो का ? नाही. आपण शक्यतो दररोज सकाळी एकदाच तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायचे आहे जर आपण दिवसभर तांब्याच्या बॉटलमध्ये ठेवून पाणी प्यायले तर आपल्या शरीरामध्ये कॉपरची मात्रा वाढल्यामुळे आपल्या शरीराला दुसरे आजार होऊ शकतात.

जर तुम्ही दररोज तांब्याच्या भांड्यात पाणी पीत असाल तर कधीतरी एक महिना किंवा एक आठवडा यामध्ये द्या ठेवणे गरजेचे आहे कारण चांगल्या गोष्टी देखील जास्त प्रमाणात घेणे धोकादायक असते. तांब्याचे भांडे दररोजच्या वापरामुळे काळे पडते. तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पावडर चा उपयोग करणे गरजेचे नाही. फक्त लिंबू आणि मिठाने देखील तुम्ही हे भांडे साफ करू शकता. त्यानंतर काचेचे आणि स्टिलच्या भांड्यांचा वापर.

यात दोन्ही प्रकारचे धातू पाण्यामध्ये लवकर मिसळत नाहीत. त्यामुळे तुम्ही या भांड्यांमध्ये गरम पाणी टाकून ते तुम्ही पिऊ शकता. म्हणजेच तुम्ही या दोन्ही धातूंच्या भांड्यांमध्ये जसे पाणी टाकाल तेच पाणी तुम्हाला प्यायला मिळते. त्यामुळे आपण जर सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यात ओतून पाणी प्यायले तर ते जास्त फायदेशीर ठरते. आणि गरमीच्या दिवसांमध्ये तुम्ही मातीच्या भांड्यातील पाणी प्यायले तर ते जास्त फायदेशीर ठरते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *