वाटीभर वाळू आणि हरबरे.! दुकानात मिळत नसेल इतके फुगले जातील हरबऱ्याचे फुटाणे.! एकदा नक्की ट्राय करा.!

आरोग्य

बाजारात अगदी कुरकुरीत व पिवळे मिळणारे चणे आपल्याला खायला नेहमी आवडतात पण हेच चणे घरात कसे भाजायचे? बाहेर मिळणारे व्यवस्थितरित्या भाजलेले चणे घरी कसे भाजायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसे बघायला गेले तर चणे दररोज खाल्ले पाहिजे कारण चण्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात व आपल्या शरीरासाठी देखील भरपूर फायदेशीर असतात. चणे मध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही प्रकारचे फायबर असतात.

मधुमेहाचे रुग्ण किंवा शरीरात वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी काळे चणे दररोज खावेत. चण्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्याची क्षमता असते. काळे चणे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होण्यात मदत होते. सेवन केले पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया हे चणे भाजायची घरगुती पद्धत नेमकी आहे तरी काय हे चणे घरच्या घरी बाहेर सारखे बनवण्यासाठी आपल्याला पिवळे चणे घ्यायचे आहेत.

चणे थोडेसे पिवळसर असले तर ते भाजायला अगदी योग्य असतात त्यामुळे आपल्याला ते चणे घ्यायचे आहेत. एका वाटीमध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद टाकून यामध्ये एक चमचा पाणी टाकून एकत्रितपणे हे मिश्रण मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण आपण घेतलेल्या चण्यामध्ये टाकून यांना व्यवस्थित रित्या लावून घ्यायचे आहे. आपण इथे हळदीचा वापर करत आहोत कारण आपण बाजारांमधून आणलेले चणे बघितले असतील तर त्यांना देखील हळद लावलेली असते.

हे वाचा:   21 दिवसात पोटाची चरबी मेनासारखी वितळेल, हे दोन पदार्थ पिल्याने पोट झाले शांत.! केसगळती तर कायमची गेली.!

यासाठी यामध्ये थोडीशी चव यावी म्हणून आपण मिठाचा आणि हळदीचा वापर करत आहोत. त्यानंतर एका कोणत्याही कढईमध्ये आपल्याला चार ते पाच वाट्या मीठ घ्यायचे आहे. मीठ आपण इथे चण्यांना भाजण्यासाठी वापरणार आहोत कारण चण्यांना भाजण्यासाठी मीठ आवश्यक आहे. मीठ घेऊन आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे. मीठ गरम करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की, मीठ गरम करण्याची प्रक्रिया आपल्याला मंद आचेवर करायची आहे.

जेणेकरून मीठ जळून जाणार नाही. एकदा का मीठ गरम झाले की आपण तयार करून ठेवलेले चणे आपल्याला या मिठामध्ये टाकायचे आहेत आणि हळूहळू हे मिश्रण हलवत राहायचे आहे म्हणजेच ढवळून घ्यायचे आहे जेणेकरून त्या गरम मिठामध्ये चणे भाजतील. पाच मिनिटे सलग या मिश्रणामध्ये चणे ढवळल्यानंतर हळूहळू चण्यांचे वरील साल फुटेल व चणे हळूहळू भाजायला लागतील. पाच ते दहा मिनिटांमध्ये चणे भाजून तयार होतील त्यानंतर आपण या चण्यांचा आस्वाद घेऊ शकतो.

हे वाचा:   गुडघे, कंबर, हात -पाय आणि सांधेदुखी असं होईल गायब की जसे काही कधीच नव्हतं हे दुखणं.! हात-पाय झटपट मोकळे करण्यासाठी नक्की वाचा.!

आपण वापरलेले मीठ पुढच्या वेळेस साठी देखील वापरू शकतो एकदा का हे मीठ थंड झाले की परत आपल्याला कुठल्याही पात्रामध्ये हे बंद करून ठेवायचे आहे म्हणजेच आपण परत याचा वापर करू शकतो त्यामुळे आपण वापरलेले मीठ वाया जाणार नाही आणि कमी खर्चामध्ये आपण घरबसल्या आहेत आणि भाजू शकतो. अशाप्रकारे फक्त चणेच नाहीत तर शेंगदाणे देखील आपण घरबसल्या असेच मिठामध्ये भाजू शकतो त्यासाठी देखील आपल्याला हीच प्रक्रिया करायची आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.